केमिकल वापरून भेसळयुक्त दूध बनवून ते चितळे, गोकुळ, अमूल या कंपनीच्या पिशवी मध्ये विकलं जातं!
त्या लोकांना ह्या पिशव्या मिळतातच कशा आणि इतके दिवस हे बाकी आयुक्त काय करत होते?
म्हणजे प्रशासनाने हप्ते घेऊन लोकांना कॅन्सर होण्यासाठी हे चालू ठेवलं!😒
#भेसळ#दूध
🚨 महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘धडाका’!
हॉटेल्सच्या किचनला आता मिळणार ‘रियालिटी चेक’ – अस्वच्छता आढळली तर थेट सील!
🥛 दूध, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके सज्ज.
🍴 मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात अचानक तपासण्या सुरू…
👉 भेसळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प, आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य!
#FDA #तुकाराममुंढे #भेसळमुक्तमहाराष्ट्र
तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेकडे राज्याचे लक्ष वेधले जाणे ही जनतेसाठी आश्वासक घटना आहे. 🌿
अन्नाची शुद्धता आणि औषधांची गुणवत्ता ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाची पायाभूत गरज आहे. मुलांच्या पेल्यातील दूध सुरक्षित असावे, आईच्या हातून वाढलेला भात शुद्ध असावा, आणि रुग्णालयात मिळणारी औषधे विश्वासार्ह असावीत, हीच खरी लोकशाहीची जबाबदारी आहे.
तुकाराम मुंढे यांनी भेसळीविरुद्ध उघडलेली मोहीम ही फक्त प्रशासनिक कारवाई नाही, तर जनतेच्या आरोग्याचा रक्षक बनण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या कारकीर्दीत अनेकदा राजकीय दबावामुळे बदल्या झाल्या, तरी त्यांनी कर्तव्यकठोरतेचा बाणा कधीच सोडला नाही. आज अन्न व औषध प्रशासनासारख्या थेट जनतेच्या जीवनाशी निगडित विभागात त्यांनी दाखवलेला बाणेदारपणा म्हणजेच जनतेच्या विश्वासाचा आधार आहे.
ही मोहीम म्हणजे जनतेच्या आरोग्याचा श्वास, मुलांच्या भविष्यासाठीची हमी, आणि समाजाच्या प्रगतीसाठीची पायरी आहे.
राज्याचे लक्ष या मोहिमेकडे वळणे म्हणजे नागरिकांच्या जीवनमूल्यांना प्राधान्य देणे.
चला, आपणही या लढाईत सहभागी होऊया आणि आरोग्याच्या या पवित्र ध्येयाला साथ देऊया. ✨
तुकाराम मुंडेंचा आदेश-
"दुधात भेसळ केली तर १० लाखाचा दंड आकारला जाईल."
एकदम उत्तम निर्णय.
संपूर्ण भेसळ बंद झाली तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील. अन नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्यापासून वाचतील.
महाराष्ट्र राज्यातील शाळांच्या ५०० मीटर परिघामध्ये 'स्टिंग' ऊर्जा पेयाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. चालू पावसाळी अधिवेशनात श्रीगोंदा-नगरचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या पेयाच्या आरोग्यावरील दुष्परिणामांचा प्रश्न उपस्थित केला होता; स्टिंग लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी घातक असल्याचे बाटलीवर नमूद असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या बंदीचे अधिकृत निर्देश दिले.
या चर्चेदरम्यान भाजप आमदार राहुल कुल यांनी शाळा परिसरात ऊर्जा पेये, फ्लेव्हर्ड पान आणि दुधातील भेसळीच्या नावाखाली होणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले की, २५ मे रोजी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांच्या देखरेखीखाली या सर्व प्रकारांची अंतर्गत तपासणी सध्या सुरू आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी राज्य शासनाने मुंढे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील ६ नामांकित हॉटेल्स आणि बेकरींवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात नरिमन पॉईंट येथील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित 'फ्लिंट अँड वार्सा' रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांचे चुकीचे ब्रँडिंग आढळल्याने, तर बोरिवली येथील 'एम. के. बेकरी'मध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याने कारवाई झाली; याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे येथील प्रतिष्ठानांवरही एफडीएकडून अशीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.
#TukaramMundhe #viral #thodkyaat #marathinews #PoliticalNews
पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या शीतपेय कंपन्या शेड्युल 4 चा आधार घेऊन 'एनर्जी ड्रिंक' असं उत्पादनावर लिहितात. मात्र, नियमानुसार त्यांना एनर्जी ड्रिंक असं लिहिता येत नाही, कंपन्यांना तशा नोटीस बजावल्या आहेत. यापुढे ते लिहिणार नाहीत. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #Sting #LatestNews #Maharashtra
(Tukaram Mundhe, Sting, Maharashtra, Latest News)