राज्यातील लाखो सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आज राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
या बैठकीत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासकीय जमीन वाटपाच्या प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबींचे सादरीकरण करून संबंधित प्रश्नांच्या सकारात्मक व गतिमान निराकरणासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण करून त्यांना आवश्यक तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश यावेळी मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी माझ्यासह आमदार श्री. संजयजी केळकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
[Pravin Darekar, Chandrashekhar Bawankule, Cooperative Housing Societies, Government Land Allocation, Housing Society Issues]
@cbawankule@BJP4Maharashtra
#PravinDarekar #BJPMumbai #CooperativeHousing #HousingSocieties
निवडणुकीची अगोदरेच भाजपाचा महाराष्ट्रात भक्कम पहिला विजय! 🔶
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत
१७ पैकी सर्व १७ जागा बिनविरोध जिंकत भाजपाने पुन्हा एकदा आपली संघटनशक्ती आणि जनाधार सिद्ध केला आहे.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
राष्ट्र आणि जनसेवेकरिता आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे दृढनिश्चयी आणि संकल्पशील जनसेवक, प्रखर आणि ओजस्वी वक्ते, अद्भुत संघटक, वरिष्ठ भाजपा नेतृत्व व आमचे प्रेरणास्त्रोत स्व. प्रमोद महाजन जी यांना जयंतीनिमित्त सादर नमन.
#प्रमोदमहाजन#PramodMahajan
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥
दीपावलीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन यावे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. लक्ष्मीपूजन निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#दिपावली#festival#दिवाळी
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय, जगदंबेने महिषासुराचा केलेला वध आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी रावणावर मिळवलेला विजय यांचे प्रतीक म्हणजे विजयादशमी !
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🚩
#दसरा#विजयादशमी#Dussehra
भारतीय जनसंघाचा पाया रचणारे प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रभक्तीची ही सर्वसमावेशक व्याख्या मांडणारे,एकात्म मानववादाचे प्रणेते, विचारवंत, संघटक आणि राजनेता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐
@Dev_Fadnavis@ChitraKWagh@Team_Chitrawagh
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना.
@RaviDadaChavan@ChitraKWagh@Team_Chitrawagh@BJP4Maharashtra
कलियुगी काही जन्म हे समाज परिवर्तनासाठी झालेले असतात.
🪔🪔🪔🪔
जनतेचा श्वास, देशाचा विश्वास,
त्याग-तपश्चर्येतून घडला इतिहास।
भारतभूमीच्या प्रत्येक कणात ओवलेलं तेज,
नमो नमः मोदीजींना जन्मदिन मंगल आज॥
#HappyBirthdayModiji#HappyWillAshleyDay#Modiji
📍 १७ सप्टेंबर २०२५📍मालेगाव कॅम्प
भव्य रक्तदान शिबिर
विश्वगुरू पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ रक्तदान शिबिराने करण्यात आला.
@Dev_Fadnavis@ChitraKWagh@Team_Chitrawagh