@mpsc_office नगरपरिषद च्या जाहिरातीची तारीख आधी की MPSC गट क पूर्व आधी , या स्पर्धेत MPSC ने आघाडी घेत बाजी मारली.. त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मनमानी कारभार करून पोरांचे वय, पैसा जाळल्याबद्दल धन्यवाद 🙏 @CMOMaharashtra@MahaDGIPR@mpsc_office@madhurimisal
CM साहेब, MPSC ने पोरांचा खेळ मांडला आहे त्याबद्दल त्यांना तुमच्या प्रेमळ 🤬 भाषेत समज द्या.. MPSC च्या परीक्षा वेळेवर घ्यायची लायकी नसेल पूर्ण बरखास्त करा, पोरांची वर्षे का वाया घालवत आहात , याची पोरं श्रीमंत बापाची आहेत.. आम्ही नाहीत
@CMOMaharashtra
@mpsc_office आम्हाला तुमची लाज च वाटते अयोग्य आयोग.. जरा एका परीक्षा साठी एवढ्या तारखा , २६ जुलै, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर आता ३ जानेवारी , आयोगातील माणसांनों तुमची पोरं आहेत श्रीमंत बापाची पोरं.. आम्ही नाहीत , तुमचे घोळ आणि पद्धती झाकण्यासाठी आमची का वर्षे वाया घालवत आहात?
@mpsc_office जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे आयोग राव तुम्हाला.. २०२६ ची पूर्व परीक्षा २०२७ मध्ये घेत आहात मुख्य कधी २०२८ ला घेणार का? आता joining कधी २०२९ ?? पोरांना फक्त मूर्ख बनवा
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे जाणार ...कारण कोजागिरी पौर्णिमा आहे ..MPSC आयोग नक्की करायचे काय आहे तुम्हाला?? का पोरांचे आयुष्यचां प्रश्न 1 वर्ष पुढे नेत आहात??? परीक्षा वेळेवरच घ्या , आधीच खूप वेळ केलात आता तरी नको..तुमच्या चुकांची शिक्षा नेहमी पोरांनीच का भोगायची??
@mpsc_office
@mpsc_office गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे जाणार ... कारण कोजागिरी पौर्णिमा आहे .. MPSC आयोग नक्की करायचे काय आहे तुम्हाला?? का पोरांचे आयुष्यचां प्रश्न 1 वर्ष पुढे नेत आहात??? परीक्षा वेळेवरच घ्या , आधीच खूप वेळ केलात आता तरी नको.. तुमच्या चुकांची शिक्षा नेहमी पोरांनीच का भोगायची??
@CMOMaharashtra गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे जाणार .. कारण कोजागिरी पौर्णिमा आहे ..MPSC आयोगाला तुमच्या प्रेमळ भाषेत समज द्या CM साहेब?? का पोरांचे आयुष्यचां प्रश्न 1 वर्ष पुढे नेत आहात?? परीक्षा वेळेवरच घ्या ,आधीच खूप वेळ केलात आता तरी नको..आयोगाच्या चुकांची शिक्षा नेहमी पोरांनीच का भोगायची?
@madhurimisal Madam 2 वर्ष झाले ऐकतोय exam होणार म्हणून यांचे अजून आकृतीबंध आणि बैठका च चालू आहेत, कृपया तुम्ही त्यांना एक फिक्स तारीख द्या आणि exam 2 महिन्याच्या आत मध्ये घ्यायला लावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis नुसते बोलून नाही करून दाखवा .. MPSC वरचा गेलेला संपूर्ण विश्वास परत आणावा , आणि सर्व परीक्षा ठरलेल्या वेळेत पारदर्शक पार पडणे गरजेचेच
MPSC चा हा मास्तर खरंच भारीय.... दरवेळी बेधडक भूमिका घेतो, मागच्या वेळी देखील यांनीच आंदोलन केल होत.
पुण्यातील बरेचसे MPSC शिक्षक लाचार आहेत आणि CD ला घाबरतात....
सागर भस्मे, अमरावती🔥🔥🔥
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra@maha_governor@satejp@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधात अमरावती येथून संविधानिक आणि लोकशाही मार्गाने "आंदोलनाची" सुरुवात झालेली आहे.
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना राजीनामा द्यावाच लागेल तसेच या पेपरफुटीची सखोल #CBI मार्फत चौकशी करावीच लागेल.
अमरावतीकर ✊✊🫡
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याचा MPSC ने केलेला दावा पोलीस तपासात फोल ठरला आणि एमपीएससी मधीलच ३ अधिकाऱ्यांना अटक झाल्याने या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रतिमेला डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून त्यासाठी नवी मुंबईत MPSC कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रातिनिधीक आंदोलनात सहभागी होऊन अध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
RTO कमिशनर असताना भीमनवार यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे त्यांच्यावर आरोप असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत म्हणून या गैरप्रकाराकडं दुर्लक्ष करत सरकारने त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. अध्यक्षांवरच असे गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्यांच्या नेतृत्त्वाखालील कारभार पारदर्शक कसा होईल? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांना तातडीने या पदावरून हटवून तुकाराम मुंडे साहेब किंवा महेश झगडे साहेब यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या पदावर नेमणूक झाली पाहिजे तरच निवड झालेले अधिकारी हे जनतेप्रती प्रामाणिक राहून सेवा करतील. त्यासाठीच राज्यातील विद्यार्थी पुण्यातून लवकरच मोठा लढा उभारणार असून त्यांच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे.
(विद्यमान अध्यक्षांविरोधात पूर्वी झालेल्या तक्रारीची काही पानं इथं माहितीसाठी देतोय आणि संपूर्ण पत्रही सोबतच्या लिंकवर पाहता येईल.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
https://t.co/W6YMPiMVnA
#MPSC #पेपरफुटी
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु धुळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंती आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घेत कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
🚨 MPSC राज्यसेवा परीक्षेतील Optional विषयांच्या गुणांबाबत गंभीर प्रश्न!
Philosophy
📌 पेपर १ - 06 | पेपर २ - 58
Geography
📌 पेपर १ - 121 | पेपर २ - 02
Sociology
📌 पेपर १ - 11 | पेपर २ - 100
❓ एकाच उमेदवाराला एका पेपरमध्ये 100+ गुण आणि त्याच Optional विषयाच्या दुसऱ्या पेपरमध्ये 02, 06 किंवा 11 गुण मिळण्यामागे नेमकी कारणे काय?
❓ मूल्यांकनाची पद्धत, मॉडरेशन आणि गुणांकनाची प्रक्रिया पारदर्शक आहे का?
❓ UPSC मुख्य परीक्षा 3-4 वेळा दिलेल्या अनुभवी उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांमध्येही अशा प्रकारची अत्यंत मोठी तफावत का दिसते?
हा केवळ काही विद्यार्थ्यांच्या गुणांचा प्रश्न नाही. ही MPSC च्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासाची बाब आहे.
आणखी एक गोष्ट लक्षात घ्या -
Drug Inspector प्रकरण हे हिमनगाचे फक्त टोक आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांचा आवाज राज्याच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतरच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला.
आज प्रश्न MPSC च्या पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेचा आहे.
महापरीक्षा पोर्टलच्या काळात जे घडले, त्यातून आपण काहीच शिकलो नाही का? TCS आणि IBPS सारख्या परीक्षा यंत्रणांबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. आता MPSC बाबतही प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
आमची मागणी स्पष्ट आहे:
➡️ Optional विषयांच्या गुणांकन पद्धतीची स्वतंत्र चौकशी करा.
➡️ संशयास्पद गुणतफावतीचे वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करा.
➡️ मॉडरेशन/नॉर्मलायझेशनची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करा.
➡️ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पारदर्शक पुनर्मूल्यांकन/स्क्रुटिनीची व्यवस्था करा.
➡️ परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर उत्तरदायित्व निश्चित करा.
ही लढाई कोणत्याही एका विद्यार्थ्याची नाही - ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे.
✊ MPSC वाचवण्यासाठी आता “MPSC बचाव आंदोलन” उभे करण्याची वेळ आली आहे. आज आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या गुणवत्तेवर नव्हे तर व्यवस्थेच्या मनमानीवर भविष्य ठरेल. एकत्र या. प्रश्न विचारा. पारदर्शकतेसाठी लढा द्या.
@mpsc_office
#MPSC #MPSCबचावआंदोलन #MPSCStudents #MPSCExam #Transparency #JusticeForStudents
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
आधीच जाहीर केल्याप्रमाणे उद्या (मंगळवार, दि. १ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता MPSC कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई..!
यावेळी पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या अध्यक्षांऐवजी नवीन अध्यक्षांची भेट होईल, अशी अपेक्षा आहे. जर जुनेच अध्यक्ष खुर्चीला चिकटून बसले तर त्यांना भेटण्यात कोणताही रस नाही त्यांच्याऐवजी सचिवांना भेटून विद्यार्थ्यांच्या इतर काही विषयांवर चर्चा करू. अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करून, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संविधानिक मार्गाने अंतिम लढा उभारण्याचं नियोजन लवकरच केलं जाईल आणि याचा श्रीगणेशा पुण्यातून होईेल.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी