@sancheti_ajay जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ.
ईश्वर से प्रार्थना है कि आपको सदैव उत्तम स्वास्थ्य, सुख, शांति, समृद्धि एवं दीर्घायु प्रदान करें। आपका जीवन खुशियों और सफलताओं से सदैव परिपूर्ण रहे। आपका मार्गदर्शन और आशीर्वाद हम सभी को हमेशा मिलता रहे।
🙏 सादर प्रणाम एवं शुभकामनाएँ
@NagpurPolice We sincerely thanks *Shri. Rajendra Dabhade Sir* (*Addl. CP Crime - Nagpur*) for gracing our Garbha event at Beltarodi, Nagpur.
Your encouragement and presence inspired everyone and Your presence made the occasion even more special..
🙏🏽🙏🏽
देहरादून के प्रसिद्ध जय मां डाट काली मंदिर में दर्शन और पूजन का सौभाग्य मिला। देवी मां से सभी देशवासियों की सुख-समृद्धि और आरोग्यपूर्ण जीवन की कामना की।
दादा,
आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.
तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.
तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.
दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.
भावपूर्ण आदरांजली 🙏🏻
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके अजितदादा यांना आपल्यातून जाऊन दोन महिने झाले… दादा जणू अजूनही आपल्या अवतीभवती आहेत असंच वाटतं. We miss you, Dad 💔 @SunetraA_Pawar
शिक्षण महर्षी, माजी खासदार व माजी मंत्री, आमचे प्रेरणास्थान आणि माझे वडील आदरणीय श्री दत्ताजी मेघे साहेब यांचे आज रविवार दि. २२ मार्च २०२६, सायंकाळी ७.४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली झाली. एक अनुभवी संसदपटू आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दिग्गज नेता गमावला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
उद्या सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी, दुपारी १.०० वाजेपर्यंत श्री. दत्ताजी मेघे साहेब यांचे पार्थिव दर्शनासाठी १३५, पांडे ले-आऊट, खामला, नागपूर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव वर्धा येथे नेण्यात येईल.
सावंगी (मेघे) येथील निवासस्थानी दुपारी २.३० ते ४.०० वाजेपर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर पवनार ते सेवाग्राम रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.