concise daily summaries newspaper articles and facts for UPSC . Simplifying complex articles into digestible insights which can be used in UPSC answers!
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
⏱️ 80-80-90 Rule — The Gamechanger for UPSC Mains Time Management The most practical way to manage time in Mains. Forget the “10 min for 15 markers” myth — it doesn’t work under real pressure. 1st Hour – 80 marks 2nd Hour – 80 marks 3rd Hour – 90 marks It’s flexible —
HOW STUDENTS ARE USING GEMINI TO PREDICT EXAM TOPICS (Up to 40–50% ACCURACY)
Not cheating. Not guessing. Only pattern analysis.
Copy these 7 prompts to predict any exam.
BOOKMARK or LOSE
A Thread↴
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
Tender for the purchase of expensive BMW cars for its members does not augur well for the institution of Lokpal.
Simple living and high performance is the hallmark of an anti-corruption ombudsman. Where is the performance?
प्रिय रोहित जी,
..महाराष्ट्र केडर मिळालेल्या IPS अंजना कृष्णा यांना सापत्न वागणूक मिळणार नाही. त्यांना मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची हमी हवी. अजित पवारांना प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच क्लिन चिट देत आले आहेत; आतादेखील भाषेचा बेनिफिट ॲाफ डाऊट घेऊन चुकांवर पांघरून घातलं जाईल. वास्तविक पाहता, मुख्यमंत्री असोत की वैधानिक पद नसलेले उपमुख्यमंत्री किंवा मंत्री-राज्यमंत्री असोत; कुणालाही आयएएस/आयपीएस तसंच राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना फोनवरून आदेश देता येत नाहीत, फोनवरून दरडावणं-धमकावणं तर नाहीच. त्यामुळे समोरच्या अधिकाऱ्यांच्या सेवा नियमावलीचाही विसर पडता कामा नये.
कुर्डू प्रकरणाच्या दोन्ही एफआयआर आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन बघितलं, तर IPS अंजना कृष्णा यांना स्वतःच्या बचावात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो त्या राखून ठेवू शकतात किंवा वापरू शकतात, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल.
यापूर्वी राज्यात राजकीय हस्तक्षेप आणि द्वेषातून अनेक चांगल्या अधिकाऱ्यांवर बदल्या, बढत्या, नियुक्त्यांच्या वादात अन्याय झालाय. खरंतर यादी मोठी आहे, पण सोलापूरचा विषय आहे, तेव्हा उदाहरण म्हणून सोलापूरच घेऊया… सोलापूरच्या जिल्हाधिकारी असताना रोहयो घोटाळा काढला म्हणून IAS मनिषा वर्मा (माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा रोष), सोलापूरचे पहिले पोलीस आयुक्त हरिश बैजल(माजी उपमुख्यमंत्री व सध्या मंत्री यांचा रोष म्हणून ११-१२ वर्षे IPS conferred व्हायला लागली) आणि आता सोलापूरमध्येच प्रशिक्षणार्थी IPS असलेल्या अंजना कृष्णा यांनाच चुकीचं ठरवण्याचा आटापीटा. असं सर्व बघितल्यामुळे रिप्लाय देण्याचा खटाटोप केला, बाकी काही नाही. धन्यवाद! 🙏
ता.क. : तुम्ही काकांचा बचाव जरूर करा. पण कृपया काकांना त्यांच्या काकांचं प्रशासकीय काळातलं वागणं-बोलणं-संवाद याचा वस्तुपाठ गिरवायला सांगा. नाही तर किमान एकदा राज्यशकट हाकताना सत्ताधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधल्या व्यवहार-आदेश-निर्देशाबाबतची सर्व्हिस रूल्स ॲंड रेग्युलेशनची पुस्तिका वाचायला सांगा.
Wish all of this turns out to be fake. If it’s not, then it’s a betrayal of those candidates who’ve been preparing for a whole year. UPSC should look into this matter as soon as possible.
#UPSCPrelims2025#upscreforms#upsc2025#upscscam#upsc
@ashish_jadhao Thank for clarifying sir. seeing your tweets in past few days about IPL we thought rather misunderstood IPL was real cricket. If it was not real cricket why would have you tweeted right.? #opportunist 😢