पाठपुराव्याला यश..!
परभणी शहर व तालुक्यातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी ग्रामीणसाठी नवीन अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी..
या मंजुरी बद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार...!
#mla #Rajeshvitekar #pathrividhansabha #newtahasil #parbhani
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@cbawankule
काल झालेल्या वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मानवत तालुक्यातील पिंपळा व मांडेवडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी राजेश दादांनी केली.
जनसामान्य लोकांचा नेता ❤️
@rajeshvitekar_
रयतेच्या कल्याणासाठी उभारलेली लोकाभिमुख राज्यव्यवस्था, कर्तृत्वाचा अढळ विश्वास आणि अस्मितेचा जागर यांचे स्मरण करून देणारा हा गौरवशाली सोहळा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🧡🚩
पाथरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये आयोजित कॉर्नर सभेत उपस्थित राहून मतदाराशी संवाद साधला त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अन्सारी मोईज मास्टर, प्रभाग क्रमांक एक च्या अधिकृत उमेदवार विमलबाई प्रकाश लालझरे व लतीफा बेग खय्युम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आपल्या पाथरी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आपला आशीर्वाद हेच आमचं बळ आहे. यापूर्वी सुद्धा आपण नेहमीच साथ दिली आहे. तशीच साथ, सोबत आणि आशीर्वाद यंदाही असू द्या, असेही आवाहन केले.
याप्रसंगी अनिलराव नखाते, शाकेर भाई सिद्दिकी, संजू भाऊ कुलकर्णी, अजिंक्य नखाते, यांच्यासह प्रभाग क्रमांक एक मधील युवक सहकारी माता भगिनी व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
#Mla #Rajeshvitekar #पाथरी #नगरपरिषद #निवडणूक #कॉर्नरसभा #प्रभाग1 #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
गंगाखेड येथे आमदार डॉ. रत्नाकर काका गुट्टे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणूक काळातील आठवणी व भविष्यात करावयाची विकासात्मक कामे याबाबतीत सविस्तर चर्चा झाली.
सत्कार सोहळ्यापूर्वी महाराणा प्रताप चौक ते आंबेडकर चौक यादरम्यान भव्य रॅलीचे आयोजन केले होते व रॅलीमध्ये दुतर्फा जेसीबी मधून फुलांची उधळण होत होती. ढोल ताशांचा गजर, फटाक्याची आतषबाजी इत्यादींनी मन भारावून गेले. गंगाखेड तालुक्याचे विटेकर परिवारांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
याप्रसंगी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर (काका) गुट्टे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील व्यापारी, जीवाभावाचे सहकारी, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Mla #RajeshVitekar #98Pathari #Sonpeth #Gangakhed #SatkarSohala #MlaRatnakarGutteSaheb #HappyMoments
@AjitPawarSpeaks@SunilTatkare@mahancpspeaks
जय जवान, जय किसान..
शेतकऱ्यांची प्रगती हीच देशाची प्रगती!
शेतकरी अन्नदाता आहे,
राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या देशातील सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
#Nationalfarmersday
मौजे. नांदखेडा येथील उच्चशिक्षित युवक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या समवेत शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार विक्रम काळे साहेब, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब, आमदार अमोलजी मिटकरी साहेब यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#parbhani #ajitadadapawar #rajeshvitekar #MLA #somnathsurywanshi
@AjitPawarSpeaks@mahancpspeaks@RatnakarGutte1@amolmitkari22
वसमत तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन व मंत्री मा.ना. अनिल जी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नुकसानीबाबत आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस उपस्थित राहून हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह तहसील प्रशासन उपस्थित होते.
@anilpatil@AjitPawarSpeaks@RajuNavghareNCP
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटलेल्या सर्व स्वातंत्र्य वीरांना आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
#IndependenceDay#स्वातंत्र्यदिन
परभणी येथे पालकमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत २०२४-२५ च्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री महोदयांनी मान्यता दिली. तसेच जिल्ह्यातील विविध योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना मंजुरी मिळाली. याप्रसंगी पालकमंत्री महोदयासमवेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
#dpdcmeeting #sanjayjibansode #collecterparbhani #meeting #parbhani #sonpeth #Maharashtra #parbhani #MLC2024 #Rajeshvitekar #mlc #NCP
दादांचा वादा..!
एकनिष्ठ कार्यकर्त्याला दादांनी दिलेला शब्द पाळला. पक्षाचे नेते श्री आ. राजेश विटेकर यांची विधानपरिषदेवर निवड प्रत्येक समर्पित कार्यकर्त्यासाठी एक प्रेरणा देणारा क्षण आहे.
#दादाचा_वादा@AjitPawarSpeaks@rajeshvitekar_
विधान परिषदेच्या शपथविधीनंतर कुटुंबातील सर्व सदस्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माझे लाडके नेते मा.अजित दादा पवार साहेब यांची भेट घेतली. संपूर्ण कुटुंबाने दादांचे मनापासून आभार मानले. यावेळी कुटुंबातील सदस्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
#mlc #RajeshVitekar #sonpeth #Maharashtra #parbhani #NCP #AjitPawar #rajeshvitekar @AjitPawarSpeaks
अतिशय चुरशीच्या विधान परिषद निवडणूकित विजयी झाल्यानंतर प्रथमच आज भाऊच्या समाधीचे, ग्रामदैवत चिंतामणी व भगवान सोमेश्वराचे दर्शन घेतले. तसेच परिवाराकडून आयोजित केलेल्या स्वागताने भारावून गेलो, आज पुन्हा एकदा भाऊची प्रकर्षाने कमी भासली. खरं म्हणजे आई-वडीलांकडूनच सामाजिक बांधिलकीचे धडे घेत मी आज इथपर्यंत पोहोचलो.वडिलांची पुण्याई होती म्हणूनच इथपर्यंतचा राजकीय प्रवास यशस्वी झाला. या प्रवासातल्या प्रत्येक क्षणात सावलीप्रमाणे पाठीमागे उभा राहणारा भाऊ, प्रोत्साहन देणारी आई, पत्नी, भावजय, बहीण, मुले-मुली यांच्यासह परिवारातील सर्व सदस्यांनी केलेले स्वागत माझ्यासाठी अद्भुत पूर्व होते. पुन्हा एकदा या सर्वांचे मनापासून आभार.
#RajeshVitekar #आमदार #NCP #Family #maharashtra #MLC2024 #ThanksFamily #AjitPawar #DhananjayMunde #suniltatkaresaheb #sarkar #सत्कारसमारोह #sonpeth
राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमानाची धकधकती ज्वाला उरी बाळगून लोककल्याणकारी राज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावलेल्या तमाम रयतेच्या स्वप्नपूर्तीचा दिवस म्हणजेच श्री छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा.
सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!