रितूजी,
सुषमा अंधारे एसीत बसून काम करणाऱ्यांपैकी नाही. गेली 20 वर्ष ऑन फिल्ड आहे.
फक्त फरक एवढाच आहे की, फावल्या वेळात तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे डोक्यावर छत्री धरायला तुमचे रील्स काढायला चिक्कार सेवेकरी सोबत आहेत.
आम्ही पदर खोचून खांद्याला खांदा लावून स्वतः फील्ड मध्ये उतरतो.
त्यामुळे माझ्यावर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या नाकर्तेपणाचे अजून किती बळी मुंबईत जाणार आहेत त्याकडे जरा लक्ष द्या... !
@TawdeRitu
Drama is never ending with the bjp. Instead of doing this drama with a whole host of officials and photographers, the Mayor should be focussed on running the city.
Let’s hope she doesn’t call these people Bangladeshi and doesn’t see a conspiracy in Mumbaikars out of work or a stroll on a rainy day
निधी वाटपात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये कमालीचा पक्षपातीपणा केला जातोय, पण हा पैसा मुंबईकरांच्या टॅक्सचा आहे.
- अनिल परब, आमदार
@advanilparab
आता पलटवार होणार,
फितूरांच्या फितूरीला उत्तर देणार ,
निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार!
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा दौरा!
दिनांक: २७, २८, २९ जून २०२६
यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी शहर, धाराशिव शहर, शिर्डी
परभणीच्या भूमीतून पुन्हा एकदा निष्ठेचा आणि एकजुटीचा महासागर उसळणार आहे!
रविवार दि. २८ जून रोजी परभणीत आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, परभणीतून एकसंघ शिवसेनेचा बुलंद आवाज महाराष्ट्राला ऐकवूया!
६ खासदार गेले… कारण म्हणे आता विकासाला वेग येणार!
चला मग वाट पाहूया…
हिंगोली - हाँगकाँग
परभणी - जर्मनी
धाराशिव - दुबई
बाकी फक्त एवढंच लक्षात ठेवावं -
गद्दारीचं कारण विकास असेल,
तर विकासाचा हिशोबही एक दिवस द्यावाच लागतो.
किरण पावसकर नावाचा कोण्या तीनपाट, टवाळखोर माणसाने मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या वक्तव्याची टिंगल केली. ती ही व्यासपीठावर 'सो कॉल्ड' शिवसैनिक म्हणवणाऱ्या लोकांच्या गराड्यात!
राजकारण गेलं चुलीत! हा आमच्या दैवतावर बोलतो. @mieknathshinde जी, अमित शहांबद्दल तो असा बोलला असता तर तुम्हाला चालले असते का? खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या या माणसाने माफी मागायला हवी.
आराध्य दैवताच्या शब्दांची असली टिंगल खपवून घेतली जाणार नाही. वेळ पडली तर हिशेब चुकता होईल..
#खाल्ल्या #मिठाला #नजागणारे
@mayajal77@mr_mr7171@OmRajenimbalkr@OmRajenimbalkr किती ट्रांसफार्मर किती टाम्या, किती पंचायत समिती सदस्य, किती ZP सदस्य ची कामे झाली असती एवढ्या निधी मध्ये?
आम्हा लोकांना चत्या समजतो का?
गद्दारी केली पैशांसाठी स्वतःला विकले आहे हे मान्य करा!
ऐका यांच्या पराकोटीच्या खऱ्या वाटाव्यात अश्या आणा-भाका. या वक्तव्यांना अजून वर्षही उलटलेलं नाही. हाय का नाही पलटी मास्टर!
आता बसा, हलगटाचं दूध काढणाऱ्या दाढीधारी माणसाच्या मागे.. कानाला फोन लावून हॅलो उदयजी.. हॅलो उदयजी करत..
#भगोडेमहामंडळ
एकच शिवगर्जना...
आपली शिवसेना गद्दारांच्या, चोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही!
आज सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह येथे शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. हा सोहळा म्हणजे निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंबसोहळा!
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत, पुन्हा नव्याने लढण्याचा निर्धार केला.
शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना मजबुतीने उभी आहे. जोपर्यंत शिवसैनिक खंबीर तोपर्यंत कितीही फितुरी होऊ द्या, निष्ठेची एक वीटही ढळणार नाही; हा विश्वास पुन्हा इकदा शिवसैनिकांच्या उपस्थितीने दिला.
ह्या सोहळ्याला सौ.रश्मी वहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
स्थळ: लोणार (जि. बुलढाणा)
खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल... जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? 'अतिरिक्त खरेदी होतेय' असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा सोडून रस्त्यावर जीवघेणी पळापळ करायला बळीराजाला वेड लागलेले नाही!
तुमचे ते विमाने फिरवून केलेले परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानात पेट्रोल पंपांची केलेली ही 'छळछावणी'... हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?
@Dev_Fadnavis@HardeepSPuri@PMOIndia@narendramodi
#कृषी_संकट #लोणार #शेतकरी #FuelCrisis #BJPFAIL