संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया आघाडी’ची ऑनलाइन बैठक आज पार पडली. २४ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित होते. येणाऱ्या संसदीय अधिवेशनात देशासमोरील प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका घेण्यासाठी, तसेच विरोधी पक्षांतील समन्वय यावर सखोल चर्चा झाली.
Ahead of the Monsoon Session of Parliament, a virtual meeting of the INDIA alliance was held today. Leaders from 24 opposition parties participated. There was a detailed discussion on taking a strong and united stand on key national issues, and enhancing coordination among opposition parties during the session.
नेल्सन मंडेला यांनी ब्रिटिश सरकारच्या वर्णभेदी धोरणाचा कडाडून विरोध केला. साम्राज्यवाद व गरिबी विरोधातही त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष केला. जगभरात समानता व एकता प्रस्थापित करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेले, भारतरत्न नेल्सन मंडेला यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात बंड पुकारून, थोर क्रांतिकारक मंगल पांडे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी पेटवली. स्वातंत्र्याची ओढ आणि पारतंत्र्याची चीड या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी जीवनाच्या अंतापर्यंत लढा दिला. अशा महान क्रांतिकारकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला भेट देऊन श्री साईबाबांची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. याप्रसंगी देशातल्या आणि राज्यातल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आणि इतर प्रश्नांवर लढण्याची ताकद मला सदैव मिळो ही प्रार्थना केली.