स्पर्धा परीक्षा भरती संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे प्रा.नितेश कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत भेट दिली आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती करू नये, ती प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि सध्या सुरू असलेल्या परिक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. यावेळी महीला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना नितेश कराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढती बेरोजगारी आणि शासनाच्या कंत्राटी भरतीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक-युवती सहभागी झाले आहेत. शासनाने कंत्राटी भरती रद्द करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनात शासनाचा निषेध करण्यासाठी आणि वाढती बेरोजगारी दाखवण्यासाठी चिवडा, पकोडे, चहाचे स्टाॅल लावण्यात आलेले आहेत. यावेळी आंदोलकांबरोबर पकोडे तळून शासन निर्णयास विरोध दर्शवला.
यावेळी युवकांशी संवाद साधून आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच शासन निर्णय रद्द होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी युवकांना दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, सलिल देशमुख, समीर देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोकरभरती मधील पेपरफुटी, तलाठी घोटाळा, कंत्राटी भरती, जादा परीक्षा शुल्क आणि स्पर्धा परीक्षेतील इतर अनेक मागण्यांसाठी आज मलकापूर जि. बुलडाणा येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे. आंदोलनाची धग आता खेड्यापाड्यात पोचत असून सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@VijayWadettiwar@KunalNitinRaut
उपमुख्यमंत्री अजित पवार @AjitPawarSpeaks आपल्या शब्दांसाठी पक्के मानले जात होते, पण तिकडं गेल्यापासून त्यांचे शब्द खोटे वाटायला लागले आहेत.
नोकरभरती मधील परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी झाली तेव्हा, अजित पवारांनी ट्विट केलं होत, "एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच #परीक्षा_शुल्क आकारण्यात येईल"
पण या निर्णयाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही, सरकार विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी करोडो रुपये वसूल करतच आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@Jayant_R_Patil@RRPSpeaks@supriya_sule@VijayWadettiwar @GopichandP_MLC
आता तहसीलदार, नायब तहसीलदार ही कंत्राटी...
हे सगळं कोणासाठी आणि कारण काय?
कारण एकच... भाजपला आरक्षण संपवायचे.
हे सगळं अंत्यत सुनियोजितपने केंद्र सरकार व त्यांच्या मातृसंस्थेच्या पुर्व नियोजनचा भाग आहे. कोणत्याही घटकाला आरक्षण देणार नाही असं म्हणायचं नाही. पण निर्णय अशे घ्यायचे की त्यांना आरक्षणाचा फायदा मिळूच नये.
नोकऱ्या संपवल्या जात आहेत. बेरोजगारांची फौज देशात तयार केली जातेय. त्यांना जाती,धर्म, आरक्षण आणि प्रादेशिक इत्यादी अस्मितेच्या मुद्यावर आपापसात लढवल जातंय.
पण काँग्रेस या देशाला कंत्राटी होऊ देणार नाही.
काँग्रेसच सरकार आल्यावर हे सगळे निर्णय बदलणार.
शासकीय नोकरीसाठी संघर्ष करून अभ्यास करणाऱ्या तरुणांचे स्वप्न काँग्रेस उध्वस्त होवू देणार नाही.
कंत्राटी उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार भरण्यास सुरुवात.
भरतीचा हाच वेग राहिल्यास राज्यसेवा २०२४ मध्ये दोन आकडी जागांचे आश्चर्य वाटायला नको.
संचालक, सहसंचालक, उपसचिव, कक्ष अधिकारी, निरीक्षक, BDO, अधीक्षक पदांची कंत्राटी भरती पुढील एका महिन्याच्या आत होणार.
सावध ऐका पुढल्या हाका!
@NANA_PATOLE आज कंत्राटी तहसीलदारची जाहिरात आली, उद्या कंत्राटी कलेक्टरची जाहिरात येईल.
मित्रांनो आपल भविष्य धोक्यात आहे.आपण आज विरोध केला नाही तर उद्या पश्र्चाताप होईल.
“जागे होऊया,
मिळून सारे
कंत्राटी भरतीला विरोध करूया”
#खासगीकरण#कंत्राटीभरती#2ndOctMaharashtraBandh
@NANA_PATOLE शोकांतिका ही आहे की, अशा निर्णयांना विरोधीपक्षांकडून पुरजोरपणे विरोधही केला जात नाही... ओन्ली ट्विट!!!!....
उद्या BDO, DC कंत्राटी पद्धतीने भरल्यास आश्चर्य वाटायला नको!! 🙃
सावध ऐका पुढल्या हाका!
शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिका-यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदार व नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.
#कंत्राटीकामगारभरती
#महाराष्ट्र
#Maharashtra
#unemployment
भविष्यात राज्याचा कारभार कंत्राटी प्रशासनामार्फत चालणार.
तरुणांनी केवळ राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे का?
@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks#रोहीतदादा प्रत्येक पेपर फोडला जातोय
आपल्या माध्यमातून पेपर फुटीचा कडक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करा समस्त सर्व विद्यार्थी आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत
आदरणीय #फडणवीससाहेब आता तरी याकडे थोडे #serious पणे बघा
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks#आयोग हे काय सुरू आता तर अध्यक्ष महोदय म्हणता येणार नाही कारण सध्या कोण अध्यक्ष माहीत नाही.....पण कोणीतरी असेल की जबाबदार व्यक्ती का आयोग पोरका झाला ? आयोगाच्या राज्यात असले प्रकार हे काय बरोबर नाही.@BaliramDoley @mpsc_office@Dev_Fadnavis@abpmajhatv
आदरणीय फडणवीस साहेब, #पावसाळी_अधिवेशन सुरू असताना #पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती.
आपल्या त्याच चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परिक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिंमत इतकी वाढलीय की ते #MPSC चे पेपर फोडायला लागले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला?
शासनाने थोडा #serious पणे विचार करावा, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, #राजस्थान #उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा, जेणेकरुन पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही!
@Dev_Fadnavis