मराठी माणसाच्या आयुष्यात भरघोस योगदान देणाऱ्या शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या शिवसेना भवनमधील नूतन कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले.
@ShivSena@OfficeofUT@AUThackeray
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) मध्ये 1184 रिक्त पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. त्याबाबत व्यवस्थापनाने जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. या नोकरभरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावे.
स्थानीय लोकाधिकार समितीचे 'शिवराय संचलन' आज पारंपारिक पध्दतीने संपन्न झालं. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात मुंबईतील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या फोर्ट भागातून या संचलनात रिझर्व बॅंक ते गेट वे आॅफ इंडिया पर्यंत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
१९७८ पासून आजतागायत ४४ वर्षे केवळ कोरोना निर्बंधांमुळे खंडीत झालेला शिवराय संचलन सोहळा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. शिवरायांच्या अविष्काराचे दर्शन या सोहळ्यातून दक्षिण मुंबईत स्थानीय लोकाधिकार महासंघातर्फे घडवले जाते.
शिवसेना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित 'शिवराय संचलन' शुक्रवार दिनांक २६ मार्च २०२२ रोजी दुपारी ठिक ३ वाजता रिझर्व बँक ऑफ इंडिया येथून सुरु होईल.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘मराठी भाषा दिन सोहळा’ बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरिन लाईन्स येथे संपन्न झाला. युवासेनाप्रमुख @AUThackeray तसेच शिवसेना नेते मराठी भाषा मंत्री @Subhash_Desai या सोहळ्याला उपस्थित होते.
शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आयोजित केलेल्या मराठी भाषा दिन कार्यक्रमास उपस्थित होतो. यावेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना वंदन केले.
#मराठी_भाषा_दिवस
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
रविवार, २७ फेब्रुवारी २०२२, सकाळी ९.३० वा.
बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरिन लाईन्स, मुंबई.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध लोकाधिकार समित्यांमधून जमा करण्यात आलेल्या ₹१५ लाखाचा धनादेश मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडे 'मुख्यमंत्री सहायता निधीस' सुपूर्द करण्यात आला. यावेळी अध्यक्ष @GajananKirtikar, सरचिटणीस @ianildesai, उपाध्यक्ष @PotnisVilas व पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा दिन सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार @AGSawant यांचा @ShivsenaSLS च्या वतीने सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा दिवसानिमित्त मुख्यमंत्री @OfficeofUT यांना महासंघाच्या वतीने m शुभेच्छा देताना महासंघाचे सरचिटणीस खासदार @ianildesai यांच्यासोबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा सस्नेह भेट दिली.