आपण प्रत्येक कामात किती झोकून द्यावं, तसंच एखाद्याला देताना क��ती भरभरून द्यावं, हे सागरशेठ कडून शिकायला मिळतं.
क्रिएटिव्हीटी हीच पॅशन आ��ि तेच काम…..
आमच्या कुटूंबातील सर्वांचा लाडका आणि उर्जादायी मित्र @ShimmerzSagar वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
खूप प्रेम आणि खूप आदर ❣️🙏
@CJP_for_India Every politician in power looks wrong to someone.
A doctor loses one patient and becomes a bad doctor to that family.
A politician makes one bad decision and becomes a bad leader to those affected.
Power doesn't make mistakes visible. It makes them impossible to ignore.
अक्षयची कहाणी ही प्रत्येकाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, संकटांपुढे कधीही झुकायचं नाही हे शिकवणारी आणि मनात चिरस्थायी भाव उमटणारी आहे.
संकटांना भिडणारी, त्यांना हेड-ऑन घेणारी माणसं भारी असतात. अक्की खरा “फायटर” आणि फार वेगळं रसायन आहे.
हे पुस्तक नक्की वाचा. खूप नवं जग दिसेल.
दोनेक वर्षापुर्वी शहरीकरण, आर्थिक समृद्धी आणि महाराष्ट्राचा त्याबद्दलचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याबद्दल एक दिर्घ लेख लिहलेला.
त्यातला हा अंशतः भ���ग. दोन पोस्ट आहेत.
वाचा. विचार करा. जमलं तर कृतीत आणू.
आपल्याला फक्त आपली रेष मोठी करायचीये. इतकचं. ❣️🙏
——————————————
साल १९६० मधे संपुर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या होती ३ कोटी ९५ लाख.
त्यात ग्रामिण भागात राहणारे तब्बल २ कोटी ८३ लाख आणि शहरी भागात फक्त १ कोटी ११ लाख.
आता हेच आकडे २०२३ मधे कसे आहेत पहा - महाराष्ट्राची लोकसंख्या झालीये तब्बल ११ कोटी १२ लाख.
आणि त्यात ग्रामिण भागात राहणारे ६ कोटी १५ लाख आणि शहरी भागात तब्बल ५ कोटी ८ हजार. म्हणजे जवळपास अर्धे लोक आता शहरी भागाकडे वळताहेत.
ही आकडेवारी फार महत्वाची आहे.
हे असं फक्त महाराष्ट्रातच घडलय का?
तर नाही. थोडंफार गुगल केलं तरी कळेल की जगभरात सगळीकडेच हा ट्रेंड आहे. आणि या प्रकारालाच “अर्बनायझेशन” म्हणजे शहरीकरण असं म्हणतात.
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात हजारो लाखो वर्षात जे घडलं नाही ते औद्योगिक क्रांतीनंतर घडलंय. सोळाव्या-सतराव्या शतकात केवळ ५% आसपास असलेलं शहरीकरणाच प्रमाण आता कसलं बदललय पहा. लोकांचा ओढा हा असाच शहरांकडे वाढत जाणार आहे. जगभरात प्रचंड मोठ्या मेगा सिटीज तयार होत जाणार आहेत.
गेल्या शतकानुशतकांपासून चालत आलेला गावगाडा आता हळूहळू मागे पडलाय.
लोकसंख्यावाढीने शेतीचे पडलेले तुकडे, शेतीमालाला नसलेला भाव, (अनिश्चितता) ग्रामिण भागातली भयान बेरोजगारी, जातीवाद, भाऊबंदकी तसेच शिक्षणाचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं शहरांकडे वळलेत, नव्हे तर इकडे रूळलेतही. कित्येक जणं तर परदेशातील विविध शहरांत जावून स्थायिक झालेत.
शहरात असलेल्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसुविधा, कामधंदे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, त्यातल्या त्यात शेतीच्या तुलनेत असलेली स्थिरता आणि सर्वात महत्वाचं पैसे हे सर्वांनाच खुणावतात.
निती आयोगाच्या अहवालानुसार आज संपुर्ण जीडीपीच्या शहरी भागाचा हिस्सा ६३% आहे तर २०३० पर्यंत हा ७५% पर्यंत वाढेल. शहरीकरण हाच आर्थिक विकासाचा पाया ठरणार आहे.
या शहरीकरणाची बीजं महाराष्ट्रात तीन महत्वाच्या क्रांतीकारी घटनांनी घातली.
पहिली बाब - इंग्रजांच्या काळात मुंबईला असलेले अन्यन्यसाधारण महत्व.
तसेच मुंबईच्या नैसर्गिक
▪️सर्वसमावेशकता
▪️सुरक्षा व स्थिरता
▪️सोईसुविधा (इकोसिस्टम/ इंफ्रास्ट्रक्टर)
या महत्वाच्या त्रिसुत्रीमुळे इथ�� अनेक महान उद्योजकांनी त्यांच्या उद्योग-व्यवसायची बीजे रोवली.
देशी-परदेशी कंपन्यांनी इथे कारखाने टाकले, बंदरांचा, रेल्वेचा, दळणवळणाचा, तार, पोस्ट, शाळा, कॅालेजे, रस्ते तसेच सर्व सोईसुविधायुक्त जागतिक दर्जाच्या तोडीस तोड हे शहर उभे राहिले. हीच आपली मुंबई पुढे आपल्या भारताची आर्थिक राजधानीही बनली.
दुसरी घटना - संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दोनच वर्षांनी घडली ती म्हणजे सन १९६२ ��धे आपल्याकडे MIDC ची स्थापना झाली.
यात राज्याच्या कानाकोपऱ्यात तब्बल २२५ इंडस्ट्रीयल कॉंप्लेक्स बनविण्यात आल्या.
यात लहान-मोठ्या उद्योगांसाठी रस्ते, वीज, पाणी तसेच चांगल्या डेव्हलप्ड जमीनी तयार करून दिल्या गेल्या. मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर वाढावा, उद्योग मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात यावेत यासाठीचा अत्यंत महत्वाचा आणि पथदर्शी असा हा निर्णय.
यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उ���्योग तर आलेच पण यामुळे शहरीकरण वाढायला मदतच झाली.
(औद्योगिक क्रांतीत महाराष्ट्राचे योगदान - लिंक)
तिसरी घटना - म्हणजे ९० च्या दशकात महाराष्ट्राने सॅाफ्टवेअर आणि कंप्युटर्सचे
महत्व ओळखून पुणे आणि मुंबईत तयार केलेले सॉफ्टवेअर पार्कस् आणि त्यासाठी बनवलेली स्पेशल पॅालिसी.
पुढे काही वर्षातच भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि आपल्याला डॉट कॅामचा प्रचंड फ़ायदा झाला. मोठ्या प्रमाणावर परदेशा��ून भारतात कामं येऊ लागली.
इथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या त्या अवाढव्या वाढल्याही. पुणे असो की मुंबई दोन्ही ठिकाणी याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
या सॅाफ्टवेअर क्रांतीमुळे एक मोठा नवश्रीमंत वर्ग तयार झाला. त्याला सर्व्ह करायला सर्व्हीस इंडस्ट्री वाढत गेली. पुढे त्यातच अनेक नवउद्यमीही तयार झाले.
त्याच दरम्यान सहकार, शेती, दूग्धव्यवसाय, शेतीपुरक इतर उद्योग वाढत गेले. साक्षरतेचं आणि श���क्षणाच प्रमाणही वाढत गेलं.
मुंबई बहरतच होती, दुसरीकडे इंडस्ट्रीयल ग्रो�� चालूच होती, त्यात सॅाफ्टवेअरमुळे, मॅन्युफॅक्चरिंगमधल्या तगड्या वजनामुळे महाराष्ट्राची गाडी जी सुस्साट सुटली ती थेट बंगाल, तामिळनाडू आणि भारतातील सर्व राज्यांना मागे टाकून थेट पहिल्या नंबरवर गेली.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद,
#SundayThread #मराठी #शहरीकरण #मुंबई #महानगरपालिका
१/२
गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक
प्रफुल्ल वानखेडे यांच्या स्वाक्षरीसह ✍️
आजच मागवा तुमचे पुस्तक : https://t.co/jAxUq9lwnI
सकाळ प्रकाशन वाचक महोत्सव २०२५ 📚
🛒 ₹१००० किंवा त्याहून अधिक खरेदीवर थेट ३०% सवलत!
📚 सकाळ प्रकाशनच्या सर्व पुस्तकांवर २५% सवलत
या जगात ‘समता’ प्रस्थापित करण्यात आणि लोकशाही रूजविण्यात पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. वाचन ही प्रगल���भ समाजासाठीची बेसिक गरज आहे.
पुस्तकं कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ज्ञान द्यायचं काम करतात. आयुष्य समृद्ध करतात.
वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना खूप खूप ��ुभेच्छा!
@wankhedeprafull Bhartamadhye YouTube cha wapar sarvadhik aahe etertaiment aso ki education tumachya var aahe tumhi upyog kasa karun gyayacha shevati mi garaje nusar donhi vaparato almost 40% time from my mobile timing i spend on YouTube
@wankhedeprafull आपल्याकडे बऱ्याच वेळेला स्वतःच्या कंपनीचा चांगला लोगो असावा असेही वाटत नाही
लोगो ही सुरवात असते कोणत्याही मार्केटिंगची
mouth publicity आजही relevant आहे फक्त त्यावर विसंबून राहणे खूप मोठी चूक पण आहे देशात उद्योग धंदे वाढतायत mouth publicity बरोबर मार्केटिंग प्लान पण हवा!
आपल्याकडे बऱ्याच वेळेला स्वतःच्या कंपनीचा चांगला लोगो असावा असेही वाटत नाही
लोगो ही सुरवात असते कोणत्याही मार्केटिंगची
mouth publicity आजही relevant आहे फक्त त्यावर विसंबून राहणे खूप मोठी चूक पण आहे देशात उद्योग धंदे वाढतायत mouth publicity बरोबर मार्केटिंग प्लान पण ह��ा!
प्रवासात खाजगी गाड्यांच्या दर्शनी भागावर (जशी एसटीची पाटी असते) तशी डॅशबोर्डवर “पोलीस, न्यायाधीश, ऑन ड्यूटी - गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कधी इंडीया” या आणि अशा अनेक गाड्या गेल्या दोन दिवसात हायवेवर दिसल्या.
“आयडेंटी क्रायसिस” म्हणावं की भविष्यात येऊ शकणाऱ्या क्रायसिसची पुर्वतयारी म्हणून - “जास्त नादाला लागू नको, ही सायबाची गाडी आहे” हे स���ंगण्याची पद्धत रूजू झालीय का ?
पुर्वी ते दिवे असायचे, ह्यांचे “दिवे लावण्याची” पद्धत बऱ्यापैकी बंद झाली.
आता त्यांच्या गाड्यांची ‘रोषणाई’ गेली पण मनातला’ रोष नाही’ गेला. त्या दिव्यांच्या जागेवर आता या पाट्या आल्यात जणू.
अनेक आजी माजी आमदार,खासदार, जिप, पंचायत समिती त्यांचे नातेवाईक, चेलेचपाटे, अनेक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, काहीच नाही तर मानवाधिकार किंवा तत्सम काही समित्यांच्या अध्यक्षपदाच्या अशा ‘खास’ नेमप्लेट्स बनवून गाड्यांवर लावतात.
याची जशी “आयडेटिंटी क्रायसिसशी” संबंधीत कारण आहेत तशी चिल्लर कारणही आहेत.
जसं की - स्थानिक टोल द्यावा लागू नये, काही वाहतूकीचे नियम तोडलेत तर पोलिसांना दमात घ्यायला बरं पडावं किंवा रस्त्यात गरजेनुसार थोडीफार मुजोरी करता यावी.
प्रश्न असाय की -
तुम्हाला जे करायचंय ते करा आमची काहीच हरकत नाही, तुम्ही सगळीच मंडळी व्हिआयपी बना पण अशा पाडवा, भाऊबीज आणि भर दिवाळीत कोणती “लोकहिताची” कामं करायला अशा पाट्या लावून हिंडताय? सर्वसामान्यांना का घाबरवताय?
तसलं डेंजर डोळे करून का भ्या दावताय?
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
सकाळ प्रकाशन
प्रकाशन सोहळा 'गोष्ट पैशापाण्याची' पाचवी आवृत्ती
पुस्तकाचे लेखक - प्रफुल्ल वानखेडे
लेखकाशी संवाद
अरविंद जगताप (लेखक, दिग्दर्शक)
https://t.co/k49QC5mmmQ
कार्यक्रमाचे अध्यक्ष -
अॅड. दिलीप स्वामी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
वेळ:
शनिवार, ६ जुलै, २०२४ | सायं. ६ वा.