वाह रे वाह....
उद्धव साहेब ठाकरे ह्यांनी २०१९ ला राजकीय युती केली ती चुकीची पण हेच तुम्ही केलं तर ते बरोबर!
ह्यालाच हिंदी भाषेत म्हणतात "दोगलापन"
@Dev_Fadnavis
एवढ्या ४ लाख लोकांचा प्रश्न आहे, एका छोट्या कारवाईवर सरकारच्या प्रश्न सुटू शकतो आपण म्हाडा ही कॉम्पिटर अथॉरिटी आहे हे जाहीर करण्यासाठी कोर्टात जायच्या अगोदर प्रयत्न करणार का?
- ॲड. अनिल परब, विधानपरिषद आमदार
#पावसाळीअधिवेशन२०२६#Mumbai#ShivsenaUBT#AnilParab
Yesterday, along with Shiv Sena and Yuva Sena office bearers, karyakartas, and local residents, we performed the Bhoomi Poojan for several important development works in the constituency.
These works include:
• Internal road at Shivaji Nagar Colony
• Bhumia Mata Mandir Road
• Kherwadi Road
• Parishramalaya Road
• Navjeevan Society Road
• Vakola Pipeline Road
• And the beautification of Chhatrapati Shivaji Maharaj Chowk near Hanuman Tekdi Gate No. 2
Some of these works have already begun on ground, and the remaining projects will move ahead swiftly.
Bandra East is changing — and this is only the beginning.
वांद्रे पूर्वचा विकास आता थांबणार नाही.
काल माझ्या विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्वातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये —
• शिवाजी नगर कॉलनीतील अंतर्गत रस्ता
• भूमिया माता मंदिर मार्ग
• खेरवाडी येथील रस्ता
• परिश्रमालय रस्ता
• नवजीवन सोसायटीचा रस्ता
• वाकोला पाईपलाईन रस्ता
• तसेच हनुमान टेकडी गेट नं.२ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसराचे सुशोभिकरण
या सर्व कामांचा समावेश आहे.
काही कामे तर आजपासून लगेच सुरू झाली आहेत — आणि उर्वरित कामांना देखील गती दिली जाईल.
वांद्रे पूर्व बदलत आहे — आणि ही फक्त सुरुवात आहे.
वांद्र्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही — ही माझी जबाबदारी आणि वचन.
गरीबी, परिस्थिती किंवा अडचणी भवितव्य थांबवू नयेत. ह्या वर्षी माझ्या माध्यमातून १०३ विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला — हीच खरी सेवा.
१०३ विद्यार्थ्यांचे शिक्षण = १०३ कुटुंबांची नवी दिशा. वांद्रे पूर्व बदलतंय — आणि ही फक्त सुरुवात आहे.
An educated child doesn’t just change their own life — they change the future of a family.
Proud to help 103 students from vulnerable backgrounds secure admissions to quality institutions.
This is how transformation begins — one student, one family, one community at a time. Bandra East is changing and this is just the beginning.
८०% समाजकारण २०% राजकारण
हीच बाळासाहेबांची शिकवण
आजपासून वांद्रे पूर्वसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करत आहोत.
आपत्कालीन वेळी ही सेवा नेहमी तुमच्या सोबत असेल.
📞 Helpline: 91 522 255 33
वांद्रे पूर्व बदलतंय - आणि ही फक्त सुरुवात आहे.
“80% service, 20% politics —
that’s the philosophy Balasaheb taught us.”
From today, a free ambulance service will be available for the people of Bandra East.
In any emergency, this service will stand with you and your family.
📞 Helpline: 91 522 255 33
Bandra East is changing — and this is just the beginning.
#FreeAmbulance
#BandraEast
#Shivsena
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने आज पहलगाम आतंकवादी हल्ल्यात थेट संबंध असलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याविरोधात महिला आघाडीच्या वतीने "माझं कुंकू, माझा देश" आंदोलन करण्यात आले.
#BoycottINDVsPAK#shivsenaubt#AnilParab
तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा !
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा !!
गणेशउत्सवानिमित्त विविध ठिकाणी आयोजित गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन व आशिर्वाद घेतले.
#गणेशोत्सव#ganeshfestival#festival#mumbai#anilparab
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली आणि संयमी व्यक्तिमत्त्व!
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत, आपण शिवसेनेच्या धुरेस भक्कमपणे सांभाळले आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक ठोस निर्णय घेतले.
आपल्या नेतृत्वगुणांमुळे आणि संवेदनशील दृष्टिकोनामुळे आपण जनतेच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या विशेष दिवशी, आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी अपार यश लाभो! हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, उद्धवसाहेब!
#उद्धवठाकरे #UddhavThackeray #Mumbai #ShivsenaUBT #AnilParab
१६४-वर्सोवा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हारून खान जी ह्यांच्या प्रचारार्थ जोगेश्वरीतील बेहरामबाग नाका येथे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी महाविकास आघाडी व सहकारी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #AnilParab
दसरा म्हणजे सत्य, धर्म आणि विजयाचं प्रतिक. या पवित्र दिवशी श्रीरामांनी रावणाचा पराभव करून विजय प्राप्त केला, तसंच आपण आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर विजय मिळवूया. हा सण नवीन सुरुवातीचा, आनंदाचा, आणि यशाचा प्रतीक आहे.
आपणास व आपल्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#दसरा #विजयादशमी #dasra #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #AnilParab
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आज मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतही वांद्रे पूर्व येथील गव्हर्नमेंट कॉलनीतील रहिवाशांच्या आमरण उपोषणाचा उल्लेख करत त्यांना आपला पाठींबा दर्शवला.
आपली भाषा, अभिजात भाषा !
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी भाषेला आज केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. ही समस्त १२ कोटी मराठी भाषिक जनतेसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. गेली अनेक वर्षे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संसदेत तर आमदार राज्याच्या विधानसभेत आक्रमकपणे या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित होते. आज अखेर या मागणीला यश आले असून याप्रसंगी मी समस्त मराठी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #AnilParab
नव्या वाटा, नवी संधी
उज्ज्वल भविष्यासाठी, साथ शिवसेनेची
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित महा नोकरी मेळावा..
तारीख: ०५ ऑक्टोबर २०२४
वेळ: स. ०९:०० ते सायं. ०६:०० पर्यंत
स्थळ: १८ MLCP पार्किंग, T1 तळमजला, सहारा हॉटेलजवळ, बालाजी रेस्टॉरंटच्या ATC टॉवरसमोर, विलेपार्ले (पूर्व), मुंबई
Registration Link : https://t.co/UmdM8vXwC0
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab