एका पेपरफुटीला गुन्हे शाखा, दुसऱ्या पेपरफुटीला संरक्षण?
औषध निरीक्षक (DI) भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात पुरावे समोर आल्यानंतर MPSC ने स्वतः गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. मग पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणात दुहेरी निकष का? विद्यार्थ्यांनी पुरावे सादर करूनही पुणे महानगरपालिका गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करत नाही. उलट, विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुरू असलेल्या पोलिस तपासाबाबत “महानगरपालिका स्वतः तपास करत आहे” असे पत्र शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस तपासावर परिणाम झाल्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर MPSC ला गुन्हे शाखेच्या निष्पक्ष तपासावर विश्वास असेल, तर पुणे महानगरपालिकेला नेमका काय आक्षेप आहे?
पारदर्शकता हवी असेल तर एकच निकष हवा.विद्यार्थ्यांना न्याय हवाय त्यामुळे स्वतंत्र गुन्हे शाखेचा तपास झालाच पाहिजे. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि पुणे महानगरपालिकेने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड आम्हाला अजिबात मान्य नाही!
@INCHarshsapkal@mpsc_office@PMCPune@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#JusticeForStudents #PaperLeak #PMC #Recruitment #Maharashtra
राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवावी ही नम्र विनंती.
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
@shambhurajdesai साहेब आपण अधिवेशन काळात दिलेले आश्वासन आज सत्यात उतरताना दिसत परंतु कंत्राटी स्वरूपात..! नेमके कोणाच्या आदेशावरून @mhadaofficial विभाग अश्या पदभरती जाहिरात काढत आहेत? तत्काळ सरळसेवा पदभरती जाहिरात काढण्यात यावी ही विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra
सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्रक देण्यात आले आहे.
सर्व संबंधितांनी स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सुधारित मागणीपत्र
महाराष्ट्रातील युवक रोजगारासाठी संघर्ष करत आहेत आणि @CIDCO_Ltd मात्र भरती प्रक्रिया रखडवून बसले आहे. पात्र उमेदवारांना महिनोनमहिने प्रतीक्षा करायला लावणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे.
राज्य सरकारने आणि सीआयडीसीओ प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अंतिम निकाल जाहीर करावा व नियुक्ती आदेश द्यावेत. युवकांच्या संयमाचा अंत पाहू नका.
@INCHarshsapkal@samant_uday@Aaple_Sarkarr
#DhananjayShinde
#Dhananjay_Shinde
#CIDCO #Recruitment #JobsForYouth
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE