On the auspicious occasion of Kartiki Ekadashi, may the devotion to Lord Vitthal strengthen our faith and fill our lives with positivity and happiness. Heartiest greetings to all on the auspicious occasion of Kartiki Ekadashi!
भक्तीचा वारसा आणि विकासाचा ध्यास घेऊन, आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर वाटचाल करत राहो, हीच विठ्ठल-रखुमाई चरणी प्रार्थना!
प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#कार्तिकी_एकादशी #KartikiEkadashi #पंढरपूर #Pandharpur #Maharashtra
दादा… तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही!
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते पुणे येथे आज लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी स्व. अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेसाठी केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. या भावस्पर्शी सोहळ्यात उपस्थित राहून राजकारणापलीकडचा मित्र, जनसामान्यांचे लाडके 'दादा' माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आजचा हा प्रसंग मनाला अत्यंत भावूक करणारा आहे. या पुतळ्याचे अनावरण करताना आपल्या प्रत्येकाच्या मनात आठवणींचे काहूर माजले आहे. दादांसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत पण, ते आज आपल्यात नाहीत, याचे मोठे दुःख आहे. आजच्या या अत्यंत संवेदनशील आणि भावनिक क्षणी, मी पुणे जिल्हा परिषदेचे मनापासून आभार मानतो. परिषदेने आमच्या अजितदादांचा पुतळा उभारण्याचा आणि येथील प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. अजितदादांनी पुणे जिल्हा परिषदेला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम केले. त्यांनी पुणे जिल्ह्याच्या गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा पोहचवली. या जिल्ह्याविषयी दादांच्या मनात नेहमीच एक विशेष आत्मीयता आणि संवेदनशीलता होती.
कणखर, शिस्तबद्ध, प्रशासनावर विलक्षण पकड असलेला आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता अशी दादांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होती. दादांच्या शब्दकोशात 'हो' आणि 'नाही' हे दोनच स्पष्ट शब्द होते. जे पटले, त्याला ठामपणे 'हो' म्हणायचे आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी जीवाचे रान करायचे आणि जे योग्य नाही, हिताचे नाही, त्याला तोंडावर स्पष्टपणे नकार द्यायचे अशी हिंमत फक्त दादांमध्येच होती. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक अर्थसंकल्प मांडले. कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्यांनी आर्थिक शिस्त कधीही मोडू दिली नाही. विकासकामांवर खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे आणि कामाचा दर्जा सर्वोत्तम असला पाहिजे, हा त्यांचा नेहमीच आग्रह होता. राज्याच्या प्रगतीचा इतिहास लिहिताना दादांच्या कार्याचे सुवर्णपान जोडल्याशिवाय तो कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
अजितदादांच्या जीवनातील सर्वांत प्रेरक गुण म्हणजे त्यांची अफाट शिस्त. पहाटे 6 वाजताच कामासाठी सज्ज होणारे दादा, 7 वाजता कामकाज सुरू करून 8 वाजता मंत्रालयात हजर राहायचे. वेळेची ही शिस्त त्यांनी आयुष्यभर जपली. राज्यातील अनेक प्रकल्पावर आजही त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटलेला दिसतो. वरवर कणखर आणि कठोर वाटणारे दादा अंतःकरणाने तितकेच हळवे, प्रेमळ आणि माणसांवर जीवापाड प्रेम करणारे होते. आपल्या जवळच्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते. आम्हालाही त्यांचा एक भक्कम आधार होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अतिशय समर्थपणे आणि उत्तमरीत्या काम करत आहेत, मात्र राज्यावर ओढवलेल्या या भीषण दुष्काळाच्या संकटात मला पदोपदी दादांची उणीव जाणवते.
अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर व्हावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.
अजितदादा यांच्यासारखा दुसरा नेता पुन्हा होणे नाही आणि त्यांच्यासारखा विश्वासू सहकारी मिळणेही अत्यंत कठीण आहे, त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, मात्र त्यांच्या विचारांतून, अनुभवांतून आणि कार्यातून प्रेरणा घेऊन निश्चितच चांगले कार्य करू शकतो. दादांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया. तसेच एकजुटीने, समर्पणाने त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार पार्थ पवार, आमदार दिलीप वळसे पाटीलजी, पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah@mieknathshinde@SunetraA_Pawar@mohol_murlidhar@ChDadaPatil@Jaykumar_Gore@bharanemamaNCP@madhurimisal@iYogeshRKadam@parthajitpawar@RaviDadaChavan@Dwalsepatil@MDNagpure
#Maharashtra #Pune #AjitPawar
मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत आज पुण्यात NHEC मल्टी स्टेट सहकारी संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना साखर कारखाना यंत्रसामग्री, CBG आणि डेअरी उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. 'भारत टॅक्सी'मुळे सारथींना सन्मानाने रोजगाराची संधी मिळेल, तर सहकारी संस्थांच्या पश्चिम विभागीय कार्यालयामुळे त्यांचे कामकाज अधिक सुलभ होईल. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून शेतकरी, सहकारी संस्था आणि सामान्य नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे!
सहकार क्षेत्राला नवी दिशा देत त्याचा लाभ शेतकरी, सारथी आणि सहकारी संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमितभाई आपण सातत्याने घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मनःपूर्वक आभार!
आपल्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला मिळत असलेली नवी ऊर्जा महाराष्ट्रासाठी निश्चितच महत्त्वाची आहे.
@AmitShah
#Maharashtra #Pune
जय जोहार 🙏
भगवान बिरसा मुंडा की जयंती के अवसर पर महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, उप राष्ट्रपती मा. सीपी राधाकृष्णन जी और लोकसभा अध्यक्ष ओम बिरला जी इन्होंने संसद परिसर स्थित प्रेरणा स्थल पर पुष्पांजली अर्पित की।
इस अवसर पर आदीवासी कलाकारों ने भारत की समृद्ध जनजातीय विरासत और पारंपरिक कलाओं को खूबसूरती से सादर किया।
@rashtrapatibhvn@narendramodi@VPIndia@ombirlakota
#JanjatiyaGauravDiwas
Honouring Late Ashok Singhal ji’s contribution to the Ram Janmabhoomi Movement
Attended the 'Shri Ram Katha', organised to mark the birth anniversary year of Former International President of Vishwa Hindu Parishad Ashok Singhal ji along with Union Minister Nitin Gadkari ji.
Ashok Singhal ji united the Hindu community and gave the Ram Janmabhoomi movement a clear direction and nationwide momentum. His efforts in bringing saints and religious leaders from diverse traditions together at the 1984 Dharma Sansad, where the resolve to build a temple dedicated to Prabhu Shri Ram at his janmabhoomi was adopted, remain a defining part of this historic movement.
He firmly believed that while Hindu society may have diverse sects, ideologies, beliefs and forms of worship, there must be no discrimination; unity must always prevail. Through his leadership and lifelong struggle, he inspired millions and helped transform the aspiration of a Ram Mandir in Ayodhya into a historic reality.
Today, as we pay tribute to Ashok Singhal ji on his birth centenary, let us carry forward his legacy and draw inspiration from the ideals and values of Prabhu Shri Ram.
Union Minister Nitin Gadkari ji, MoS Adv. Ashish Jaiswal, MLA Kirtikumar (Bunty) Bhangdiya, Padma Bhushan Didi Maa Pujya Sadhvi Ritambharaji and other dignitaries were present.
@narendramodi@nitin_gadkari@Ashishjaisw3Adv@DidiRitambhara
#Maharashtra #Nagpur #AshokSinghal #ShriRamKatha #JaiShriRam
LIVE | विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'श्रीराम कथा' समारंभ
🕕 संध्या. ६.१२ वा. | १४-११-२०२६📍नागपूर.
#Maharashtra#Nagpur https://t.co/ncux5u89Ur
A proud milestone for Maharashtra’s coastline! 🌊
A total of 3 beaches have been given Blue Flag certification for the first time in Maharashtra. Ladghar and Guhagar beaches in Ratnagiri district and Shrivardhan beach in Raigad district have earned the prestigious International Blue Flag certification for the 2026–27 season.
The Blue Flag is a prestigious international recognition awarded to beaches that meet high standards of cleanliness, water quality, environmental protection and visitor safety, while promoting responsible and sustainable tourism. This recognition will open up new opportunities for coastal tourism, local employment and economic growth while ensuring that our natural treasures remain protected for generations to come.
Heartiest congratulations to the people of Konkan and Maharashtra!
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! 🌊
रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर, गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या 3 समुद्रकिनाऱ्यांना 2026-27 या हंगामासाठी प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग' मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राचा प्रथमच या जागतिक यादीत समावेश झाला आहे.
स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता यांसारख्या उच्च मानकांची पूर्तता करणाऱ्या तसेच जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांना हा प्रतिष्ठित 'ब्लू फ्लॅग' सन्मान दिला जातो. हा सन्मान महाराष्ट्राच्या सुंदर किनारपट्टीचे जतन करण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे आपला नैसर्गिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासोबतच पर्यटन, स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील.
सर्व कोकणवासियांचे व महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन!
#BlueFlag #Maharashtra #CoastalConservation #SustainableTourism
Wishing everyone a heartfelt and joyous Bhaubeej!
May the beautiful bond between brothers and sisters continue to flourish with love, affection, and togetherness.
बहीण-भावाच्या अतूट नात्यातील जिव्हाळा जपणारा सण, 'भाऊबीज'.
माझ्या सर्व बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#भाऊबीज #दिवाळी #Bhaubij #HappyDiwali #Diwali2026 #Maharashtra
दिवाळीचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यातच आहे!
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील शेतकरी अरुणाताई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी काल मुक्काम केल्यानंतर आजची दिवाळी पहाट अधिकच प्रसन्न झाली. गावाकडच्या शांत वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवता आला. गावकऱ्यांचा जिव्हाळा आणि त्यांची आपुलकी मनाला विशेष आनंद आणि समाधान देणारी होती.
सकाळी उठल्यानंतर दिवाळीनिमित्त अभ्यंगस्नान केले. अरुणाताईंनी प्रेमाने भाऊबीज केली, तर घरातील सर्व महिलांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून औक्षण केले. प्रत्येक औक्षणात माझ्या लाडक्या बहिणींचे प्रेम, त्यांच्या प्रार्थना आणि आशीर्वाद सामावलेले होते. हा स्नेह आणि आपुलकीचा अनुभव मनात कायमचा जपून ठेवण्यासारखा आहे.
पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी तालुक्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता या प्रश्नांवर चर्चा केली. हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावांना सरकारचे संपूर्ण सहकार्य राहील. तसेच जलसंधारणाची कामेही प्राधान्याने हाती घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, विशेष बाब म्हणून झाडे जगविण्यासाठी जिथे विंधन विहिरींची गरज आहे, तिथे केवळ शेतीकामासाठी विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी येत्या 15 डिसेंबरपर्यंत उठविण्यात आली आहे. विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी खोदण्यास परवानगी देणे अडचणीचे असले, तरी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पशुदवाखान्यांची आवश्यकता तपासून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
जलजीवन मिशनअंतर्गत निधीअभावी काही कामे अपूर्ण राहिली आहेत. ही कामे आता प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. ज्या ठिकाणी 75 टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत, तिथे तातडीने निधी उपलब्ध करून उर्वरित कामे मार्गी लावली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान हा शेतकऱ्यांसमोरील गंभीर प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येईल. विशेषतः जंगलालगतच्या शेतांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांमधील गाळ काढून तो शेतीत टाकण्याची कामेही सुरू करण्यात आली आहेत.
पुढे नरखेड तालुक्यातील सोनेगाव रिठी येथे शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे शेतकरी बाबुराव काळे यांच्या शेतातील पिकांची स्थिती जाणून घेतली. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन सरकारने मदतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी यासाठीही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कठीण काळात माझा शेतकरी बांधव एकटा नाही. या संकटातून सावरण्यासाठी आणि पुन्हा उभे राहण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होता आले, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रेम आणि आशीर्वाद अनुभवता आले. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मदतीचा विश्वास देता आला. यामुळे आजची दिवाळी खऱ्या अर्थाने संस्मरणीय आणि समाधान देणारी ठरली. बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, त्याच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी आणि त्याच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण व्हावा, यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. राजीव पोतदारजी, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूरजी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@cbawankule@rajeev_potdar@AshishRDeshmukh
#Maharashtra #DiwaliWithFarmers #Nagpur
Heartiest birthday greetings to Bharat Ratna and veteran BJP leader, former Deputy Prime Minister of India, Shri Lal Krishna Advani ji, as he steps into his 100th year!
His invaluable contribution to the nation and decades of dedicated public service continue to inspire generations.
Wishing him good health and a long life!
भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, भारताचे माजी उपपंतप्रधान, भारतरत्न, भाजपा नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आज ते वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. राष्ट्रसेवेतील त्यांचे योगदान आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#लालकृष्ण_अडवाणी #LalKrishnaAdvani #HappyBirthdayLKAdvani #Maharashtra
Heartiest greetings to all on Laxmi Pujan and Diwali!
May Goddess Laxmi dispel the shadow of drought over Maharashtra and bless our state with happiness, prosperity, and abundance.
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
माझ्या महाराष्ट्रावर पसरलेलं दुष्काळाचं मळभ दूर होऊ दे आणि राज्यात सुख-समृद्धी नांदू दे, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना...
#लक्ष्मीपूजन #शुभ_दीपावली #दिवाळी #HappyDiwali #Diwali2026 #DiwaliWithFarmers #Maharashtra
भारतीय राजनीति के वरिष्ठ नेता, पूर्व उप प्रधानमंत्री, भारतरत्न एवं भाजपा के वरिष्ठ नेता आदरणीय लालकृष्ण आडवाणी जी इनकी राष्ट्रसेवा की लंबी यात्रा, उनका समर्पण, वैचारिक निष्ठा और राष्ट्रनिर्माण में अतुलनीय योगदान नई पीढ़ियों के लिए सदैव प्रेरणादायी है।
उनकी शतकमहोत्सवी यात्रा के इस महत्वपूर्ण पड़ाव पर, उनके प्रेरणादायी जीवनप्रवास और राष्ट्रनिर्माण में उनके अतुलनीय योगदान को रेखांकित करने वाला मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका विशेष लेख 'आडवाणी जी: एक शताब्दी की ओर बढ़ती प्रेरक यात्रा' अवश्य पढ़ें!
@narendramodi
#Maharashtra #HappyBirthdayLKAdvani
भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न, भाजपा नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांचा राष्ट्रसेवेचा प्रदीर्घ प्रवास, त्यांचे समर्पण, वैचारिक निष्ठा आणि राष्ट्रउभारणीतील योगदान नव्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या शतकमहोत्सवी वाटचालीच्या उंबरठ्यावर, त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आणि अतुलनीय योगदानाचा वेध घेणारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हा विशेष लेख... नक्की वाचा!
@narendramodi
#Maharashtra #HappyBirthdayLKAdvani
भारतमाता के प्रति समर्पण,
भाजपा के संस्कार,
आपकी सदैव प्रेरणा और मार्गदर्शन
और हमारे अन्नदाता के आशीर्वाद,
दीपावली का और दूसरा भला क्या अर्थ होगा?
प्रेरक शब्दों के लिए आपका हृदयपूर्वक धन्यवाद मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 🙏
@narendramodi#Maharashtra#Nagpur #DiwaliWithFarmers
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
दिवाळीनिमित्त लोहारी सावंगा, नागपूर येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. यावेळी घरातील चिमुकली नारायणीला कडेवर घेतले, तिच्यासोबत काही क्षण घालवले. तिच्या निरागस डोळ्यांनी, गोड बाललीलांनी मन अगदी प्रसन्न झाले. हे क्षण, आणि या कुटुंबाने दिलेले प्रेम मनात कायम जपून ठेवण्यासारखे आहे.
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
अन्नदाता सुखी भव!
दिवाळीचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यातच आहे!
नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी स्नेहभोजन केले आणि बालपांडे कुटुंबीयांसमवेत गप्पा मारल्या.
#Maharashtra#Nagpur#DiwaliWithFarmers
Humble tributes to Bankim Chandra Chattopadhyay, the legendary Indian poet who gave India the immortal national song, Vande Mataram, which ignited the flame of revolution during India's freedom struggle and completes 151 years today!
भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक, आपले राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'.
7 नोव्हेंबर 1875 रोजी प्रतिभावंत साहित्यिक 'बंकिमचंद्र चट्टोपाध्याय' यांच्या काव्यरचनेतून साकारलेल्या, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताला, आज 151 वर्ष पूर्ण होत आहेत!
समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
#वंदे_मातरम् #VandeMataram #बंकिमचंद्र_चट्टोपाध्याय #Maharashtra