जनतेने दिलेला कौल 100 कोटीत विकून निर्लज्जतेच्या विमानात बसताना यांना लाज आणि भीती यामुळे वाटत नाही कारण यांची ही हिम्मत "जनता सगळं विसरते" यातून येते.
यावेळी हे एका शिवसेना पक्षाचे गद्दार नसून जनतेचे गद्दार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर तिन बंडखोर खासदार मतदार संघाकडे रवाना. नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि बंडू जाधव हे तिघेही मुंबईतून नांदेडकडे निघाले. मतदार संघात तिघांच्याही स्वागताची तयारी!
@SanjayJadhavPbn@DeshmukhSanjay_#Shivsena
या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडली आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकावर किती होतोय ते वाचा.....!
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात दोन युवकांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मारहाण इतकी अमानुष होती की त्या दोन युवकांना पोलिसांनी पहिल्यांदा प्रचंड मारहाण केली
भयंकर तर आहेच पण कायदा आणि सुव्यवस्थेचा धिंडवडा निघत असताना तालुका, जिल्हा सगळे निर्लज्ज होत असताना मेन मीडिया यापासून लांब राहत आहे. तुमच्या सगळ्यांच्या नाकर्तेपणाचा धिक्कार करून आम्ही लढण्याची तयारी करत आहोत.
महाराष्ट्रातील या गावात एक गंभीर प्रकार पोलिसांनी केला आहे.निर्दोष 2 युवकांना अमानुष मारहाण करून परत चूक लक्षात येताच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणात पोलिसांची चूक लक्षात येताच दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सर्व मीडियाने लवकरात लवकर हे प्रकरण समोर आणणे गरजेचे आहे
यांचे कार्यक्रम ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना लाज का वाटत नाही ...?
राजकारणासाठी धर्म विकणारे अजून किती खालच्या पातळीला जातील माहित नाही.
@BJP4India@BJP4Maharashtra
असल्या भोंदू बाबांना टायर मधे टाकून चाबकाचे फटके दिले पाहिजेत.
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना? अशी शंका येते.
भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढं महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. सरकार या भोंदूवर कारवाई करेल असं वाटत नाही. त्यामुळं ‘सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा’, हे आता शिवप्रेमी जनता आणि या सर्व महामानवांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवायला हवं.
महानालायक गोप्या पडळकर याने जयंत पाटील साहेबांवर खालच्या पातळीची टीका करत भाजप आणि त्याच्या आईने त्याच्यावर केलेल्या संस्काराची अब्रू वेशीवर टांगली आहे. अश्या माजोरड्या व नीच आमदाराला पाठीशी घालणाऱ्या @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra यांचा जाहीर निषेध...!@Jayant_R_Patil @NCPspeaks
देशांमध्ये एखादा राज्याचा झेंडा असणं हे दुहि माजवण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र दिनाला तिरंगा असणे ही अभिमानाची गोष्टी आहे.
@abpmajhatv@ShivSenaUBT_@INCIndia
IPL आणि सरकार किंवा राज्याचा काहीही एक संबंध नसताना कर्नाटक सरकारने त्याला राज्यात इव्हेंट करणं ही निषेधार्ह आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या संघाचे चाहते असताना कोहलीच्या हातात राज्याचा झेंडा देणे हा तर निव्वळ मूर्खपणा आहे. या संपूर्ण घटनेला तिथले काँग्रेस सरकार आणि प्रशासन जबाबदार.
सर्व MIDC मध्ये राजकीय वरदहस्ताने हेच सुरू आहे. महाराष्ट्रात एका MNC कंपनीत भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले. याबाबतीत आता कठोर कायद्याची आणि कारवाई ची अपेक्षा @Dev_Fadnavis यांच्याकडून आहे. घडलेला प्रकार महाराष्ट्राच्या औद्योगिक अस्मितेला कलंक लावणारा आहे.
उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा…
खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. @Dev_Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील.
#MaharashtraPolitics #MIDC #industry