📍नागपूर : हिवाळी अधिवेशन २०२५
नागपूर येथील रवी भवन येथे राज्यभरातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्यासविस्तर मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमपूर्वक ऐकून घेत त्यांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या.
काल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेत त्यांना गुरु पौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आज मंत्रालयातील दालनात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
यावेळी मोर्शी - वरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार उमेश यावलकर, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव पंडित जाधव यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधिश मा. भुषण गवई यांचा आज विधीमंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. "भारताचे संविधान" या विषयावर मा. सरन्यायाधीश यांनी विधीमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केले.
आज मंत्रालयातील कार्यालयात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला. त्यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गी लावल्या.
महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महानायक स्व. वसंतराव नाईक साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसेच सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
यवतमाळ येथे युवासेनेच्या वतीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने स्वागत केले, यावेळी त्यांनी युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार केला.
यवतमाळ येथे जिल्हा शिवसेनेच्या वतीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या भव्य स्वागताचे अभुतपुर्व क्षण...
#teamsanjayrathod#संजयराठोड#SanjayRathod#अभिष्टचिंतनसोहळा
आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मान. ना. संजयभाऊ राठोड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने मूळगाव पहूरला जाऊन संत श्री सेवालाल महाराज, श्री साई बाबा आणि माता जगदंबाचं दर्शन घेतलं. आयुष्यात नेहमी सेवा, भक्ती आणि लोकसेवा घडत राहो, अशी प्रार्थना केली.
आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मान. ना. संजयभाऊ राठोड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मूळगाव पहूरला जाऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळचा दिवस अत्यंत खास ठरला. माझी जीवनसाथी भाग्यलक्ष्मी सौ.शीतल यांनी औक्षण करून,शुभेच्छा दिल्या.त्याआधी घरातील देवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.यामुळे मनाला नवचैतन्य लाभले आणि दिवसाची सुरुवात एक वेगळ्याच सकारात्मक ऊर्जा,श्रद्धा आणि आनंदाने झाली
पंढरीसी लोका नाही अभिमान,
पाया पडे जन एकमेकां!
पंढरपूर येथे मोतीराम महाराज धर्म संस्था मठाच्या वतीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांचा सपत्नीक श्री विठ्ठल, रखुमाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
#pandharpurwari
पावलो पंढरी पार नाहीं सुखा,
भेटला हा सखा मायबाप!
पंढरपूर येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी श्री विठ्ठलाचे सपत्नीक दर्शन घेतले, मनोभावे विठ्ठलचरणी लीन झाले.
#aashadiekadashi#pandarpur#vari2025
पंढरपूर येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांचे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख मा. सचिन चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक स्वागत व सत्कार केला.
#Pandharpur#SanjayBhauRathod#ShivSena