पळपुटेपणा करून आणि पत्रकारांवरून चिडून कसं चालेल तटकरे?
असा पळपुटेपणा केल्यामुळे तुमचे काळे कारनामे झाकले जाणार नाहीत. तुमचेही हात यात बरबटले आहेत हे आज ना उद्या बाहेर येणार आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@maha_governor
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂
@Jayant_R_Patil@NCPspeaks Congress Party - Sharadchandra Pawar
अजित पवार आपल्या भाषणात असे म्हणाले की आदरणीय शरद पवारसाहेब हे आपले दैवत आहेत. ते असेही म्हणाले की, "आम्हाला जे करायचे आहे ते करू द्या" तुम्ही जातीयवादी शक्तींच्या सोबत जाणार आणि धर्मनिरपेक्षतेचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणाऱ्या आदरणीय साहेबांना दैवत म्हणणार! तुम्ही वेळोवेळी त्या दैवताचा अवमानच केला आहे. गेल्या १५ वर्षात तुमची प्रत्येक भूमिका ही त्या दैवताच्या विरोधातच होती. पण, हे दैवत कधी बोलले नाहीत. ते गप्पच होते. पण, या दैवतालाच तुम्ही मंदिराच्या बाहेर काढायला निघालात अन् वर दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका. ते देव नाहीत ते माणूस आहेत. गेले ६० वर्ष ते पुरोगामी विचारधारेचा झेंडा घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहेत. राजकारणात सर्वात महत्वाची असते ती विचारधारा ; शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आणि धर्मनिरपेक्षता या विचारांवरच महाराष्ट्र उभा राहिला आहे. तेव्हा महाराष्ट्रात गोंधळ घालून नका; महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका. तुम्ही ज्याला दैवत म्हणताय त्याने तुम्हाला बाहेर काढले नव्हते. तुम्हीच बाहेर पडला आहात. आता तुम्ही ज्याला देव म्हणताय तो देव आता महाराष्ट्रात फिरतोय. त्या देवाने लोकसभेत जे घडविले... तेच आता विधानसभेतही दिसेल!
…………….
पण हे दादा आपण बोललात की design box च्या आरोरा नी सांगितले होते असे बोला