#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय?
#पावसाळी_अधिवेशन-२०२३
मराठा महासंघाचे नेते ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आमदार रोहितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांनी लिहिलेलं ‘त्रि शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेक महात्म्य’ हे पुस्तक सप्रेम भेट दिलं.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याची तसंच विविध पदक विजेते खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र केसरी मल्ल, खो-खो, जिम्नास्टिक, तलवारबाजी, पावर लिफ्टिंग, जलतरण, जुडो आदी खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंनाही शासकीय सेवेत संधी देण्यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्यासंदर्भात मविआ सरकारच्या काळातच संपूर्ण पाठपुरावा झाला होता. याबाबत आज पुन्हा क्रीडामंत्री संजय बनसोडे साहेब यांना पत्र दिलं असता त्यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. लवकरच याची अंमलबजावणी होईल, ही अपेक्षा.
@BansodeSpeaks
उजनी जलाशयाच्या परिसरात ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून ‘एकात्मिक कृती एक्वा फिशरी पार्क’ उभारण्याबाबत सादर केलेला प्रस्ताव पशुसंवर्धन व मत्स्य विभागाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाची तपासणी करुन केंद्र सरकारला शिफारस करणं गरजेचं आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांना केली. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
@SMungantiwar
माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना काढून अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी मी आणि मतदारसंघातील नागरिकांनी उपोषण करण्याबाबतचं पत्र सरकारला दिलं होतं. परंतु या अधिवेशनात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या मा. उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांचा मान राखून उपोषण तूर्तास स्थगित केलं होतं. त्यानुसार आज पुन्हा मंत्री महोदयांना पत्र देऊन या आठवड्यात हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. अन्यथा विधानभवनाच्या आवारात उपोषणास बसण्याचा इशारा दिला. मला अपेक्षा आहे, की ते #MIDC चा प्रश्न मार्गी लावतील आणि उपोषणास बसण्याची वेळ आणणार नाहीत.
@samant_uday
विद्युत गळती कमी व्हावी आणि एफिशियन्सी वाढावी त्यामुळे किफायतशीर दरात ग्राहकांना विद्युत पुरवठा करता येईल या दृष्टीने टोरेंट कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मूळ उद्देश सार्थकी लागल्याचे आकडेवारीत स्पष्ट होत आहे. मात्र टोरेंट द्वारे होत असलेली टोकाची वसुली पद्धत अयोग्य आहे. मानवतेचा दृष्टिकोन ठेवून वसुली व्हावी, हे सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडले. तसेच वसुली वाढली असतानाही विजेचा दर का वाढला आहे, ह्याची खातरजमा शासनाने करावी.
#MonsoonSession2023 @NCPspeaks
उद्योग विभागाकडून IT पॉलिसीत बदल करुन नवीन पॉलिसी तयार केली आहे. यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी वेगळी पॉलिसी करण्याबाबत विचार व्हावा, जेणेकरुन युवांना रोगाराची संधी मिळेल, हा मुद्दा लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना मांडला. तसंच कोल्हापूर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्यासाठीचा प्रस्ताव जमीन हस्तांतराअभावी प्रलंबित असल्याच्या विषयाकडेही सरकारचं लक्ष वेधलं.
#पावसाळी_अधिवेशन-२०२३
बाईची नग्न धिंड काढली देश शांत …
गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असता
गाईला आई मानणारे… बाई ला आई बहीण मानायला तयार नाहीत … #मनुस्मृती#Manipur#ManipurViolence
#
सकल मातंग समाज (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठी पुणे ते मुंबई अशी दवंडी यात्रा काढण्यात आली होती. या दवंडी यात्रेची सांगता आझाद मैदानात सभेच्या माध्यमातून झाली. यावेळी दवंडी यात्रेच्या सांगता सभेस उपस्थित राहिलो व उपस्थितांना संबोधित केले.
आज मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र हे सरकार त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. मातंग समजाला आरक्षण मिळावे अशी अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार केला जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वंचित समाजाला पुढे आणण्याचा विचार केला. त्यांच्या प्रश्नांसाठी पक्ष उभा राहिला. यापुढेही आमचा पक्ष सर्व समाज घटकांच्या प्रश्नांसाठी झटत राहील अशी ग्वाही जमलेल्या कार्यकर्त्यांना दिली.
@NCPspeaks
सप्त भगिनी प्रदेश म्हणून भारताच्या ज्या भागाला ओळखले जाते, त्यापैकीच एक असणा-या मणिपूरमध्ये दोन भगिनींसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हिंसक जमावाने या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार केले. माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणा-या या घटनेचा आज राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने जोरदार निषेध नोंदवत आंदोलन केले.
सगळे पक्ष फोडून झाले असतील तर पंतप्रधान यांनी जरा वाढत्या बेरोजगारी च्या प्रश्नांवर लक्ष दिले तर बरं होईल. सत्ता मिळाली तरी फक्त पक्ष फोडण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण बेरोजगारी कडे लक्ष देऊन रोजगार उपलब्ध करण्याकडे भर द्यावा..!
माझ्या मतदारसंघातील कोंभळी गावातील शाळेत विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या स्वच्छता संकुलाचं आणि वॉटर फिल्टरचं आईच्या (सुनंदाताई पवार) हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तसंच वृक्ष लागवडही करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@sunanda_pawar
मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्वतंत्र असताना देखील मुंबईचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मनपामध्ये स्वतःचे कार्यालय उभे केले आहे. मीही या मुंबई शहराचा पालकमंत्री राहिलो आहे. अशापद्धतीने मनपामध्ये पालकमंत्र्यांनी कार्यालय स्थापन करणे म्हणजे मनपाच्या अधिकारात हस्तक्षेप करणे झाले, मनपाच्या कारभारात ढवळाढवळ करणे झाले. मनपामध्ये लोकनियुक्त बॉडी नसताना शासनाच्या लोकांनी त्यापासून लांब राहिलेले बरे नाहीतर चुकीची प्रथा सुरू होईल.
#MonsoonSession2023 @NCPspeaks
देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतर मोदींना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएच्या लोकांनी मोदींचा सत्कारच केला पाहिजे. - संजय राऊत
#sanjayraut#shivsena#narendramodi#bjp#nda#india
https://t.co/f1vgVuocP4 << येथे वाचा सविस्तर वृत्त
पीक विमा योजनेतून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी #KJIDF च्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील सर्व गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे पीक विम्याचे फॉर्म भरुन घेण्यात येत आहेत. फॉर्म भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून तोपर्यंत मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा प्रयत्न आहे.
#सदैव_राष्ट्रवादी#निष्ठा_हीच_प्रतिष्ठा
आज माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर ही महत्वाची जबाबदारी टाकल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.@PawarSpeaks साहेब, कार्याध्यक्षा खा.@supriya_sule ताई, प्रदेशाध्यक्ष मा.@Jayant_R_Patil साहेब यांचे आभार !
शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कार्यतत्पर राहील अशी ग्वाही या निमित्ताने देतो.
बीड जिल्हा हा सदैव मा.शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
२६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात १४ श्री सदस्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत आज शासनाला प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जाब विचारला. खरंतर हे उत्तर गृह खात्याने द्यायला हवे होते, मात्र जाणीवपूर्वक सांस्कृतिक विभागावर हे उत्तर ढकलले गेले.
या प्रकरणात जी समिती नेमली गेली त्यास तीन महिने उलटले तरी अद्याप अहवाल सादर झालेला नाही. आणखी एका महिन्याची मुदतवाढ समितीला देण्यात आली आहे. या समितीला मुदतवाढ न देता १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावे आणि हे अधिवेशन संपण्याआधी सभागृहात याबाबत गृहमंत्र्यांनी अहवालाचे निष्कर्ष स्पष्ट करावे, ही आमची मागणी आहे.
#MonsoonSession @NCPspeaks
काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडं जाऊन बघायच्या असतात. इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोक हे कमालीच्या समन्वयाने काम करत असल्याचं एक सुखद चित्र अनेक दिवसांनी दिसलं.. आता अपेक्षा एकच आहे की अशा दुर्घटना वारंवार होत असताना आपण त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढणार आहोत की नाही? अजून किती जणांचे बळी असेच जात राहणार?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AnilPatil_NCP