@mpsc_office तर्फे सहाय्यक नगर रचनाकार ह्या पदाची चाळणी परीक्षा 28/06/2025 रोजी होऊन 1st आणि 2nd Answer key अनुक्रमे 09/07/2025 व 14/08/ 2025 रोजी जाहीर झाली परंतु अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर अंतिम निकाल लावण्यात यावा. @CMOMaharashtra#ATP_Result
@Dev_Fadnavis जी जर सदर बाब संबधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांनी योग्य वेळी गांभीर्याने घेतली असती तर कुठलीही अडचण आली नसती पण सांगायचे कोणाला?@mieknathshinde जी आपण नेहमी सांगताय की सरकार सामान्य गरीब माणसांच आहे? ९ महीने उलटून गेल्यावर सुध्दा @mybmc ला जाग येत नसेल आणी विषयाचं गांभीर्य न समजणार्या संबंधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी समस्त परीक्षार्थी कडून केली जात आहे @AjitPawarSpeaks जी ही सर्व मुलं महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी,कामगार व शेतकऱ्यांची आहेत. आपण ग्रामीण भागातील आहात त्यामुळं या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला आहे. पोरांना मुंबई गाठायची म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. पोरं नैराश्याने ग्रासलेले आहेत, देव न करो पण जर कोणत्या परीक्षार्थीन चुकीचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी @mybmc चीच असेल याची कृपया नोंद घ्यावी. @DGPMaharashtra आपणास ही या निमित्ताने अवगत करीत आहोत. कृपया यात कोणीही राजकारण आणू नये. सदर प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाने @mybmc ला योग्य तो निर्णय घेण्याची मुभा दिली असताना सुद्धा हा वेळकाढूपणा परीक्षार्थीनच्या चिंतेचा विषय झाला आहे .
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद @SanjayDRathods साहेब. साहेब आपणास एक विनंती आहे की डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपनीच्या मार्फत सरळसेवा भरती करण्याची परवानगी आहे त्यामुळे गट क आणि गट ब (अराजपत्रीत) पदभरती जलद गतीने पार पाडण्यासाठी TCS/ IBPS मार्फत राबवण्यात यावी.
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी टिसीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#Mahatransco_at_tcs_ion बाबत आज अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित केला गेला. @MeghnaBordikar ताई याबाबत आपण तत्काळ कार्यवाही करून कृपया अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्र द्यावे. गल्लीबोळातील परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मान्य नाहीत.
राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे #WCD मंत्री @SanjayDRathods यांना वाढदिवसाच्या सर्व विद्यार्थ्याच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. #WCD विभागाची 3000 पदाची पदभर्ती रखडलेली आहे.ती जाहिरात काढून पदभर्ती पूर्ण करून विद्यार्थांना अश्वस्त करावे ही विनंती.@degree_holders@CMOMaharashtra
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. @MeghnaBordikar
प्रति, मा. मेघना बोर्डीकर, उपाध्यक्ष, महाट्रान्स्को.
विषय: सहायक अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा ६ जुलै २०२५ — TCS ION केंद्रावर घेण्याची विनंती.
महोदया,
महाट्रान्स्कोच्या जाहिरात क्र. १८/२०२४ अन्वये सहायक अभियंता (स्थापत्य) पदासाठी ६ जुलै २०२५ रोजी होणारी भरती परीक्षा TCS ION केंद्रावर घ्यावी, अशी विनंती आहे. मागील परीक्षांमधील पेपरफुटी, संगणकीय गैरप्रकार व रद्दीकरणामुळे उमेदवारांवर मानसिक ताण आला आहे.
TCS ION सारख्या विश्वासार्ह केंद्रांवर सुरक्षित यंत्रणा व मान्यताप्राप्त सुविधा उपलब्ध असतात. यामुळे भरती प्रक्रियेची पारदर्शकता राखली जाऊन परीक्षार्थींचा विश्वास वाढेल.
कृपया यावर सकारात्मक निर्णय घेऊन हजारो अभियंता विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@MeghnaBordikar@INCHarshsapkal@degree_holders@Mpsc_Andolan
पुन्हा एकदा कार्यतत्परता दाखवत मा. मंत्री @Jaykumar_Gore साहेबांच्या आदेशामुळे अतिरिक्त निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी च कालावधी ६ महिन्यांकरिता वाढवून दिल्याबद्दल #EA व संपूर्ण विद्यार्थी वर्गातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार...❣️🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
अनेक ठिकाणी गुन्हे असतानाही एका उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे.
#PWD#Mhada अशा विभागांच्या परीक्षेत डमी उमेदवार म्हणून गुन्हा दाखल असणारे विष्णू रतनसिंग जरवाल यांना #WRD@Deepakk75058621 जलसंपदा विभागाने CEA पदी नियुक्ती दिली आहे. अशा उमेदवारांना का नियुक्ती देण्यात आली याच स्पष्टीकरण विभागाने द्यावे. सोबत शासन पत्र, नियुक्ती पत्रे आहेत दोन्ही तपासून घ्यावे. प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होणार असल्याने याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks .
BMC SE निकालावरून सरकारच्या अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह!
7 मे रोजी BMC ने जाहीर केलेला Assistant Engineer (AE) निकाल IBPS च्या अधिकृत आणि पारदर्शक Format मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या निकालात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, श्रेणी, गुण, कट-ऑफ – सर्व काही व्यवस्थित आणि तपशीलवार स्वरूपात नमूद होते. यामुळे उमेदवारांना स्वतःचा निकाल समजून घेणे आणि निवड प्रक्रियेबाबत विश्वास ठेवणे शक्य झाले.
मात्र, 12 जून रोजी जाहीर करण्यात आलेला Sub Engineer (Mechanical, Electrical) निकाल केवळ एका साध्या Excel शीट स्वरूपात प्रसिद्ध केला गेला आहे. यात ना गुण आहेत, ना श्रेणी, ना कट-ऑफ, ना कुठलेही अधिकृत तपशील. केवळ नाव आणि रोल नंबर!
हेच का आहे ‘सुशासन’?
सरकार एकाच भरती प्रक्रियेतील दोन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष वापरत असेल, तर पारदर्शकतेचा आणि विश्वासार्हतेचा सर्वस्वी अभाव वाटतो. ही गोष्ट केवळ गोंधळाची नाही, तर संशयास्पद आणि गंभीर आहे.
@mybmc ने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की –
➡️ एकाच परीक्षेसाठी दोन वेगवेगळे निकाल Format का?
➡️ SE पदासाठी गुण, कट-ऑफ, श्रेणी का लपवण्यात आले?
➡️ जर AE निकाल IBPS Format मध्ये शक्य आहे, तर SE निकाल तसे का नाही?
हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नाही, तर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नीतिमत्ता हरवत असल्याचे संकेत आहेत.
आमचा स्पष्ट आग्रह आहे –
➡️ @mybmc ने त्वरित या बाबत खुलासा करावा
➡️ SE (Mechanical, Electrical) निकाल देखील IBPS च्या अधिकृत Format मध्ये पुनः प्रकाशित करावा
सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. अन्यथा #BMC_SE भरतीतील विश्वासार्हतेवर कायमचे काळे डाग उमटतील.
#BMC_SE
#SE_Result_Issue
#IBPSFormat
#सरकार_जवाब_दो
#YouthDeservesTransparency
#StopPlayingWithCareers
कालचा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. असं का ? @mybmc