आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.
एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता 'जात' हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये.
मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.
मुळात आयआयटी असो की त्याच्या आधीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असोत या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात, त्यातून निवड झाली की अभ्यासाचं ओझं, मग कॅम्पस सिलेक्शनमध्ये काय होईल याचा ताण. त्यात आयआयटी असो की आयआयएम असो पूर्वीसारखे कॅम्पस निवडीत उत्तम पगार मिळत नाही. बरं हे नैराश्य फक्त आयआयटी विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही तर ते सर्वत्र आहे. अगदी कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर्स, इंजिनिअर्सपर्यंत सगळ्यांना याचा ताण आहे. या नैराश्यातून साहिलने आत्महत्या केली. त्यामुळे या एकूणच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून ते बदलायचं? का आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची आणि त्याला जाब विचारणाऱ्याची जात काढत बसायची.
प्रश्न हे सरकार का ते सरकार नाहीच आहे. गेल्या ३०,४० वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या नादात आपण पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अपरिमित नुकसान केलं आहे. त्यात आमूलाग्र बदल आणले पाहिजेत. याची सुरुवात नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनातून होत आहे असं वाटत असताना हा प्रकार पुढे आला. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला कारण तुमचा मुद्दा हा व्यवस्थेतील दोषांवर उपाय हवा यासाठी होता. तुमचं आंदोलन हे याच मार्गाने पुढे चालू राहायला हवं. कारण तसं राहिलं तर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, काही कृती पण करावी लागेल. आणि सरकारला हे करायचं आहे का ? असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर जात धर्म ही अमोघ अस्त्र त्यांच्याकडे आहेतच. एकदा जात धर्म आणला की विषय भरकटवायला सोपा होतो. असल्या भानगडीत कोणीच पडू नका.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी कौन्सिलिंगची व्यवस्था, चोवीस तास सायकिऍट्रिस्टची उपलब्धता, तक्रार केली तर ती खरंच सोडवली जात आहे यातली पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली तर त्याच्यावर कारवाई करताना तो खचणार नाही अशी व्यवस्था या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाची खरी दिशा हीच असली पाहिजे. शिक्षणव्यवस्थेतील दोष दुरुस्त करण्यासाठीच हे आंदोलन पुढे गेलं, तर सरकार आणि प्रशासनाला त्यावर उत्तरं द्यावी लागतील आणि कृतीही करावी लागेल.
सामान्य माणसाची मोक्याची जमीन असते..
आणि त्यावर काही गुंड लोक
त्यांच्या मोठमोठ्या ओळखी वापरून
कब्जा करायचा प्रयत्न करत असतात..
तशी ही जुनीच गोष्ट..
पण आज ही अशीच परिस्थिती आहे..
सगळ्या टाटा कंपन्यांची मालक असलेल्या
" टाटा सन्स " ह्याबाबत..😡
ही असली सरकारी ढवळाढवळ स्वतःच्या देशातल्या इतक्या मोठ्या कंपन्याबाबत पाहून..
कोणत्या फॉरेनच्या कंपनीला भारतात पैसा गुंतवावा वाटेल ?!😏🤬
सगळ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची
नासाडी चालवलीय ह्या नीच लोकांनी..🤬
ह्यातून बाहेर यायला किती वर्ष लागतील कोण जाणे..😑
खरं आहे पंत आता ठाकरेंचा तत्काळ राजीनामा घेऊन पंतांना 21 लाखांच्या बेडवरून उठवून सक्षम विरोधी पक्ष नेत्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर धाडले पाहिजे...!!
#ओलादुष्काळ
नवीन नवखा सामान्य घरातील कोणी आमदार झाला तर लगेच सोयाबीन फेक माती फेक करतात
याच शेतकऱ्यांच्या गांधीत दम असेल तर असेच सोयाबीन ओमराजे आणि राणा पाटील यांच्या अंगावर फेका म्हणावं
ओमराजे aani राणा पाटील यांच्या तर पिढ्यांन पिढ्या सत्तेत आहेत
उगा गरीब आमदाराला टार्गेट करतात 😡😡
दरम्यान राज ठाकरेंनी फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला ज्याची चर्चा महाराष्ट्रात झाली नाही.
राज ठाकरेंनी असं म्हणलं की "माझ्याकडे मुलांसाठी गणपती आला. दीड दिवस असतो. विसर्जन झालं की घर खायला उठतं. रिकामी जागा बघवत नाही. उदास वाटतं. उदास वाटत असेल तर हे लोक विसर्जन मिरवणुकीत नाचू कसे शकतात? नाचायचं कशासाठी"?
भावनेच्या पातळीवरचा हा मुद्दा आहे. एरवी उठसूठ ज्यांच्या भावना दुखतात त्यांच्या भावना त्यांचा गणपती बाप्पा विसर्जित होत असतांना काय असतील? त्यांना वाईट वाटत नसेल तर त्यांचं गणपती बाप्पावरचं प्रेम खरं मानायचं की मिरवणुकीवर खरं प्रेम आहे असं समजायचं? असा हा मुद्दा आहे.
विसर्जन हा खरं तर विरहाचा प्रसंग आहे त्यावेळी सेलेब्रेशन कसं काय होऊ शकतं हा खरंच मुद्दा आहे.
एक विनोद सांगितला जायचा त्याची आठवण झाली. पोहता न येणारा एक माणूस नदीत बुडायला लागतो. गणपतीचा धावा करतो. गणपती बाप्पा त्याचा धावा ऐकून नदीकाठी येतो पण त्याला वाचवण्याऐवजी 'गणराज रंगी नाचतो' नुसार नृत्य सुरू करतो.
माणूस चिडून म्हणतो की तू मला वाचवण्याऐवजी नाचत का आहेस? तर गणपती बाप्पा म्हणतो की दरवर्षी मला बुडवतांना तू नाचतोस ते?
विनोद सोडून द्या पण राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे.
@DrVishwam FB Post.