काळ बदलला बाकी काहीही बदललं नाही..
-----
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्याला सलाम,
न बघणार्याला सलाम,
विकत घेणार्याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.
वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्यांना सलाम,
तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम,
या बातम्या वचाणार्या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.
------------------मंगेश पाडगांवकर
मोदी सरकारने ज्याप्रकारे तरुण विद्यार्थी व आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आपल्या देशात लोकसंख्येच्या सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे.सरकारने त्यांना डिवचले आहे, आता ही तरुणाई गप्प बसेल ही अपेक्षा सरकारने सोडून द्यावी.
#निषेध
विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
- राज ठाकरे
मराठी एकीकरण समितीचे शिलेदार श्री #उमेश_राऊळ यांनी लोकल आणि फलाटावरील डिजिटल स्क्रीनवर मराठी भाषा दुर्लक्षित केल्याची तक्रार केली होती.
पश्चिम रेल्वेच्या संबंधित प्रशासनाने अधिक उत्तरदायी आणि जबाबदार असणे अत्यावश्यक आहे.
@WesternRly@RailMinIndia@AshwiniVaishnaw@RailwaySeva
@MBVVPOLICE@DGPMaharashtra NO ACCIDENT NOTHING.ONLY WRONGSIDE VEHICLES MADE A TRAFFIC JAM.WE ARE UNABLE TO MOVE TOWARDS VASAI SINCE 1 hour .SUCH SILLY MISTAKES MAKES HUGE PROBLEMS
@MBVVPOLICE यांनी 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान गायमुख घाटावरील कामामुळे अवजड वाहनांना NH48 चिंचोटी नाक्याच्या पुढे प्रवेशबंदीचे आदेश दिले होते. तरीही मोठ्या प्रमाणात वाहने आली व भीषण कोंडी झाली. जबाबदारांवर शिस्तभंग कारवाई व तातडीने चौकशी व्हावी. @Dev_Fadnavis@DGPMaharashtra
@MBVVPOLICE यांनी 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान गायमुख घाटावरील कामामुळे अवजड वाहनांना NH48चिंचोटी नाक्याच्या पुढे प्रवेशबंदीचे आदेश दिले होते. तरीही मोठ्या प्रमाणात वाहने आली व भीषण कोंडी झाली. जबाबदारांवर शिस्तभंग कारवाई व तातडीने चौकशी व्हावी. @Dev_Fadnavis@DGPMaharashtra
@MBVVPOLICE यांच्या आदेशानुसार 8 ऑगस्ट 2025 रोजी चिंचोटी नाका येथून अवजड वाहने वळवायचे होते (घोडबंदर रोडवर कामामुळे). तरीही आज सायंकाळी चिंचोटी नाक्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने सोडली गेली, परिणामी 15 किमीची कोंडी@mieknathshinde@DGPMaharashtra@CMOMaharashtra
तुमचा माझा सण, आलाय आनंद घेऊन !
पिढ्यान्पिढ्या समुद्राशी आपलं नातं जपणारे आम्ही आगरी-कोळी. आजच्या दिवशी नारळ अर्पण करत समुद्रदेवतेची कृपा आणि सुरक्षिततेसाठी साकडे घालतो. कारण ही फक्त परंपरा नाही, ती आमच्या जीवनशैलीची ओळख आहे.
या दिवसानंतर पुन्हा एकदा होडी समुद्रात जाते आणि आशेची नवी दिशा घेऊन परतीचा मार्ग शोधते. माझ्या सगळ्या बंधूं-भगिनींना नारळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
मुंबई व इतर मोठ्या शहरांवर परप्रांतीयांचा लोंढा वाढतच आहे. त्यांच्या सोयीसाठी लाखो कोटींचे रस्ते बांधूनही या शहरांची वाहतूककोंडी काही कमी होत नाही. त्यांच्या अनधिकृत झोपड्यांच्या बदली घर देताना महाराष्ट्रतील मराठी माणूस, मुंबईतील गिरणी कामगार मात्र बेघरच राहीला आहे. एकंदरीतच या लोढ्यांना पोसता पोसत महाराष्ट्र मात्र भिकारी बनत चालला आहे. ज्या बळीराजाच्या जीवावर हे राज्य चालू आहे तो बळीराजा मात्र बैल परवडत नसल्याने या वयात स्वतःच्या खांद्यावर औत ओढून शेत नांगरताना बघताना एक राजकारणी म्हणून खरंच मान शरमेने खाली जाते. परंतु फक्त मतांसाठी परप्रांतीयांचे पाय चाटणाऱ्या निगरगट्ट सरकारकडे महाराष्ट्रातील या मराठी शेतकऱ्यांना द्यायला काहीच नाही.आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल नंबर वर आहे.राज्यावर जवळजवळ १० लाख कोटींचे कर्ज असताना निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्गासारखे महागडे प्रकल्प या राज्यावर थोपवले जात आहेत. एकंदरीत तोडफोडीच्या राजकारणात अडकलेल्या या राज्यकर्त्यांनी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?’ असे म्हणायची वेळ आली आहे.
आमच्या इथे बापबेट्याने केलेला विकास आज कल्याण-शीळ रस्ता, सोनारपाडा येथे पलटी झाला.उत्तराखंडमध्ये अडकलेल्या प्रवाशांची चौकशी करून चमकोगीरी करणाऱ्यांनी इथे रोज कल्याण-शीळ रस्त्यात अडकणाऱ्या प्रवाशांची पण काळजी करावी.
#कल्याण_शीळ_रस्ता#पलावापुल#भ्रष्टाचार#भ्रष्टनाथ
चल बाला,भरले आगरी शाला!
एकीकडे मराठी शाळा कमी झाल्या,मातृभाषेत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत असे वातावरण असताना जोवर आपल्या महाराष्ट्रात बोली भाषा बोलल्या जातात तोवर मराठी भाषा या भुमीत तग धरुन राहील असे माझे ठाम मत आहे,किंबहूना माय मराठी भाषेस आज अभिजात दर्जा मिळालाय त्यामुळे आता तरी बोलीभाषा ह्या ‘अशुद्ध’ भाषा नसुन ‘अभिजात बोलीभाषा’ म्हणुन त्याकडे सर्वांनी पहायला हवे! अशाच अभिजात बोलीपैकी माझ्या मातीतील ‘आयबोली आगरी’
आगरी बोलीला तिच्या गाण्यांना,साहित्याला सर्व महाराष्ट्राने नेहमीच आपलसं करुन टाकले आहे. परंतु अजुनही तिचे अनेक पैलु खुद्द आगरी भाषिक अन बिगर आगरी भाषिकांना सुध्दा माहिती नाही ह्याच अनुषंगाने युवासाहित्यिक सर्वेश तरे,चित्रकार मोरेश्वर पाटील,प्रकाश पाटील,लोकगायक दया नाईक यांच्या संकल्पनेतुन ‘आगरी ग्रंथालय चळवळीने’ अन भुमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी भाषेचे दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग ‘आगरी शाला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या प्रशिक्षण वर्गात अने तज्ञ मंडळी जसे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य प्रा.एल बी पाटील,कवी रामनाथ म्हात्रे,अग्रसेन मासिकाचे संपादक चंद्रकांत पाटील,लोककवी प्रा.प्रशांत मोरे,भाषाअभ्यासक श्रीनिवास नार्वेकर,सिनेअभिनेता मयुरेश कोटकर,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,वृत्तनिवेदिका रिध्दी म्हात्रे असे अनेक प्रसिध्द मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे आगरी साहित्य संस्कृतीचे मुकुट समजले जाणारे ‘धवला’ ह्या धवल्याचा वारसा पुढच्या पिढीस जावा,समजावा ह्यासाठी ‘धवला कार्यशाळा’ सत्र देखील आयोजन केले असुन प्रसिध्द धवला गायिका चंद्रकला सुतार (दासरी),संगिता पाटील अन विधी करणाऱ्या धवलारीनींचा समावेश असणार आहे. इंग्रजी आणि हिंदीच्या झगमगाटात आपल्या बोलीला वाचवणं,अन खास अशा होणाऱ्या अभिनव उपक्रमात आपण सहभागी होणं हेच बोलीभाषा जतन करण्यासाठीच्या कार्यात आपलं योगदान गणले जाईल…
‘मनून मी ये उपकरमाला माझे करशा पक्या पक्या सुबेच्छा दिताव ना ज्यांना कोनला ये उपकरमान सहभागी होवाचा आसल त्यावी पुरं दिलेले लिंक व जावून फार्म भरा,निशुल्क नोदनी ह! नय त दिलेले नंबरावं फोन करुन आपला नाव आगरी शालन रजीस्टार करा!
‘बोली जापाची,बोली जपाची’
📍 दि. २७ व २८ मे २०२५ रोजी सकाळी १० ते ६ ठाणे टाऊन हॉल येथे
आयोजित होत आहे एक आगळावेगळा उपक्रम — “आगरी शाला”!
📞 नोंदणीसाठी संपर्क आणि निशुल्क नोंदणीसाठी लिंक:
👉 ९८८११३३४४४ / ९०९६७२०९९९
👉- https://t.co/pnk2Bz2gf4
"राजूदादा, तुमच्या प्रामाणिकतेची आणि निःस्वार्थ सेवाभावाची साक्ष आम्ही रोज घेतो. तुमचं नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला पुढे वाटचाल करण्याची प्रेरणा देतं. तुमच्यासोबत उभं राहणं हा आमचा हक्कच आहे.
जय महाराष्ट्र!
- सुशांत"
काल माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून किंवा फोन, संदेश आणि समाजमाध्यमातून आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलात त्याबद्दल मी आपला आजन्म ऋणी आहे. माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी व काही सामाजिक संस्थांनी समाजोपयोगी कार्यक्रम घेतले,काहींनी पोस्टर्स लावली, गाणी केली, पत्र पाठवली, शुभेच्छा कळवल्या, पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिले, खरंच मी गदगदून गेलो आहे तुमच्या प्रेमाने. केवळ माझ्या मनसे पक्षा मधल्याच नाही तर इतर राजकीय पक्षातील मित्रांनी, सहकाऱ्यांनी, वेगवेगळी पदे भूषवणाऱ्या लोकांनी प्रत्यक्ष येऊन भेटी घेतल्या ह्याचा खूप आनंद वाटतो आहे. तुम्ही लोकांसाठी काम केलंत की हे पक्ष, विचारप्रवाहांमधील अंतर वगैरे काहीही आड येत नाही ही राज साहेबांची शिकवण पुन्हा प्रत्ययाला आली. मी आजवर सदैव आपल्यासाठीच काम करत आलो आहे आणि तुमच्या शुभेच्छा रूपाने मिळालेले आशीर्वाद अखेरच्या श्वासापर्यंत आपल्यासाठीच काम करत राहण्याची ऊर्जा देत राहतील. पुन्हा एकदा सविनय साभार धन्यवाद. 🙏🏻
जय महाराष्ट्र!!!
आपला कृतज्ञ
प्रमोद (राजू) रतन पाटील