Remembering ‘KrantiSurya’ Mahatma Jyotiba Phule, a pioneering social reformer, thinker and writer who raised a voice for the oppressed and marginalised, on his Birth Anniversary!
स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचे अग्रणी, शोषित-पीडित-वंचितांचा आवाज, थोर समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaJyotibaPhule #Education #Maharashtra
दूरदर्शन परिवार की ओर से छत्रपति शिवाजी महाराज की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि। स्वराज के लिए समर्पित उनका जीवन साहस, रणनीति और अटूट संकल्प का प्रतीक था। देश के प्रति उनका प्रेम, न्याय और दूरदर्शिता सबके के लिए प्रेरणास्रोत बनी रहेगी।
#ChhatrapatiShivajiMaharaj #deathanniversary #DeshkaPehlaChannelDeshkaApnaChannel
महिला अस्मिता भवनचे स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात, औसा मतदारसंघातील 40 गावांमध्ये महिला अस्मिता भवन बांधण्यासाठी प्रत्येकी 42.20 लक्ष रु. प्रमाणे 16 कोटी 88 लक्ष रु. निधी मंजूर✌️
गावोगावी सक्रिय असलेल्या महिला बचत गटांना दैनंदिन कामकाजासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने बचत गटांच्या सक्षमीकरणाला मोठी अडचण निर्माण होते, त्यामुळे बचत गटांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला नवी गती प्रदान करण्यासाठी "ग्रामसंघ इमारत - महिला सक्षमीकरण भवन" निर्माण करण्याची संकल्पना मी मांडली होती. आमदार निधी (10 लक्ष रु.), जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण निधी (15 लक्ष रु.) व मनरेगा/रोहयो अभिसरण निधी (17.20 लक्ष रु.) या 3 योजनांच्या अभिसरणातून औसा मतदारसंघातील 93 गावांमध्ये महिला अस्मिता भवन निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
अस्मिता भवनसाठी आमदार निधी व जिल्हा वार्षिक योजना निधी अनुज्ञेय नसल्याने प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थविभागाकडे गेला होता. 8 डिसेंबर रोजी तत्कालीन अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याकडे व त्यानंतर मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा केला होता. 24 मार्च, 2026 रोजी अर्थ मंत्रालयाने महिला अस्मिता भवन निर्मितीच्या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यास परवानगी दिल्यानंतर काल पहिल्या टप्यात औसा मतदारसंघातील 40 गावांमध्ये अभिसरणातून महिला अस्मिता भवन निर्माण करण्यासाठी प्रत्येकी 42.20 लक्ष रु. प्रमाणे 16 कोटी 88 लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून महिला अस्मिता भवन निर्मितीस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे तसेच नाविन्यपूर्ण अंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री मा ना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे व लातूर जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
अस्मिता भवनमध्ये ग्रामसंघ अध्यक्षांसाठी एक सुसज्ज केबिन, 1 मीटिंग हॉल, महिलांसाठी स्वच्छतागृह व महिला बचत गटांच्या उत्पादनविक्रीसाठी 2 गाळे समाविष्ठ आहेत. प्रस्ताव 93 गावांसाठी सादर करण्यात आलेला पण यावर्षीच्या शिल्लक आमदार निधीचा विचार करून पहिल्या टप्यात 40 अस्मिता भवन ला मंजुरी मिळाली असून एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर उर्वरित 53 अस्मिता भवनलाही मंजुरी देण्यात येईल. शेतरस्त्यांचा औसा पॅटर्न निर्माण केल्यानंतर बचत गटांच्या बळकटीकरणाचा औसा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, महिला अस्मिता भवन हे त्यादृष्टीने पडलेले निर्णायक पाऊल आहे.
#महिला_अस्मिता_भवन #AUSA #womenempowerment
औसा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विधानसभास्तरीय कार्यशाळेत ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) अभियान’ अंतर्गत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.
या प्रसंगी भाजपा नेते मा. खासदार किरीट सोमय्या जी यांनी ‘मतदार यादी शुद्धीकरण’ (S.I.R.) या विषयावर कार्यकर्त्यांना अभियानाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात त्यांचे औसा मतदारसंघाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना “मतदार यादी अचूक आणि सक्षम करणे ही लोकशाहीची मजबूत पायाभरणी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे,” असे आवाहन केले,
#ausa #bhartiy_janta_party #abhimanyupawar #bjp
काल औसा मतदारसंघात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे व बागांचे नुकसान झाले आहे. हा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची विनंती केली. 🙏
आज माळकोंडजी गावात आमदारसाहेब यांनी व ग्रामस्थांसह मन की बात कार्यक्रमात सहभागी होत देशाचे लोकप्रिय @PMOIndia मा श्री @narendramodi जी यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. क्रीडा, आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रांशी निगडित त्यांचे आजचे सखोल मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. #मनकीबात#MannKiBaat
आज माळकोंडजी गावात सहकारी व ग्रामस्थांसह मन की बात कार्यक्रमात सहभागी होत देशाचे लोकप्रिय @PMOIndia मा श्री @narendramodi जी यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. क्रीडा, आरोग्य व तंत्रज्ञान क्षेत्रांशी निगडित त्यांचे आजचे सखोल मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. #मनकीबात#MannKiBaat
वैद्यकीय महाविद्यालय वाशिम चे नाव बदलून संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालय वाशिम केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांचे आभार मानले!
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@Team__Devendra
वाशीम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे नाव देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.
देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष धन्यवाद.
#devabhau#devendrafadanvis#devendra#Anulom
वाशीम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे नाव देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.
देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष धन्यवाद.
#devabhau#devendrafadanvis#devendra#Anulom
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करून गेलात दादा, भावपूर्ण श्रद्धांजली😭
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राज्यातील एक धडाडीचे आणि कर्मनिष्ठ नेते अजितदादा पवार यांचे लँडिंगवेळी झालेल्या अपघातात निधन झाल्याचे वृत्त मनाला प्रचंड वेदना देणारे आहे. कामावर प्रचंड निष्ठा असलेले, मोठा जनसंग्रह असलेले, महाराष्ट्राची खडानखडा माहिती असलेले, प्रशासनावर भक्कम पकड असलेले आणि सर्वसामान्यांप्रती कमालीची संवेदनशीलता बाळगणारे एक अष्टपैलू नेतृत्व आज महाराष्ट्राने गमावले आहे. त्यांच्या कामाचा आवाका फार मोठा होता, काम घेऊन आलेल्यांची त्यांच्याकडे कायम मोठी गर्दी असायची. काम होत असेल तर होईल म्हणण्याची आणि होत नसेल तर होणार नाही म्हणण्याची धमक राजकारणात फार दुर्मिळ, ती धमक दादांकडे होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थकारणाला लावलेली शिस्त अद्वितीय आहे.
दादांचा माझ्यावर खूप स्नेह होता, कधी चुकलो तर हक्काने मला रागवून सांगायचे, चांगलं काम केल्यावर तितक्याच दिलखुलासपणे कौतुकाची थाप पाठीवर द्यायचे. कुठेही भेटलो तर काय भावकी म्हणूनच बोलायचे. दादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी क्षती झाली आहे. दादांच्या जाण्याने माझेही खूप मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे, एक मार्गदर्शक आणि एक हक्काचे ठिकाण मी गमावले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडीत दादांचे असलेले योगदान कधीही विसरता न येण्यासारखे आहे. दादांच्या स्मृती कायम जिवंत राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी पोकळी निर्माण करून गेलात दादा, भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती😭
दादांसोबत विमानात असलेल्या त्यांच्या 5 सहकाऱ्यांचेही या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे, त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.