लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचा लोकसेवेचा वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व, आदरणीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात कोकणाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेले दमदार नेतृत्व मा.श्री. अनिकेतभाई तटकरे यांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
कोकणावर आलेल्या प्रत्येक संकटात स्वतः छातीची ढाल करून पुढे येणारे नेतृत्व म्हणून मा.श्री. अनिकेतभाई तटकरे यांचे कार्य मी जवळून अनुभवले आहे. कर्तृत्वाची हीच परंपरा पुढे नेत त्यांची आगामी कारकिर्दही यशस्वी ठरावी याच शुभेच्छा. @SunetraA_Pawar@ATatkare@SunilTatkare
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन!
आजचा दिवस आपणास कर्तव्याची जाणीव करून देतो, की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. भ्रष्टाचाराचा नाश करत, पारदर्शकतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन पुढाकार घेऊया.
#WorldAntiCorruptionDay #BhrashtacharVirodhiDin
ज्ञान, भक्ती, आणि संतसाहित्याचे महान संत श्री संत नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात भक्तीचे बीज रोवून त्यांनी जीवनात प्रेम, समानता, आणि आदर यांचा संदेश दिला. त्यांच्या कीर्तनातून आणि अभंगातून समाजाला सतत मार्गदर्शन मिळत राहील. संत नामदेव महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन!
राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माननीय श्री राजनजी साळवी साहेबांच्या प्रचारादरम्यान इसवली गावातील बोलयेवाडी मध्ये आढावा बैठक घेतली. तसेच त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव निमित्ताने ग्रामदैवत श्री नवलादेवी यांचे दर्शन घेतले..!
#Election24 #ShivsenaUddhavBalasahebThackeray
@ShivSenaUBT_@uddhavthackeray@AUThackeray
आयुष्यातून नकारात्मकता, अनारोग्य, अज्ञानाचा नरकासुर नष्ट होवो व ज्ञानाच्या प्रकाशात आपले जीवन उजळून जावो. नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#दिवाळी#दिवाळी2024#नरक_चतुर्दशी
आरंभ महविजयाचा....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. डॉ.राजनजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आज लांजा - राजापूर विधानसभा मतदारसंघातील भांबेड कोळेवाडी येथे जाऊन प्रचार केला. तसेच स्थानिकांशी यावेळेस संवाद देखील साधला. लांजा राजापूर मधील जनतेच्या पाठीशी शिवसेना कायम उभी असेल असा ठाम विश्वास जनतेला दिला. तसेच प्रचारादरम्यान भांबेड कोळेवाडी येथील स्थानिक रहिवाशांनी स्वागत करून आशीर्वाद दिले...!
#ShivsenaUBT #lanjarajapur
@ShivSenaUBT_@AUThackeray@OfficeofUT
राजापूर - लांजा - साखरपा विधानसभेचे उमेदवार आमदार श्री.राजनजी साळवी यांच्या प्रचारार्थ काल शिवसेना भवन, मुंबई येथे पार पडलेल्या मुंबईस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना सचिव माजी खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार राजनजी साळवी, लांजा तालुक संपर्क प्रमुख जगदीश जुलूम, राजापूर तालुक संपर्क प्रमुख पांडुरंग उपळकर, संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख राजेश शेलार व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..!
@ShivSenaUBT_
#Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray
अबालवृद्धांना आपल्या शब्दांमधून जीवनाचा परिपूर्ण आनंद देणारे महान साहित्यिक ग.दि.माडगूळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#gadimadgulkar#gadima#गदिमाडगूळकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीच्या अनुषंगाने चालणारा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका प्रसार माध्यमांच्या मार्फत मांडण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांचे मनापासून आभार..!!
आदरणीय दादा , मी आपल्याला अपेक्षित असे कार्य प्रवक्ते पदावर असताना पार पाडेल असा या निमित्ताने शब्द देतो.
@AjitPawarSpeaks@SunilTatkare
#आभार_धन्यवाद #राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष #लांजा #राजापूर #प्रवक्तेपदीनिवड #अजितदादा_पवार #कोकण #महाराष्ट्र
📍मुंबई , महाराष्ट्र प्रदेश कार्यालय , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालय , मुंबई येथे सोशल मीडिया सेलच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन ,कार्यकर्त्यांना संबोधित केले.
नव्या जबाबदारी बद्दल महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्री ना.आदिती ताई तटकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी विशेष अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल मध्ये समन्वय साधून , सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यानिमित्ताने उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केले.
याप्रसंगी , युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,सोशल मीडिया चे सुदर्शन जगदाळे,प्रदेश समन्वयक डॉ.कपिल झोटिंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
#thanksyou #आभार_धन्यवाद
#राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी #NCP #सोशलमीडिया
@mahancpspeaks@iAditiTatkare@paranjpe_anand
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने च्या नावाखाली
@samant_uday रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांकडून केला जातोय लाडक्या भावाचा छूपा प्रचार
महायुती सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून कौटुंबिकीकरण चालू आहे याची प्रचिती राजापूर व लांजा येथे पार पडलेल्या कार्यक्रमातून येते.
महायुती सरकारने सुरु केलेल्या योजनेसाठी घटकपक्षांना डावलत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेखाली आपला लाडका भाऊ जबरदस्तीने जनतेवर लादण्याचा प्रकार
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@SunilTatkare@cbawankule
रत्नागिरी-सिंधुदुर्गने निवडला योग्य खासदार..!!
प्रथमतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल मा.राणे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!
राणे साहेबांना मिळालेला महाविजय हा महायुतीच्या घटक पक्षांच्या अभूतपूर्व एकजुटीचा आहे.
राणे साहेब हे गेल्या टर्म प्रमाणेच केंद्रात मंत्रीपदी विराजमान होऊन , कोकणच्या विकासाची गाडी अधिक जोरकसपणे पुढे घेऊन जातील हा विश्वास वाटतो..!!
सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार ..!!
#Congratulations #अभिनंदन
#खासदार2024 #नारायणराणेसाहेब
@MeNarayanRane
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनील तटकरे साहेब यांची रायगड लोकसभेच्या खासदार पदी प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!
रायगड लोकसभेतील मतदारांनी 'पूर्णवेळ' उपलब्ध असणाऱ्या आणि जनतेच्या 'हाकेला' धावून जाणाऱ्या , खासदाराला पुन्हा एकदा संधी दिली आहे.
तटकरे साहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि रायगड लोकसभेतील मतदारांचे मनःपूर्वक आभार ..!!
#Congratulations #अभिनंदन #खासदार2024 #सुनीलतटकरेसाहेब
@SunilTatkare
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी होऊ घातलेल्या कोकण विभागातील निवडणुकीसाठी महायुतीतर्फे श्री निरंजनजी डावखरे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि विजयासाठी शुभेच्छा..!
@niranjandtweets#konkangraduateconstituency#graduatesconstituency #election #NDA #Mahayuti #NiranjanDavkhare
नमस्कार
येत्या ७ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे मतदान आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माननीय नारायणरावजी राणे साहेब हे आपल्या सर्वांच्या समोर एक सक्षम उमेदवार म्हणून उभे आहेत. साहेबांचे चिन्ह आहे ‘कमळ’ आणि अनुक्रमांक आहे २ या निशाणी शेजारचे बटण दाबून आपण मा.नारायण राणे साहेबांना आपल्या कोकणाचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी हि नम्र विनंती.
आपला
अजित यशवंतराव
महायुती - समन्वयक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.
#लोकसभा2024 #LokSabhaElection2024 #NarayanRane #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #मतदान2024
@MeNarayanRane@BJP4Maharashtra@BJP4India
भवसागर तरण्यासाठी, भक्तांची जीवननौका पार करण्यासाठी सदैव भक्तांच्या पाठीशी असणारी शक्ती ब्रह्मांडनायक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#श्रीस्वामीसमर्थ#विनम्रअभिवादन#अक्कलकोट#पुण्यतिथी