पवित्र पोर्टल वरती जाहिरात देण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत वाढ शेवटची आणि अंतिम समजून जास्तीत जास्त जागा पोर्टल वरती द्यावेत असे कडक आदेश आपल्या स्तरावरून द्यावेत आणि मनपा,नपा,आदिवासी आश्रम शाळा जाहिराती पाहिल्या टप्प्यात द्यावेत ही नम्र विनंती @dadajibhuse
आद.फडणवीस साहेब,तुमच्या कार्यकाळात खूप पुण्याचे काम सुरू आहे,गरिबांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे,या सर्व शाळा बंद करून तिथे मंदिरे उभे करा,तुमच्या पूर्वजांनी ते काम केले आता तुम्ही सुद्धा हे काम करा.भुसे साहेब आणि भोयर साहेब तुमच्या हाताने खूप पुण्याचे काम होत आहेत.
महाराष्ट्रातील कित्येक अशा शाळा आहेत तेथे शिक्षक नाहीत त्यामुळे गरीब मुलांना शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त शिक्षकांची भरती करून गरीब मुलांना शिक्षक उपलब्ध करून द्यावे आणि 75 हजार जागांची शिक्षण भरती करावी विनंती. @dadajibhuse@INCIndia@Dev_Fadnavis
या घोटाळ्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र आहे. फक्त जे सापडले ते चोर असा प्रकार आहे. हे सरकार आणि पोलिस घोटाळे थांबवू नाही शकत. पोलिस भरतीचे जे पोलीस विभाग पेपर घेतात ते पेपर सुद्धा हे आरोपी फोडतात बाकी विभागाचे विचारूच नका. सरकार आणि मुख्यमंत्री याबाबत झोपेचे नाटक करत आहेत.
Tet पेपर एक दिवस आधीच बऱ्याच जणांना भेटला होता. सर्व उत्तरे एका जागेवर बसून पाठ करून घेण्यात आली. @DGPMaharashtra पोलिसांना विनंती आहे सर्व उमेदवारांचे एक दिवस आधीचे लोकेशन चेक करा सर्व गोष्टी समजून जातील. काही जणांनी जिल्हा सोडून दुसरीकडे पेपर दिले आहेत ते याच गोष्टी साठी याबाबत पण चौकशी करा सर्व जण सापडून जातील. हा घोटाळा खूप मोठा आहे आणि याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्या.
@Dev_Fadnavis@KOLHAPUR_POLICE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@dadajibhuse@INCHarshsapkal@RRPSpeaks@lokmat @News18lokmat @LoksattaLive@SakalMediaNews
शिक्षकभरतीची परीक्षा होऊन सहा महिने पूर्ण झाले पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. दररोज नवीन नवीन घोटाळे आणि करोडो रुपयांची संपत्ती हडपली जाते तर दुसरीकडे निवडणुकीसाठी लाभाच्या हजारो करोडोच्या योजना सुरू आहेत.
मात्र समाज घडवणाऱ्या शिक्षकांची भरती होत नाही उलट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार.
लोकमत टीम आभार.!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र "मार्फत @Yesjassociation
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख
उद्धव ठाकरे साहेबाना @uddhavthackeray
शिक्षकभरती जलद गतीने राबवावी,कंत्राट शिक्षक रद्द करावे म्हणून आज संभाजी नगर मध्ये निवेदन देण्यात आले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब @OmRajenimbalkr
हिंगोलीचे खासदार नागेशपाटील साहेब
यांना शिक्षकभरती जलद व मोठयापदाची करण्यासाठी निवेदन देऊन खूप सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
@ShivSenaUBT_@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबाना
@AjitPawarSpeaks
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र " @Yesjassociation
मार्फत
शिक्षकभरती 100% रिक्त मोठ्या पदाची, कंत्राट भरती रद्द करावी, समूह शाळा योजना बंद करावी अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या असून तब्बल चार ते पाच मिनिटे दादांनी सर्व विषय समजून घेत मंत्रालयीन अधिकाऱ्यांना तात्काळ कॉल करून कळवला, उर्वरित मागण्या शिक्षण मंत्री भुसे साहेब यांना लवकरच कळवणार असल्याचे मागितले...!
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्यामुळे सविस्तर भेट घडून आलेली असून पुढील पाठपुरावा त्यांच्या मार्फत केला जाईल असा शब्द ..
@ChakankarSpeaks
धन्यवाद रुपालीताई...
निवेदक
रणरागिणी पूजा मॅडम,सुशांत सर....
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR
चला जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवू
गरिबांचे शिक्षण वाचवू..!
आम्ही राज्यातील एकही जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊ देणार नाही.
#मराठीशाळा, #शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती या चळवळीत सहभागी व्हा !!
लढू आणि जिंकू ✊✊
https://t.co/RNBDS0Ybi4
#निषेध ✖️
शाळा समूहकरण/जिल्हा परिषद शाळा बंदचा निर्णय अमान्य!
हा निर्णय तत्काळ रद्द करा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक!
✊ शाळा गावातच राहावी!
✊ #मराठी_शाळा_वाचवा!
✊ विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क सुरक्षित करा!
@dadajibhuse@RRPSpeaks@supriya_sule
मनापासून आभार @RRPSpeaks दादा
अनेक दिवसापासून MSCE कडे पाठपुरावा करत असताना अभियोग्यताधारक अनपेक्षित आलेले मार्क बघून गोंधळून गेले होते तुमच्या माध्यमातून आज हा विषय मार्गी लागला , अशीच साथ द्यावी आता #शिक्षकभरती_75000 करण्यासाठी आपण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जोरदार प्रश्न उपस्थित करून राज्यातील हजारो भावी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा...!
आम्ही कायम आपल्या सोबत राहू.
@NCPspeaks
विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब यांना छत्रपती संभाजीनगर येथील सर्व अभियोग्यताधारकांच्या वतिने "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र" @Yesjassociation
मार्फत पवित्रपोर्टल शिक्षकभरती संदर्भात निवेदन देण्यात आले
उपस्थित भावी शिक्षक
पाठे सर, सरकटे सर कृष्णा जगताप सर दत्तात्रय देशमुखसर, योगेश बोडकेसर, गणेश दिघोळेसर इत्यादी उपस्थित होते...!
@OfficeofUT@ShivSenaUBT_@andharesushama@dadajibhuse@Prksh_Ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व राज्याचा देशाचा आश्वासक चेहरा,सर्वव्यापी मा.ना. सुजात दादा आंबेडकर साहेब यांची अभियोग्याताधारकांनी नांदेड इथे भेट घेऊन TAIT 3 संदर्भात निवेदन दिले व चर्चा केली आणि TAIT 3 शिक्षकभरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून शासनास मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती केली तेव्हा दादांनी नक्कीच यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करून आपणांस न्याय देईल असा शब्द दिला.
सोबत अभियोग्यताधारक
राजू पाटील बोरगड, विठ्ठल टेंभूने, पंढरी वडजे, संदीप अंभुरे, अभिषेक सूर्यवंशी व इतर उपस्थित होते.
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@dadajibhuse@eprabuddhbharat@mieknathshinde
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुंटूबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा मा. नामदार श्री प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांना "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र" मार्फत शिक्षकभरती संबंधी विविध मागण्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील अभियोग्यता धारकांद्वारे निवेदन देण्यात आले.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@AjitPawarSpeaks@abitkar_prakash