आज 'शिवजयंती'निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सवात सहभागी झालो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक झालो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल.
बारामती शहरात अनेक कार्यालये,वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या झाल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे.पोलीस अधीक्षक कार्यालय,बाजार समितीची सुविधायुक्त वास्तू,अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना या सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहेत.
याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचं बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.
ज्येष्ठ नेते, खासदार आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा,असं आवाहन यावेळी केलं.
'विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग' अशा बातम्या आज बघायला मिळाल्या आणि 'ब्रेड मिळत नाही तर केक खा' असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली!
'आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा', असं भाजपच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!
कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. कामगारांमुळेच विकासाला गती देणं शक्य होते. कोणीही कामगार लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. सर्वच कामगारांनी दोन डोस घ्यायला हवेत. बारामती तालुक्यात लसीकरणावर सध्या भर देण्यात येत आहे.
कामगार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र शासन आणि क्रेडाई महाराष्ट्र व क्रेडाई बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम कामगारांसाठी आयोजित मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. ह्या स्तुत्य उपक्रमामुळे कामगार बांधवांना लसीकरणाचा लाभ घेता येईल. कोरोनापासून संरक्षण मिळवता येईल.
आजच्या युगात प्रत्येकानं आर्थिक व्यवहारासंदर्भात जागरूक राहणं गरजेचं आहे. यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समुहाला बचतीचं महत्त्व कळेल आणि आर्थिक साक्षरता मोहिमेमूळे मुद्रा योजनेसारख्या योजनांचा लाभ घेणे देखील सोपं होईल, असा विश्वास आहे.
आर्थिक साक्षरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व
निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. हा एक चांगला उपक्रम असून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. या मोहिमेतून गरीब व वंचित घटकांना लाभ मिळेल आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहाराविषयी माहिती होण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद पुणे, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येणाऱ्या 'आर्थिक साक्षरता प्रशिक्षण' कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.
सुरुवातीच्या काळात पत्रकारीतेच्या माध्यमातून लेखन केल्यानंतर त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापन क्षेत्रात काम केले. सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समिक्षकांनीही त्यांच्या लेखनाला दाद दिली. त्यांच्या निधानानं एक सिद्धहस्त लेखक,प्रतिभावान साहित्यिक मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.
अस्सल ग्रामीण ढंगाच्या कथाकथनाच्या माध्यमातून ज्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद दिला असे ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिध्द कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. मराठी कथाकथन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
खटाव येथील नवीन बांधण्यात येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र वैभवात भर घालणारे ठरेल. या प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक मनुष्यबळ देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.
राज्य शासनानं नागरिकांच्या आरोग्यासाठी निधीची भरीव तरतूद केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये सर्वसोयींनी युक्त उभे करण्यात येतील.
सातारा येथे खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सातारा जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी पुणे -मुंबई येथे जाऊ नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
शेतजमिनीचं नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामं घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावांचं पुनर्वसन करावयाचं असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश दिले आहेत.
पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं.