लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या #MPSC चा कारभार कशा व्यक्तीच्या हाती आहे, ज्यांनी आधी परिवहन आयुक्त असताना काय काय ‘पराक्रम’ केले, RTO मध्ये भ्रष्टाचाराचा कसा कळस केला, याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. हे संपूर्ण प्रेझेंटेशन इथं जोडत आहे.
सरकारने आतातरी भिमनवार यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे डाग अंगावर असलेल्या अधिकाऱ्याला हटवून तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अन्य अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तरच राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होण्यास मदत होईल. अन्यथा हेच विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत आम्हीही खंबीरपणे उभे राहू...!
(सोबतच्या लिंकमध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन दिलं आहे.)
https://t.co/HiRwxSPG1d
मा. फडणवीस साहेब,
आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असून ही बाब विद्यार्थ्यांनाही मान्य आहे.
आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत.
@Dev_Fadnavis
#MPSC #MPSCPaperLeak
#StudentsDemandJustice
प्रथमेश आज आपल्यात नाही, पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे.
महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात.
या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडं, जेवण, पुस्तकं, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात.
आणि त्यातच परीक्षांमधील अनियमितता, वारंवार होणारा विलंब, अनिश्चितता आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण आणखी वाढवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा प्रत्येक विलंब म्हणजे फक्त पुढे गेलेली तारीख नसते. त्याचा अर्थ आणखी काही महिन्यांचं भाडं, आणखी खर्च, कुटुंबावर आणखी आर्थिक भार आणि आयुष्यातलं आणखी एक वर्ष अनिश्चिततेत जाणं.
ज्या परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेतील अपयशाची इतकी मोठी किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची?
आणखी किती काळ विद्यार्थ्यांना असंच सहन करावं लागणार? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार आणि जबाबदार लोकांची जबाबदारी निश्चित होणार?
सदसद् "विवेकबुद्धी" व "नैतिकता" गहाण ठेवलेल्या #MPSC अध्यक्षांवर बोलू काही...
👉संवैधानिक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदाचा कार्यभार स्वीकारताना पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती. विसरलात काय,
👉तीच “गोपनीयता”, जिचे ऋषिकेश गांगुर्डे यांनी निडरपणे वाभाडे काढले आणि संपूर्ण देशभर पेपरफुटीमुळे #MPSC ची नाचक्की झाली व इज्जतीचे धिंडवडे वेशीवर टांगले गेले.
यावर आपण “अविवेकी” विचार करून बालिश कारणे देण्याचा “भीम” पराक्रम करत आहात. त्यावर मी एकच बोलतो
👉“तू इधर-उधर की न बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा;
👉आपल्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षकाचा पेपर जानेवारीत फुटला होता; त्यावेळी मी अध्यक्ष नव्हतो.
मग या प्रश्नांची उत्तरे द्या.
१) पेपरफुटी जानेवारीपासून मार्चपर्यंत सुरू होती का?
२) नेमका पेपर किती वेळा फुटला?
३) किती जणांनी फोडला?
४) किती जणांसाठी फोडला?
जर खरंच पेपर जानेवारीत फुटला होता व आपणास त्याची कल्पना नव्हती, हे सत्य असेल तर तत्कालीन अध्यक्ष श्री. अभय वाघ ( प्रभारी )यांच्यावर अद्याप आपण कारवाई का केली नाही?
त्यांना या प्रकरणात सहआरोपी का केले नाही?
किंवा अगदीच काही नाही, तर किमान जबाबदारी स्वीकारून वाघ यांना राजीनामा देण्यास का सांगितले नाही?
👉सर्वात महत्त्वाचे...
आपण यापूर्वी शासन सेवेत भ्रष्टाचार केला किंवा नाही, यानंतर काय करणार,यापेक्षा पेपरफुटीनंतर पदाला चिकटून राहण्याची प्रवृत्ती व दुसऱ्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसतोय.
👉आपण ना खुर्ची सोडत आहात, ना सोडायला लावत आहात.
आपण खरंच “निरपराध” असाल, तर लक्षपूर्वक वाचा,
“नैतिक जबाबदारी”
लोकशाहीमध्ये “नैतिकता” हा सुशासनाचा कणा असतो.एखादी दुर्घटना घडते किंवा मोठे प्रशासकीय अपयश येते, तेव्हा संबंधिताने स्वतःला जबाबदार धरणे व पदत्याग करणे हेच उच्च राजकीय/प्रशासकीय नैतिकतेचे लक्षण असते.
मग वैयक्तिक दोष असो वा नसो.
👉नैतिकतेचे सर्वोच्च प्रतीक असलेले स्व. श्री. लालबहादूर शास्त्री यांनी १९५६ मध्ये झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
“मी रेल्वे चालवत नव्हतो,” असे कारण त्यांनी दिले नाही.
👉पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी व उत्तरदायित्व कुणाचे आहे?
👉आपण राजीनामा देणार / हकालपट्टी होणार?
की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आम्हालाच कठोर पावले उचलावी लागणार?
हे येणारा काळ ठरवेल.
👉जाता जाता
नैतिक जबाबदारीने दिलेला राजीनामा हा केवळ राजकीय किंवा प्रशासकीय बदल नसून, व्यवस्था अजूनही संवेदनशील असल्याची जनतेला खात्री देणे होणे
राजीनामा देणे म्हणजे पळपुटेपणा नव्हे, तर लोकशाही प्रणालीवरील विश्वास दृढ ठेवण्याचे साधन आहे.
त्यामुळे निरपराध असाल / नसाल,“विश्वासार्हता गमावलेली असल्याने तात्काळ निर्णय घ्या.
तूर्तास इतकंच, बाकी उद्या.......
@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@mpsc_office@satejp@atullondhe@Jayant_R_Patil@VijayWadettiwar
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली.
या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
@MahaDGIPR
मित्रा, फडणवीस साहेब ऐकत नाहीत म्हणालास ते अगदी खरंय! सत्ताधाऱ्यांनी तरुणांचं ऐकलं असतं तर आंदोलनाची ही वेळच आली नसती!
पण उद्धव साहेब, मी आणि आपला पक्ष सदैव तुमच्या सोबत आहोत!
महाराष्ट्र पाहतोय की सरकार कसं अन्याय करतंय, तरुणांवर!
आम्हीही ऐकतोय आणि पाहतोय. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू! महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शहरातल्या तरुणांना एकच विचारतो, कधी येताय आपल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, ह्या अन्यायकारक राजवटीला जाग आणायला?
मा. मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा झाला. विशेष म्हणजे या मोर्चात कोणताही राजकीय नेता सहभागी नव्हता, तरीही विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती.
पुण्यातील मोर्च्यानंतर हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप भाजपा आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, संभाजीनगरच्या मोर्चाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कि हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा आहे.
विद्यार्थी राज्यभर स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विश्वासघात झाल्याची भावना आहे आणि त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने आरोप-प्रत्यारोपात वेळ न घालवता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा.
कारण आज ही फक्त एक ठिणगी आहे…
या ठिणगीचा वणवा व्हायला फार वेळ लागणार नाही.
@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@mpsc_office@satejp