महाराष्ट्र काँग्रेस तर्फे MPSC परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधातील उद्यापासून MPSC मुख्य कार्यालयासमोर होणाऱ्या साखळी उपोषण रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठीचा हा संघर्ष कोणत्याही नोटिशीने थांबणार नाही.
८ जुलैचा काँग्रेसचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच!
लाखो MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने लढा देणार आहोत. गरज पडली तर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जेलमध्ये जाण्यासही तयार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल. आमचा संघर्ष मागे हटणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.
The Maharashtra Congress has been served a police notice in an attempt to prevent the relay hunger strike scheduled to begin tomorrow in front of the MPSC Headquarters against the government's unjust decision to conduct MPSC examinations in the online mode. However, no notice can stop this fight for the legitimate rights of students.
The Congress remains firm in its resolve to go ahead with the protest on 8 July. Whether permission is granted or denied, the agitation will take place.
We will continue our peaceful and democratic struggle against a government that is jeopardizing the future of lakhs of MPSC and other competitive examination aspirants. If necessary, Congress leaders and workers are prepared to go to jail to secure justice for students.
Every attempt to suppress the voice of students will be strongly resisted. We will not back down from this movement. Our struggle will continue until students receive the justice they deserve.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@imshivrajmore@SalunkeSagarK
#MPSC #StudentsFirst #CongressWithStudents #JusticeForStudents #MaharashtraCongress
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office@Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने व एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत आज काही विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या शंकांच्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सविस्तर चर्चा केली आहे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, संभाव्य गैरप्रकार, प्रत्येक सत्राचा समानीकरण फॉर्मुला, जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण, CCTV, परीक्षा केंद्राची निवड याविषयी आयोगाशी चर्चा केली आहे.
या चर्चेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आज दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या आयोजनाबाबत सविस्तर निवेदन करेल. यानंतरही विद्यार्थ्यांचे समाधान नाही झाले तरी पूर्ण समाधान होईपर्यंत मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतसोबत ठामपणे आहे.
#MPSC #MPSC2026 #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #Maharashtra
मा. @mpsc_office@bhimanwar
गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल अजून जाहीर नाही परीक्षेला 44 दिवस शिल्लक अभ्यास कोणी करायचा मुख्य परीक्षेचा आणि कोणी पुढील परीक्षा तयारी करायची कस कळणार?
जरा जास्तच संथ कारभार झाला आयोगाचा अस नाही का वाटत?
@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मा.@mpsc_office मा.@bhimanwar लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी ही केवळ 63% उमेदवारांसाठी आहे 37% उमेदवारांसाठी यातून सूट आहे... जी कौशल्य चाचणी सर्वांसाठी नाही ती चाचणी गुणवत्ता साठी वापरणे चुकीचे आहे.
2021 , 2022 मध्ये हा नियम लक्षात ठेवला परंतु 2023 पासून त्यात बदल होऊन 63% जनतेवर अन्याय झाला त्यामुळे कौशल्य चाचणी मधून साध्य काहीच होत नाही उलट नुकसान होत आहे.
100 % जागा न भरल्या जाता 70% जागा फक्त भरल्या जात आहेत 2023 च्या अनुभवातून, आता तर पुन्हा मेगा भरती होणार आहे अस आपण म्हणत आहात तर मग रोजगार मिळाला पाहिजे अशी परीक्षा योजना असावी .
कौशल्य चाचणी बाबत 2023 मधील हाल पाहता त्या वेळी आयोगातील वरिष्ठ लोकांना कळण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही 2024 आणि 2025 मध्ये त्यात बदल नाही झाला, परंतु आपण नवीन आहात आणि आपल्याकडे सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न अपेक्षा चांगल्या निर्णयाची ...ज्यातून मिळेल समान संधी आणि रोजगार.....धन्यवाद 🙏
@MahaDGIPR@lokmat@SakalMediaNews@pudharionline@avchite_amol
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये.
@CMOMaharashtra
नगर परिषद सेवा प्रवेश नियम मध्ये आरोग्य सहायक या पदासाठी 2 वर्षे अनुभवाची जाचक अटी मुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
कृपया सदरील अट रद्द करण्यात यावा
@mieknathshinde@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Dhananjay4INC@AbhiPawarBJP
मा. @mpsc_office विनंती आहे की, 26 आणि 27 फेब्रुवारी ला होणारी गट क 2024 साठीची टायपिंग टेस्ट साठी विद्यार्थ्यांना की-बोर्ड आणि आणि कॉम्प्युटर बाबत कोणतीही अडचण येता कामा नये. 1 दिवस आधी आपण पवई सेंटर वर जाऊन सर्व गोष्टींची एकदा पाहणी करणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra@RRPSpeaks
मा. @mpsc_office
गट क 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊन एक महिना होऊन गेला.
तरी अद्याप आपण स्किल टेस्ट चे वेळापत्रक जाहीर केलं नाही.
कृपया आपणांस विनंती आहे की, स्किल टेस्ट चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.
@CMOMaharashtra@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#MPSC कडून संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) 2025 साठी एकूण 674 पदांची जाहिरात काढण्यात आलेली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) 392 पदांचा समावेश आहे. सामान्यतः संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात जुलै 2025 रोजी प्रकाशित होऊन परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे.
गेले तीन महिने झाले विद्यार्थी PSI साठीची वय सवलत याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. परीक्षेच्या वेळापत्रकाला धक्का न लावता कम्बाईन विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC कडून संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) 2025 साठी एकूण 674 पदांची जाहिरात काढण्यात आलेली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) 392 पदांचा समावेश आहे. सामान्यतः संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात जुलै 2025 रोजी प्रकाशित होऊन परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे.
गेले तीन महिने झाले विद्यार्थी PSI साठीची वय सवलत याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. परीक्षेच्या वेळापत्रकाला धक्का न लावता कम्बाईन विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 chi जाहिरात होती 7006 जागेंची पण प्रत्यक्षात जॉईन झाले फक्त 4265.. तब्बल 2741 जागा रिकाम्या आहेत. पात्र उमेदवार असूनही MPSC प्रतीक्षा यादी लागणार नाही म्हणतेय. मग एवढ्या जागा रिक्त ठेऊन परीक्षा घेण्याचा उपयोग काय. प्रतीक्षा यादी लावून उमेदवारांना न्याय द्यावा . @mpsc_office
गट क 2024 मुख्य परीक्षा होऊन जवळपास 2 महिने झाले. अजून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली नाही. त्यानंतर मुख्यचा परीक्षेचा निकाल , टायपिंग परीक्षा होणार . या सर्व प्रकियेसाठी 2025 वर्षे तर गेला आता 2026 सुद्धा जाईल काय?अशी भीती उमेदवारांना वाटते@mpsc_office@RRPSpeaks@Dev_Fadnavis
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क जाहिरातीमध्ये #RTO_AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) या संवर्गातील रिक्त जागांचा समावेश झालेला नाही,
ही हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक बाब आहे..
त्यामुळे वर्षानुवर्षे या भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांच्या आशा अधांतरी राहिल्या आहेत..
राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.प्रतापजी सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे, #RTO_AMVI संवर्गातील रिक्त पदांचा समावेश याच वर्षी म्हणजे २०२५ च्या जाहिरातीत करावा, आणि इच्छुक उमेदवारांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@PratapSarnaik@AUThackeray@OmRajenimbalkr@mpsc_office@bhimanwar
#RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत #mpsc #rto