भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
हा विजय भारतीय स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा आणि संघर्षाचा विजय आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व खेळाडुंचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
#WomenInBlue#CWC25#INDvSA#IndianPride #Champs #भारताचा_अभिमान
आज मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृहात विविध इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त��यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी श्री. सदाशिव पाटील, श्री. जितेंद्र फडके, भाई अमन यांच्यासह विविध इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात स्वागत केले व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्��राज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या संघटनात्मक अनुभवाचा आणि जनतेतील जनसंपर्काचा उपयोग पक्षाच्या बळकटीसाठी करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काळात अधिक व्यापक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचून पक्षाची विचारधारा आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मा. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असून, त्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी श्री. जितेंद्र फडके यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी तर श्री. सदाशिव पाटील यांची अंबरनाथ शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्द��� त्यांना देखील शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते श्री. आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस श्री. लतिफ तांबोळी, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जेष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्य�� निधनाचे वृत्त दु:खद आहे. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखें बारह हाथ’, ‘पिंजरा’, यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेले योगदान अमूल्य आहे.
संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
#sandhyashantaram
आज (दि. ३० सप्टेंबर) मुंबई येथे र��ष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी ��ार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी मा. श्री. रूपेश पाटील, मा. श्री. तेजस ढकी, मा. श्री. रोशन पवार, मा. श्री. रोशन पुजारी, मा. श्री. शैलेश शिंदे, श्रीमती. चंचला बनकर, मा. श्री. हाजी मुदस्सर पटेल (अल्पसंख्याक नेते) यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश झाला. तसेच या प्रसंगी सौ. डॉ. अनु पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघ निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी माजी मंत्री मा. श्री. नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, माजी आमदार मा. श्री. मुस्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. महेश जाधव, प्रवक्ते मा. श्री. संजय तटकरे, प्रदेश, सरचिटणीस मा. श्री. सुरज चव्हाण, प���रदेश सरचिटणीस मा. श्री. लतिफ तांबोळी, प्रदेश चिटणीस मा.श्री. शिवदास कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशिया कप स्पर्धेत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानवर अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयानिमित्त टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन.
संघटित खेळ, शिस्त आणि चिकाटीमुळे तुम्ही भारताचे क्रीडा सामर्थ्य पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केले आहे !
अभिनंदन टीम इंडिया !!
#AsiaCup2025
#INDvsPAK
आज (दि.28 सप्टेंबर) कर्जत तालुक्यातील
मानिवली ग्राम पंचायत मधील मोहिली गावातील जागृत श्र��्धास्थान भवानी माता देवीच्या मंदिरासमोरील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले.
याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख प्रवक्ते श्री.भरत भाई भगत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.एकनाथ धुळे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती श्री. नारायण डामसे साहेब, जेष्ठ नेते श्री.नरेशजी जोशी साहेब, कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष श्री.सुधाकर डायरे, कर्जत त��लुका अध्यक्ष श्री.दिपक श्रीखंडे, खांडस कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री.मंगल ऐनकर, सुधाकर भाऊ घारे युवा मंच चे अध्यक्ष श्री.अक्षय जाधव, माजी सरपंच श्री.रवींद्र झांजे, माजी उपसरपंच श्री. प्रकाश दुर्गे, श्री. महेश म्हसे, श्री.आत्माराम झांजे, श्री. प्रीतम डायरे, श्री. लडकु गवळी, श्री.रामन दुर्गे, श्री.अतुल दुर्गे, श्री.राहुल झांजे, श्री.रामदास दुर्गे, श्री.बाळा दुर्गे, श्री.भालचंद्र निरगुडे, श्री.एकन��थ दुर्गे, श्री.मनोहर दुर्गे, श्री.गणेश दुर्गे, श्री.प्रकाश दुर्गे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sudhakarghare
#bhumipujan
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बी���, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा #यलो अलर्ट देण्यात आला आहे.
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरासाठी उद्या (२८ सप्टेंबर) रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त : https://t.co/CmV60VeLrH
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
भारतीय हवामान विभागाकडून ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धो��ादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ��रण्यात आले आहे.
#आपत्तीव्यवस्था��न
#पाऊस
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
#MahaSEOC #IMDAlert #DisasterPreparedness #Maharashtra #PublicSafety #CrisisResponse #DisasterManagement
अंगणवाडी ताईंना "भाऊबीज भेट" !
महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात. या निस्सीम ��ेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना "भाऊबीज भेट" देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी प्रत्येकी २००० रुपये याप्रमाणे एकूण ४०.६१ कोटी रुपये निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व माता भगिनींना महत्त्वाचे आवाहन !
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक महिला भगिनींना मोठा आधार मिळाला आहे. ही योजना पुढील काळात देखील अशाच पद्धतीने सुरु राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया सुरु केली असून सर्व महिला भगिनींनी ही प्रक्रीया पूर्ण करायची आहे. त्यासाठी https://t.co/dtjBVa8dV0 या संकेतस्थळावर जाऊन e-KYC प्रक्रीया पूर्ण करायची आहे.
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी हक्काचा आधार आहे. हा लाभ सुरु राहण्यासाठी e-KYC करा आणि या योजनेचा लाभ घ्या!
#ladkibahinyojana
@mahayuti_sarkar@AjitPawarSpeaks@SunilTatkare@iAditiTatkare
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांनी लंडनमध्ये झालेल्या 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन' मध्ये 'भारत भूषण' हा जागतिक सन्मान प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे यानिमित्ताने सौ. वरदा आणि श्री. सुनील दत्तात्रेय तटकरे या दाम्पत्यांचा यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा काल (दि. २१ सप्टेंबर) रोजी पोलीस मैदान, कर्जत येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या भव्य नागरी सत्कार सोहळा निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे कर्जत विधानसभा सह संपर्क प्रमुख डॉ. सुनील पाटील, भाजपा उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी ताई पाटील, भाजपा खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव, सौ.जुबेनिसा अदमद शेख सह अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला .
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मा. श्री. प्रफुल्लजी पटेल, माजी मंत्री तथा आमदार परळी वैजनाथ मा.श्री. धनंजयजी मुंडे, महिला व बालविकास मंत्री मा.ना.कु. आदितीताई तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा, मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते मा. श्री.आनंदजी परांजपे, माजी आमदार मा.श्री. अनिकेतजी तटकरे, मा.श्री. मुश्ताक अंतुले, माजी आमदार मा.श्री. तुकाराम सुर्वे, जेष्ठ नेते मा.श्री. दत्तात्रय��ी मसुरकर, मा.श्री. प्रविणजी ठाकूर, माजी महाड नगराध्यक्षा स्��ेहलजी जगताप यांसह रायगड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#sudhakarghare
#bharatbhushanratnaaward
#suniltatkare
#ncp
आज (दि. १५ सप्टेंबर) सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार मा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथे कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेश जोशी व श्रीमती माधवी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. आदितीताई तटकरे, माजी आमदार श्री. अनिकेतजी तटकरे, राष्ट्रवादी काँगेस पार्टी रायगड जिल्हा मुख्य प्रवक्ते श्री. भरतभाई भगत तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#sudhakarghare #suniltatkre #ajitpawar #adititatkare #ncp #politics #karjat #khalapur #khopoli #raigad
आज सुतारवाडी येथे कर्जत तालुक्यातील नरेश जोशी व माधवी जोशी यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे मन:पूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद झाला.
दोन्ही नवीन कार्यकर्ते समाजकार्याची जाणीव असलेले, लोकांच्या समस्या जाणून घेणारे आणि सक्रियपणे कार्य करणारे आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, याची मला खात्री आहे. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.