माझं काम हे फक्त पोट भरण्याची जागा नाही.
ते माझं आनंदी राहण्याचं माध्यम आहे. एकमेकांचं जगणं समृद्ध करण्याचं हक्काचं ठिकाण आहे.
हे जेव्हा प्रत्येकाला आतून कळेल तेव्हाच सर्वार्थीने आपल्या प्रगतीला सुरुवात होते.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे जनक, शेतकऱ्यांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे दूरदर्शी नेतृत्व वसंतराव नाईक यांच्या पवित्र समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.
आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार..!
तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया.
निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी मी आपणांस खात्री देते.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
□ मनामनात गणगोत 🌿
मा. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, मुंबई
@LetsReadIndia
ज्ञान ही समाजाची खरी ताकद असते. पण आज हीच ताकद कमकुवत करण्याची प्रक्रिया नकळतपणे सुरू आहे, असे चित्र दिसते. वाचनसंस्कृती जोपासणारी आणि ज्ञानाची कवाडे उघडी ठेवणारी ग्रंथालय व्यवस्था दिवसेंदिवस दुर्लक्षित होत चालली आहे. “गाव तिथे ग्रंथालय” ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली आहे.
२०१२ पासून अनेक ग्रंथालयांना मान्यता मिळालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जे आधीपासून कार्यरत आहेत, त्यांची अवस्था देखील बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन रखडलेले आहे, अनुदान थकलेले आहे आणि नवीन पुस्तकांची खरेदी जवळपास थांबली आहे. परिणामी, ग्रंथालये ही जिवंत ज्ञानकेंद्र न राहता केवळ बंद कपाटांची जागा बनत चालली आहेत.
वाचन चळवळ ही समाजाला विचारशील, सुसंस्कृत आणि प्रगल्भ बनवणारी चळवळ आहे. मात्र, ही चळवळ रुजवणारी यंत्रणाच जर कुचकामी ठरत असेल, तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. माहितीचा स्फोट झाला असला तरी त्यात सखोलता आणि चिकित्सक दृष्टिकोन कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत तरुणांना योग्य दिशेने वळवण्याची जबाबदारी शासनाची आणि समाजाची आहे. पण प्रत्यक्षात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नाहीत.
माझी मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती आहे की, त्यांनी ग्रंथालयांना ४० टक्के अनुदान देण्यासाठी लागणारे ४२ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. भविष्यातील महाराष्ट्र घडविण्यासाठी हे पाऊल उचलावे.
वाचनाची सवय कमी झाली, तर विचार करण्याची क्षमता खुंटते. परिणामी समाज अधिक संकुचित बनतो. म्हणूनच, शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देणे अत्यावश्यक आहे. तसेच समाजानेही वाचनाची सवय पुन्हा जोपासण्याचा संकल्प केला पाहिजे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
सदर योजनांबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.