गोष्ट कारसेवेची… अटकेची आणि तो दिवस हुकल्याची…
अयोध्येत भव्य राम मंदीर साकारत असताना असंख्य आठवणींचा इतिहास डोळ्यांसमोर तळरतोय. लाखो कारसेवकांच्या संघर्षातून, त्यागातून आणि बलिदानातून आज या भव्य मंदीराची पुनर्स्थापना होत आहे. कारसेवकांच्या आयुष्यातील सर्वांधिक आत्मिक समाधान देणारा दिवस.
महाविद्यालयात असताना सोलापुरात मा.श्री. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा आली होती. या यात्रेत लोक रस्त्यात ठिक ठिकाणी स्वागत करत आणि त्यामुळे नियोजित वेळ टळून कित्येक तास उशीरा यात्रा सोलापूरात दाखल झाली होती. सोलापूर बस स्थानकापासून ते होम मैदानापर्यंत भव्य स्वागत आणि तेवढीच भव्य सभा … ती आजही डोळ्यांसमोर आहे. भारावून टाकणारं ते वातावरण आठवलं तरी अंगावर रोमांच येतो.
मी तेव्हा अभाविपचं काम करायचो. आम्ही कॅालेजवर अनेक कार्यक्रम केले, उपक्रम राबवले होते. त्याचदरम्यान कानपुरला अभाविपचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. आम्ही सोलापूरातून काही कार्यकर्ते गेले होतो. या अधिवेशनाला जोडूनच आम्ही अयोध्येला गेलो. ढाचाचा भाग वगळून काही बांधकाम सुरू झालं होते. आम्ही रामललाचं दर्शन घेतलं आणि सुरू असेलेल्या कारसेवेत भाग ही घेतला.
अयोध्येतून सोलापुरात परतल्यावर अजून जोमाने कामाला लागलो.
…आणि अटक
६ डिसेंबरच्या कारसेवेसाठी २ डिसेंबरला सोलापूरहून कारसेवक जाणार होते. खरं तर या कारसेवेला जायचं, अशी तयारी ही केली होती.
पण दोन दिवस आधी माझ्याच महाविद्यालयावर आम्ही भगवा डे आयोजित केला होता. जसं इतर दिवस टाय डे , रोज डे …आदी असतात, तसा हा भगवा डे. महाविद्यालयाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी “ भव्य राम मंदीर व्हावे “, या निवेदनावर सही करावी आणि कपाळावर त्या संकल्पाचा भगवा टिळा लावून आत जावे, असा हा भगवा डे. आणि याच वेळी माझं गेट वर भाषणही झालं…या उपक्रमाला उपस्थित मुलं प्रचंड प्रतिसाद देत होती. सह्या वाढत होत्या, कॅालेजमध्ये भगवा टिळा लावलेली मुलं सगळीकडे दिसत होती.
असंच सर्व नीट सुरळीत सुरू असतानाच अचानक पोलिसांची गाडी आली, समोरच मी होतो. पोलिसांनी आधी मला ताब्यात घेतलं आणि काही कळायच्या आत पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या पाठोपाठ सोडवायला अभाविपसह परिवाराचे कार्यकर्ते धावत आले, पण तेव्हा सोलापूर हे संवेदनशील शहर होतें पोलिसांना कोणीतरी फोन करून सांगितलं होतं आमच्या भगवा डे कार्यक्रमाबद्दल. त्यातून त्यांनी कारवाई केली होती. पोलीस तसे सोडायला तयार नव्हते.
दुसरा दिवस सुटीचा होता. न्यायलय बंद. आमचा मुक्काम तिथेच… पण पोलिसांनी खूप चांगलं सरकार्य केलं. अखेर सुट्टीच्या न्यायालयातून जामिनावर आमची सुटका झाली, पण या गडबडीत २ डिसेंबरची अयोध्येला जाणारी गाडी हुकली…अन् मुख्य कारसेवाही !
अर्थात त्या दिवसाची कारसेवा चुकली म्हणून बेचैन होतो ..झोप नाही लागली…..पण मंदिर होणार हा अतूट विश्वास होता ..तो आज सार्थ ठरतोय.
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र
#RamMandir #Ayodhya #Karseva #Abvp #अयोध्या #राममंदिर #कारसेवा
@RailMinIndia The compartment door of train no 18519 is broken and doesn’t close properly which causes smelling of the compartment also AC isn’t working properly.
@RailMinIndia Train no. 18519 vskp LTTexpress was very unclean & without cleanling services.The helpline numbers provided were either of ex employees and the ones which were reachable weren't taking this seriously.the AC wasn't working with all the pungent smell from the latrin.
#व्हाअभिव्यक्त!
चांगली कलाकृती येते तेव्हा प्रतिसादही तसा दिलाच पाहिजे. रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेतून चित्रपटावर मत मांडतानाच एका चित्रपटगृहातील अनुभवानंतरचं सुमेधा उपाध्येंचं भाष्य:
#चंद्रमुखी: सारं काही देखणं तरी...पण एकदा तरी नक्कीच पाहा!
वाचा:
https://t.co/xAqrbU83Pt
A spine chilling, nerve racking movie #kashmirFiles there are very few moments where want to you in disarray and don’t move after the movie is over. Literally speechless and no one can ever relate the pain, the agony, the scars who are carrying it since 19th Jan 1990. (1/2)
संत गजानन महाराजांचा 144 वा प्रगटदिन...
यंदा प्रकट दिनाचे वैशिष्ट्ये म्हणजे या वर्षी "श्रीं" च्या प्रकटदिनाची तारीख आणि तिथी एकाच दिवशी आली आहे. हा योगायोग अनेक वर्षांनंतर जुळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
#Vidarbha#Maharashtra
आज स्वर्ग स्वरलतेच्या सुरांनी भरला.....सर्व भावना आणि शरीर गोठल्यागत झालेय. नि:शब्द ,निश्चल...काय लिहीणार ...लतादीदींच्या स्वर्गीय, अलौकीक सुरांनी आज स्वर्ग भरला . हे खरेच वाटत नाही आहे तर मग व्यक्त तरी कसे व्हायचे ?.... हे स्वर्गीय सूर कानी पडले नाही असा एकही दिवस 1/4
हे तर काहीच नाही…
प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते
केशव उपाध्ये नव्या अवतारात सादर होताहेत येत्या शुक्रवारी रात्री ९.३० वाजता…
अभिनंदन मित्रवर्य 🌿@keshavupadhye