जय मनसे जय महाराष्ट्र,.
ट्विटर चा एक नियम आहे आणि तोच माझा पण नियम आहे.. दुसऱ्यांना ट्रोल करता येतं, तसच स्वताला ट्रोल केलं तर सहन करण्याची पण तयारी ठेवावी 😁
देशात सगळीकडे आलबेल आहे… फक्त ते मोदीजींच्या नजरेत !
महागाई वाढतेय ….पण मोदीजींच्या नजरेत देश प्रगती करतोय !
बेरोजगारीचा प्रश्न गंभीर …पण मोदीजींच्या नजरेत तरुणांचं भविष्य उज्ज्वल आहे !
शेतकरी अडचणीत …पण मोदीजींच्या नजरेत कृषी क्षेत्राची भरारी आहे म्हणे !
मध्यमवर्गाच्या खर्चाचं गणित बिघडलंय …पण मोदीजींच्या नजरेत अर्थव्यवस्था मजबूत म्हणे !
अर्थव्यवस्था एवढी मजबूत आहे मग सोने खरेदी करू नका, परदेशात फिरू नका असे का सांगत आहेत ? मोदींच्या एकाच वक्तव्यात हा विरोधाभास का दिसतोय ? कारण आकडे कागदावर चमकत आहेत,पण त्या आकड्यांच्या प्रकाशात सामान्य माणसाचं घर उजळत नाहीये.यांना देश जगातला सर्वात वेगाने प्रगती करणारा दिसतो…आणि वास्तवात सामान्य माणूस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खर्चाचं गणित जुळवत बसतो. म्हणून प्रश्न एवढाच की देशाची प्रगती नेमकी कोणाची होतेय ? आकड्यांची… की जनतेची ? कारण बढाया कितीही मोठ्या मारल्या, तरी जनतेच्या रिकाम्या खिशाला त्या ऐकू येत नाहीत !
#फेकू #GDP
१५ लाख देतो सांगून देशवासियांना चॅाकलेट वाटले, आता जगभर वाटत ‘सुटलेत’ !
देश आर्थिक संकटात आहे. खरी परिस्थिती लोकांना अजूनही सांगितली जात नाही, फक्त काटकसर करा सांगत आहेत. लोकांना देशात सध्या काय चालले आहे याचे अंदाज बांधत संभ्रमात जगावं लागत आहे.अशा परिस्थितीत मोदींनी मेलोनी यांना चॅाकलेट देत सेल्फी व्हिडिओ काढणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
एकीकडे अर्थव्यवस्था गटांगळ्या खातेय,रुपयाचं ऐतिहासिक अवमुल्यन झालंय,डिझेल-पेट्रोल, गॅसचा तुटवडा आहे,शेअर मार्केटचा बाजार उठलाय पर्यायाने महागाई प्रचंड वाढलीये. दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत आहे.देशाचा जवान व किसान दोन्ही हतबल आहेत. आज देश संकटात असताना पंतप्रधानांनी किमान गंभीर असल्याचे नाटक तरी करावे !
रोम जळत असताना रोमचा सम्राट नीरो बासुरी वाजवत होता.आमचे चॅाकलेट वाटत आहेत असा समज देशवासियांचा होणार नाही याची काळजी मोदीजी नक्की घेतील अशी आशा करू या !
निवडणूक आयोगाला साधा प्रश्न ……..
जर XYZ नावाच्या उमेदवाराने त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये व बॅलेट युनिटवर या उमेदवाराचे व NOTA पर्याय म्हणून अस्तित्वात आहे तर मग XYZ बिनविरोध निवडून आला आहे हे कसे म्हणता येईल ? जनतेला पर्याय निवडण्याची मुभा नाकारता कशी येईल ?
#लोकशाहीची_हत्या #NOTA #ElectionCommission
आजपर्यंत समजत होतं विरोधक म्हणजे सरकारवर प्रश्न करणारे…
आता कळलं —
विरोधक म्हणजे सत्ता मिळेपर्यंत सरकारविरोधात बसणारे 🤦♂️
पक्ष बदलला की विचारधारा बदलते का?
की फक्त फायद्याचा हिशोब बदलतो?
जनता मात्र आजही त्याच प्रश्नांसोबत…
उत्तर देणार कोण?
#पक्षांतर#राजकारणाचा_खेळ#केडीएमसी
@rajupatilmanase ह्यांना फक्त दांडिया खेळवायला वेळ आहे बाकी लोक जगली काय मेली काय ह्यांना घंटा फरक नाही पडत कारण ह्यांचा ताफा जाताना पोलिस रस्ता मोकळा करून देतात... कसलीच लाज नाही आहे ह्या सरकारला कल्याण ग्रामीण चा आमदार त्याच्या वॉर्ड मधले रस्ते कधी सुधारले नाहीत तर शिळफाटा काय घंटा सुधारणा
गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
@rajupatilmanase@Dev_Fadnavis@mieknathshinde@MMRDAOfficial@NDRFHQ दादा उपमुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तेथील गोडबंदर रस्ता नीट नाही करू शकत आपण अपेक्षा करतो ह्यांच्या कडून डोंबिवली चे रस्ते होतील. ह्यांच्या कडून काहीच होणार नाही फक्त फालतू राजकारण, आणि फोडाफोडी च व्यतिरिक्त.
@avinash_mns हा आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमी मधला आहे आणि मिळालेल्या माहिती नुसार कल्याण च्याच गुंड टोळीचा सदस्य आहे. ह्याला नाक्टा करून फोडला पाहिजे दादा
@avinash_mns@avinash_mns@avinash_mns ह्या सरकार ची महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची इच्छा शक्ती मेलेली आहे त्यामुळे ह्यांच्या कडून अपेक्षा करण सोडून द्यावं आणि जे करायचं आहे ते मनसे लाच करावं लागणार आहे
ज्यांच्या नजरेत महाराष्ट्राचे नवनिर्माण आहे आणि मनात मराठी अस्मिता ! त्यांची प्रत्येक सभा, प्रत्येक भाषण आमच्यासाठी जीवन ग्रंथच. त्यांचं नेतृत्व म्हणजे आम्हां मनसैनिकांसाठी दिव्य ज्योत.. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी मा.साहेब तुम्हाला मनसे शुभेच्छा ! आणि मानाचा मुजरा ! तुमची साथ आणि पाठीवर हात सदैव राहो हीच इच्छा ! @RajThackeray
#RajSahebThackeray #GuruPurnima #राजसाहेब_ठाकरे #गुरुपौर्णिमा
मराठी हीच आपल्या सगळ्यांची ओळख आहे. पक्ष कुठलाही असो, विचारधारा कुठलाही असो, मराठी ही ओळखच पुसायचा प्रयत्न झाला तर आपल्याला कोण विचारणार? हाच प्रयत्न सध्या सुरु आहे. म्हणूनच ५ जुलै २०२५ ला मुंबईत मराठी माणसांचा महामोर्चा निघणार आहे. इथे कोणताही झेंडा नाही फक्त मराठी हाच अजेंडा असेल. या महामोर्च्यात तमाम मराठी जनांनी जरूर सहभागी व्हा.
#मराठी #महाराष्ट्र
#हिंदी_सक्ती #राजठाकरे
मराठी भाषेच्या मुळावर जर घाव घालायचा प्रयत्न केलात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज आहे ! मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत !
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना#मनसे#मराठी