प्रत्येक उमेदवार जसे शक्य होईल त्या मार्गाने लढत आहे आणि आपापला आवाज सरकारच्या @mpsc_office च्या पर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार
काही ऑनलाईन मिडिया मार्फत काही रस्त्यावर उतरून काही ईमेल काही कॉल वरून आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचत आहेत MPSC पर्यंत पोहोचत आहेत.
एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेऊ नये अशी आग्रही मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केल्याबाबत आणि चिखली तहसीलमध्ये नायब तहसीलदारांची पदे तातडीने भरावी यासाठी मा. महसूलमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करणारी दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार!
#MPSC #OnlineExam #ChikhliTahsil #NayabTehsildar #ShwetaMahalePatil
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२६ पासून संगणक-आधारित चाचणी (CBT) आणि मल्टिशिफ्ट नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन पारंपरिक ऑफलाइन OMR पद्धत कायम ठेवावी. - रोहित पवार
https://t.co/xhD6aGu4lN< येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #Mpsc #OMR #Eknathshinde #CBT
‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगर इथं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्व मागण्या रास्त असून त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे.
सोमवार दि. ६ जुलै २०२६. सकाळी १० वा.
स्थळ – क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर
यापुढं #MPSC कडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून त्यामुळं विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. पेपरफुटी, दूरचे परीक्षा केंद्र, तेथील गैरप्रकार, नॉर्मलायझेशनबाबतची अस्पष्टता यामुळं प्रामाणिक आणि गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळं ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. याबाबत काल मुख्यमंत्री महोदयांचीही भेट घेतली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं आणि विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील असलेल्या या विषयामध्ये आपणही व्यक्तीशः लक्ष घालून ऑनलाईन परीक्षेचा निर्णय बदलण्यास #MPSC ला भाग पाडावं, अशी विनंती केली.
@mieknathshinde
✊ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचा तीव्र आक्रोश!
देशभरात NEET परीक्षेतील गोंधळ, विविध प्रवेशपूर्व पात्रता परीक्षांमधील गैरव्यवहार आणि आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
"पेपर फुटी थांबवा... विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा!" अशी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश सचिव व प्रवक्ते अक्षय राऊत, नगरसेवक व तालुकाध्यक्ष वैभव वानखडे, प्रदेश महासचिव नितेश वानखेड़े, प्रदेश सचिव उत्कर्ष देशमुख, प्रदेश सचिव परीक्षित जगताप, सागर कलाने, नितीन काळे, मयूर देशमुख, पियुष मालवीय, सागर गोडबोले, गौरव चौधरी यांच्यासह शेकडो युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पेपरफुटीच्या साखळीला कायमचा आळा घालण्यासाठी युवक काँग्रेसचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील.
#StudentsFirst #StopPaperLeak #JusticeForStudents #TET #NEET #YouthCongress #Amravati #Maharashtra
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा..!!
MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करत आहे.
पहिली ठिणगी पडली... 🔥
ऑफलाईन परीक्षा घेऊनही जलद निकाल देता येतो, हे आयोगानेच दाखवून दिलं. मग CBT आणि नॉर्मलायझेशनचा हट्ट कशासाठी?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभं राहील.
#MPSC#OfflineExam
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
आज अमरावती येथे MPSC offline करावी या मागणी करिता मोर्चा निघाला आहे.
हळू हळू सर्व जिल्ह्यात निघणार आहेत.
काय वेळ आणली मा. @mpsc_office तुम्ही विद्यार्थ्यांवर.
तुम्ही रेटून नेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.
@bhimanwar@Mpsc_Andolan
MPSC व राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला पुराव्यासह जो विरोध करत आहेत त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू झाले आहे, विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका @Dev_Fadnavis@RRPSpeaks@mpsc_office@satejp
सगळ्या त्रुटी दिसत असताना सुद्धा cm सर
विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची
भाषा करतात??
किती विरोधाभास हा
मुळात परीक्षा ऑनलाइन घ्या ही मागणी कोणी
केली ??
शासन आणि TCS IBPS यांच्यात काही लागेबांधे
आहेत का??
सर्व ओके असताना
ऑनलाईन चे अदृश्य खोके कशासाठी आणि कोणासाठी??🙏
राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल: २२ दिवसांत
गट ब पूर्व परीक्षा निकाल: १७ दिवसांत हे दोन्ही
ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांचे निकाल मा. आयोगाने अतिशय गतिमान पद्धतीने लावले आहेत याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार.
ऑफलाईन बाबत आयोग एवढा गतिमान असताना "ऑनलाईन" चा अट्टाहास नको.