A land scam in Ujjain, Madhya Pradesh, by none other than the Chief Minister’s family. In one of the holiest cities in India.
And these guys will give certificates of Hindutva to others??
Bjp uses hindutva in elections for its gains, and then later for such gains.
Earlier today, following the instructions of our Hon'ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji:
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्र विधीमंडळातील आजच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र विधानपरिषदेतील निवृत्त होत असलेल्या सदस्यांसह सभापती राम शिंदे ह्यांच्या उपस्थितीत फोटोशूट करण्यात आले.
आज विधानसभेत मी खालील मुद्दे मांडले आणि वनमंत्री @NaikSpeaks यांच्याकडून हमी मागितली:
१) आरे जंगलामधील आगीबाबत संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
२) गोराई मॅन्ग्रोव्ह पार्कचे (मी मुंबई उपनगरांचा पालकमंत्री असताना ज्याची सुरुवात केली होती) उद्घाटन ह्या अधिवेशनानंतर करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. हे पार्क गेल्या ६ महिन्यांपासून तयार असूनही नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही.
३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात एका माकडावर (बोनेट माकाक) धनुष्यबाणाने हल्ला करण्यात आला होता, हा मुद्दा मी उपस्थित केला.
अशा प्रकारच्या शिकारी आणि गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मी मागणी केली आहे.
तसेच, एसजीएनपी मास्टर प्लॅनला नुकतीच बीएमसीकडून मंजुरी मिळाली असली तरी त्याबाबत लोकप्रतिनिधींशी अधिकृतरित्या सल्लामसलत झालेली नाही. त्यामुळे जंगलात असलेल्या मंत्र्यांच्या बेकायदेशीर बंगल्यांना नियमित करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संशय व्यक्त होतो.
४) पर्यावरणवादी @banduplan बंडू धोत्रे यांना महाराष्ट्र वन विभागाने घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खाणी रद्द केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.
मी हा मुद्दा सातत्याने विधानसभेत मांडत आलो आहे.
आज मी मंत्र्यांना ह्यावर ठाम राहण्यास आणि महाराष्ट्रातील कोणत्याही वनक्षेत्रावर असा धोका येऊ नये, ह्याची खात्री करण्यास सांगितले.
त्यांनी सांगितले की हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र त्यांचे वैयक्तिक मत आहे की खाण रद्द केली पाहिजे आणि ते ह्याविषयी पाठपुरावा करतील.
कांदिवली येथील प्रभाग क्र. २६ चे नगरसेवक धर्मेंद्र काळे जी यांच्या 'जनसेवालय' ह्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन केले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी ‘जनसेवालय’ निश्चितच एक प्रभावी माध्यम ठरेल.
ह्यावेळी कांदिवलीतील नालंदा बुद्ध विहारात जाऊन भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
अभ्युदय नगर, काळाचौकी येथे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख चषक २०२६' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस भेट दिली. ह्यावेळी विजेत्या संघांना बक्षीस देऊन सन्मानित केले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज कांदिवली येथील विभाग क्र. २ च्या मध्यवर्ती कार्यालय तसेच शिवसेना शाखा क्र. ३० ला भेट दिली. हजेरी वहीत नोंद करुन उद्धवसाहेबांनी ह्या शाखा आणि कार्यालयातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ह्यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, शाखाप्रमुख शाम मोरे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्याने अध्यक्षांना पत्र द्यायला हवे. एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल, पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनी आपल्याला विनंती करायला हवी. सभागृहात काय सुरु आहे? मंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे न द्यावी. सभागृहात उपस्थित न रहावे, हे फार गंभीर आहे.
- भास्कर जाधव, आमदार
@_BhaskarJadhav