पुणे हे नाव बदलून फुले नगर ?? 🤔
पुण्यात महात्मा फुले वाडा , महात्मा फुले संग्रहालय , महात्मा फुले सांस्कृतिक भवन , महात्मा फुले मंडई , महात्मा फुले कृषी विद्यापीठ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , महात्मा फुले रस्ता , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रस्ता .... हे सर्व असताना ह्यांना आता पुण्याचे नाव "फुले नगर" करायचे आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या बद्दल आदर आहेच पण पुण्याचे नाव फुले नगर करणे ही मागणी अतिशय बिनडोकपणाची आहे...असे मला वाटते.
पुण्याला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. प्राचीन काळात ह्याच जागेला वेगवेगळी नावे होती पण अगदीच शिवपूर्व काळात शहाजी राजांना पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर ह्याचे महत्व हे स्वराज्य मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ही काही काळ पुण्यात गेले होते. त्यांच्यानंतर पेशवे काळात अगदी दिल्लीच्या बादशहाने काय निर्णय घ्यायचे हे सुद्धा पुण्यातून अर्थात शनिवार वाड्यातून चालायचे...छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळविलेल्या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर ज्या पेशवेकाळात झाले त्याचा केंद्रबिंदू हे पुणे हेच होते. पुणे ही त्याकाळात अलिखित राजधानी होती असेही म्हणायला काही हरकत नाही कारण त्याकाळच्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्रीमंत नानासाहेब पेशवे हे पुण्यातून देशाचा कारभार चालवायचे.
ब्रिटिश काळात ही पुण्याचे महत्व वाढले होते. १८५६-५७ मध्ये पुण्यात पहिली नगरपालिका स्थापन झाली होती.
पुण्यातील सामाजिक व स्वातंत्र्य चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्याबरोबरच , न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यामुळे देशभरात पोहोचली.
पुणे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आणि सामाजिक प्रबोधनाचे मोठे केंद्र बनले. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
त्यामुळे , उगाच "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असा प्रकार करून ऐतिहासिक पुण्याचे नामांतर हे फुले नगर करणे म्हणजे अतिशय हास्यास्पद आणि कधी पूर्ण न होणारे स्वप्न आहे. हा फक्त राजकीय स्टंट आहे... हे आत्तापर्यंत बऱ्याच जणांच्या लक्षात आले असेलच.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असला निर्णय घेणार नाहीत ह्याची पूर्ण खात्री आहे...पण, कोणीतरी ह्यावर बोलायला पाहिजे म्हणून हा पोस्ट प्रपंच केला...🙏🏻
@Devendra_Office@Dev_Fadnavis@MurlidharOffice@mohol_murlidhar@MDNagpure
जय पुण्येश्वर !!!