@yadujavalkar स्वरराज ने आता घरी बसून दुनियेला अक्कल शिकवण्या पेक्षा मुलाच्या बौद्धिक प्रगती वर लक्ष दिल तर फार बरं होईल… पण मराठी कलाकार आणि पत्रकार हे होऊ देणार नाही
@MahaDGIPR एक सामान्य नागरिक स्वतःसाठी काहीही न मागता जनतेच्या हितासाठी तुमची वेळ मागतोय त्यांनी अभ्यास करून पायी चालत महामार्गाची पाहणी केली आहे खड्डे, अपघातप्रवण ठिकाणे, त्रुटी यांचा अभ्यास करून पुराव्यांसह सविस्तर अहवाल तयार केला.
तेव्हा त्यांना किमान भेट द्यावी
प्रति,
मा. अपर मुख्य सचिव (Additional Chief Secretary),
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई ,
@MahaDGIPR
एका सामान्य नागरिकाची वेदना…
मी ना मंत्री आहे, ना आमदार, ना खासदार, ना मोठा नेता.
मी फक्त एक जागरूक भारतीय नागरिक आहे.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे जीव जात असल्याचे पाहून मी शांत बसलो नाही. स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून 29 दिवस 490 किलोमीटर पायी चालत महामार्गाची पाहणी केली. खड्डे, ब्लॅक स्पॉट्स, अपघातप्रवण ठिकाणे, त्रुटी यांचा अभ्यास करून पुराव्यांसह सविस्तर अहवाल तयार केला.
तो अहवाल शासनाकडे ईमेलद्वारे पाठवला. प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन जमा केला. टपाल विभागातही सादर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रत्यक्ष परिस्थिती समजावून सांगण्याची विनंती केली.
@MORTHIndia@nitin_gadkari@NHAI_Official@MORTHRoadSafety
पण आजही भेट मिळालेली नाही.
प्रश्न एवढाच आहे…
एका जागरूक नागरिकाने देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनाही जर दारातच थांबवले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची व्यथा कोण ऐकणार?
महामार्गाचा विषय आला की अनेकदा नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवले जाते.
“हा विषय NHAI चा आहे.”
“हा PWD चा आहे.”
“हे केंद्र सरकारचे आहे.”
“हे राज्य सरकारचे आहे.”
पण या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठी किंमत कोण मोजतो?
सामान्य नागरिक.
रस्त्यावर अपघातात जीव गमावणाऱ्या व्यक्तीला हे महत्त्वाचे नसते की रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारीत होता. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे असते ते फक्त एक जीव वाचला असता का?
माझी अपेक्षा कोणावर टीका करण्याची नाही.
माझी विनंती इतकीच आहे की, जेव्हा एखादा नागरिक अभ्यासपूर्ण अहवाल, पुरावे आणि उपाययोजना घेऊन येतो, तेव्हा त्याला किमान काही मिनिटे भेट देऊन त्याचे म्हणणे ऐकले जावे.
कारण लोकशाहीमध्ये नागरिक हा केवळ मतदार नसतो; तो शासनाचा भागीदारही असतो.
“Prevention is Better Than Cure” हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले, तर अनेक निष्पाप जीव वाचू शकतील.
🇮🇳 देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना वेळ द्या. कदाचित एखाद्याचा जीव वाचेल.सोबत पुरावे ही जोडत आहे.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
📧: [email protected]
🚨 मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग | चिपळूण | रत्नागिरी ।आजचे वास्तव | 26 जुलै 2026
चिपळूण परिसरातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची ही आजची अवस्था आहे. हे सर्व फोटो GPS लोकेशन आणि टाइमस्टॅम्पसह नोंदविण्यात आले आहेत.
@MORTHIndia@MORTHRoadSafety@NHAI_Official@nitin_gadkari@CMOMaharashtra@PratapSarnaik@iitbombay@trip_centre@iitdelhi@MahaPolice@HSPMaharashtra
मी यापूर्वीही या समस्येकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. आता पुन्हा हेच वास्तव GPS पुराव्यांसह दाखवत आहे. उद्देश एकच—वेळेत कारवाई होऊन नागरिकांचे जीव वाचावेत.
प्रत्येक खड्डा हा अपघाताचे संभाव्य कारण ठरू शकतो. संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करावी, ही नागरिकांची अपेक्षा आहे.
प्रश्न रस्त्याचा नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या जीवाचा आहे.
नागरिकांची सुरक्षितता सर्वप्रथम.🇮🇳🙏
फोटो सौजन्य / Photo Credit: चिराग ( सुजाण नागरिक)
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#MumbaiGoaHighway #Chiplun #RoadSafety #NHAI #NHPWD #Konkan #Maharashtra #CitizenFirst