#पार्ले#महोत्सव#रौप्यमहोत्सवीपार्लेमहोत्सव
आपण सर्वजण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, तो आपल्या सर्वांचा लाडका पार्ले महोत्सव यंदा आपले रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाला आहे!
येत्या १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२६ दरम्यान हा भव्य महोत्सव विविधरंगी आणि वैविध्यपूर्ण स्पर्धांची मेजवानी घेऊन आपल्या भेटीला येत आहे.
आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे, आज मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पार्ले महोत्सवाच्या कार्यकर्त्यांसमवेत २५ व्या पार्ले महोत्सवाचा पहिला प्रवेश अर्ज 'श्री पार्ले विनायक' चरणी अर्पण करून शुभाशिर्वाद घेतले आणि महोत्सवाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते श्री. पुष्कर श्रोत्री, सुविख्यात पार्श्वगायिका श्रीमती वैशाली सामंत, 'भारत श्री' श्री. शाम रहाटे तसेच पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे श्री. अनिल गानू व पार्ले हिंदू देवालय मंडळाचे विश्वस्त श्री. शिरीष गानू यांची सन्मानीय उपस्थिती लाभली.
तसेच, वैयक्तिक, समूह आणि दिव्यांग विशेष स्पर्धांचे पहिले प्रवेश अर्ज स्वतः भरून या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी हर्षद शंकर गोठणकर (दिव्यांग कलाकार व क्रीडापटू), सोहम फाटक (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) आणि नताशा उदय जोशी (शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रायफल शूटर) हे गुणवंतांचे प्रतिनिधी विशेष उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि सहयोगातून हा ऐतिहासिक २५ वा पार्ले महोत्सव नक्कीच यशस्वी होणार आहे.
तरी, आपण सर्वांनी भा.ज.पा. जिल्हा कार्यालय, चित्तरंजन रोड, विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले महोत्सवाच्या कार्यालयाला अवश्य भेट द्यावी आणि विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती!
अधिक माहितीसाठी भेट द्या:
Website:
https://t.co/Sz2EuXDy6a
Facebook:
https://t.co/R3CrtV70kh
Instagram:
https://t.co/gFgtQjBf2C
Youtube:
https://t.co/pbgLKeAr3x
राजकीय विरोध आणि केवळ प्रसिद्धीसाठी केला जाणारा खटाटोप यात मोठा फरक असतो. रोहित पवार यांच्याकडून सातत्याने होणारी बेताल वक्तव्ये, माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यावर केलेले निराधार व सनसनाटी आरोप आणि एखाद्या दुर्घटनेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक चर्चेचा स्तर खालावत आहे.
जेव्हा स्वतःच्याच पक्षातील सहकारी आणि कार्यकर्ते तुमच्या भूमिकांना गांभीर्याने घेणे बंद करतात, तेव्हा चर्चेत राहण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे असते. केवळ वाद निर्माण करून राजकीय अस्तित्व टिकवता येत नाही आणि निराधार आरोप करून जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही.
@RRPSpeaks, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर एका मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातील मोठ्या पदांच्या महत्त्वाकांक्षेमागे धावण्यापेक्षा, जनतेने ज्या जबाबदारीसाठी तुम्हाला निवडून दिले आहे, त्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उचित ठरेल
ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सुवर्णभरारी! 🥇🇮🇳
महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या ईशा सिंग, मनू भाकर आणि दिव्या सुब्बाराजू यांचे हार्दिक अभिनंदन!
अचूक निशाणा, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे!
#ISSFWorldChampionships #IndianShooting #TeamIndia #ProudMoment #Cheer4India
एका बाजूला राजकीय व्यस्तता, तर दुसरीकडे दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचलेले आपले देवाभाऊ! 🌾🪔
बळीराजाशी नातं केवळ शब्दांचं नाही, तर विश्वासाचं आणि आपुलकीचं!
#DevendraFadnavis#DiwaliWithFarmers#Maharashtra#Nagpur
अराजकतेच्या राजकारणातून लोकशाहीला आव्हान!
काँग्रेसच्या भूमिकेवर परखड भाष्य करत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या लेखातून लोकशाही मूल्ये आणि संविधानिक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
लोकशाहीचा सन्मान, संविधानावरील निष्ठा आणि देशहिताची जाणीव यांसाठी हा लेख प्रत्येकाने आवर्जून वाचावा!
Link: 👇🔗
https://t.co/RDtZS5aKDk
#DevendraFadnavis #लोकशाही #भारतीयसंविधान #Maharashtra
एकेकाळी ज्या भाषेचा संबंध गुंड-मवाल्यांशी जोडला जात होता, आज काँग्रेसचे अध्यक्ष त्याच भाषेचा वापर करत आहेत. त्यांचे युवराज याच संतापातून कधी रस्त्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करतात, तर कधी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांशी धक्काबुक्की करतात. त्यांची संपूर्ण कार्यपद्धती माफियांच्या प्रवृत्तीसारखी झाली आहे. हा राजकीय पक्ष नसून माफिया टोळीच अधिक वाटतो.
तसे पाहता, खर्गे जी यांच्या विधानातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा यांनी दहा वर्षे सर्व प्रकारचे डावपेच अवलंबले; मात्र काँग्रेसला सत्तेबाहेर जावे लागले. आज त्यांचा मुलगा हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी व्हिएतनाम, तर कधी कोलंबियामध्ये भटकंती करत आहे.
देशातील जनता तुमचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही!
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम आज विलेपार्ले विधानसभा, वॉर्ड क्र. ८२ येथील कार्यकर्त्यांसमवेत ऐकला.
याप्रसंगी संजय वाकोडे, सचिन कोंडे, चंद्रप्रकाश दधीच आदी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
#मनकीबात#MannKiBaat#विलेपार्ले#वॉर्ड82#BJP#भाजपा #NarendraModi
देशाचे माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करणे, सीमांचे संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आपले कार्य देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#AmitShah #HappyBirthdayAmitShah #राष्ट्रसेवा #NationFirst
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कार्यामूल्यांकनासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित समितीच्या पहिल्या बैठकीस उपस्थित राहिलो.
या बैठकीत अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासोबतच आगामी नियोजन, आवश्यक सुधारणा आणि पुनर्विकास प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, या प्रक्रियेला अधिक गती मिळावी आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आवश्यक सूचना मांडल्या.
बैठकीस गृह निर्माण विभाग व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. असीमकुमार गुप्ता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, नगर रचना संचालक श्री. जितेंद्र भोपळे, वास्तुविशारद सलोनी देवधर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#झोपडपट्टीपुनर्विकास #महाराष्ट्र #SlumRehabilitation #UrbanDevelopment #Maharashtra
#SRA #PerformanceAudit #Commitee
@mybmcWardKE it's almost a month chakala area including Dr Charat Singh colony hardly any water supply... every alternate day we need to order for tanker & last two days not a single drop of water supply...what's happening ,is anyone taking accountability of this.
@mybmc If lajes are overflow then why there is no water supply at KEast whole chakala area and Charat Singh colony yesterday and your disaster room is pathetic no response or they don't have any information even after making several calls
मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 70 व 71 मधील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत SIR चा आढावा घेऊन पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नगरसेवक अनिष मकवानी, नगरसेवक मिलिंद शिंदे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#BJP#ShaktiKendra#BoothStrengthening#SIR#VileParle#Mumbai #OrganizationFirst #TeamWork #BJPMumbai #JanSampark #BharatiyaJanataParty
विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प! 🇮🇳
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील यशस्वी १२ वर्षांच्या निमित्ताने, प्रबोधनकार क्रीडा संकुलाचे अध्यक्ष श्री. अरविंद प्रभू यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान केंद्र व राज्य सरकारने जनकल्याण, विकास आणि लोकहितासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका त्यांना सुपूर्द केली. विविध विकासकामे आणि लोकाभिमुख उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली.
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा हा प्रवास अधिक वेगाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार! 🪷🇮🇳
#12YearsOfModiGovernment #ViksitBharat #SevaSushasanGaribKalyan
Thanks to note the change Smita ji.
We worked on Milan subway water logging for around 15 years since 2000.
We identified 12 works right from Parle east and west to Santacruz west so that rain water could flow smoothly.The work started when I was corporator.
When Jyoti Alavani became corporator, she carried out the most difficult work of construction of new Shradhanand Nala which was a gamechanger.
Also,lateron she strengthened the entire SWD system ensuring fast water retention in vile parle east.
Thus,since 2015 Milan subway is out of Breaking News !
मा. रविदादा चव्हाण यांच्या यशस्वी नेतृत्वाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपले समर्पित नेतृत्व, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अशाच नव्या उंची गाठत राहो. आगामी काळात आणखी अनेक यशस्वी टप्पे गाठत समाजसेवा आणि विकासाच्या कार्यात नवे मानदंड प्रस्थापित करावेत, हीच सदिच्छा.
#RavindraDada_Varshapurti #PradeshAdyakshRaviDada