संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूराच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. हा आनंदाचा सोहळा विठूरायाच्या भेटीसाठी निघाला आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत.
What a win by the Indian 🇮🇳 Cricket Team! Heartiest congratulations to #TeamIndia for winning #T20WorldCup2024.
अभिनंदन टिम इंडिया!
ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून समस्त भारतीयांचे स्वप्न साकार केले. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
वेल प्लेड् टिम इंडिया!
नवनिर्वाचित अठराव्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदार सुप्रियाताई सुळे बारामती..🔥❤️🙏🏻
Took the Oath as Member of 18th Lok Sabha. @Supriya_Trends@SupriyaSuleArmy@MPSupriya_Sule
थोर कवी स्व. ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा आणि स्व. सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांनी साकारलेले गीत रामायण ऐकणे आदरणीय पवार साहेबांना आवडते. या क्षणांचा ते आजही पुरेपूर आनंद घेत असतात.
आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पवनार येथे भेट दिली. यावेळी विनोबाजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी आदरणीय गौतमजी बजाज, उषा दीदी उपस्थित होते. विनोबांच्या या आश्रमाची भेट ही नेहमीच उर्जादायी आणि नवी प्रेरणा देणारी असते.
Visited Pavnar, the abode of Acharya Vinoba Bhave and paid obeisance to Vinobaji at his tomb.
Revered Gautamji Bajaj, Usha Didi was present on the occasion.
It's always a delight to visit the Vinobaji Ashram.
अस्सल लोकनेता घडतो ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, कार्यकर्ते हे त्याचं विस्तारीत कुटुंबच जणू... गेली सहा दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय पवार साहेबांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. आपुलकी, विश्वास आणि परस्परांप्रती अतूट निष्ठा यामुळे हे नाते दिवसेंदिवस आणखी दृढ होत आहे. कानावर आवाज पडला तरी तो कोणाचा हे त्यांना ओळखता येतं कारण आमच्या नेत्याची नाळ या सर्वसामान्य मायबाप जनतेशी घट्ट जोडलेली आहे. आमचा नेता आमच्या पक्षाचा प्रथम कार्यकर्ता आहे.