सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे . किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नाही! आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही !
सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मिडीयावर अडकायला लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजाण समाज राजकारणपासून दूर जाऊन लाईक्स, शेअर यातच अडकला आहे. मी अनेकदा समाजातील लोकांना आवाहन करत आलो आहे की तुम्ही कुठल्याही पक्षात जा पण राजकारणाचा भाग बना. महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला , त्यातून एक आंदोलन उभं राहिलं, महाराष्ट्रातील बहुसंख्य पक्ष एकत्र आले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. हे विसरून चालणार नाही. हे यश कुठल्या अल्गोरिदमचं नव्हतं तर लोकमत संघटित केल्यामुळे मिळालं होतं.
हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यांत काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबुज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांच्या सत्तेचा डोलारा टिकला आहे.
सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त NEET नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेचा पाठीशी आहोत आणि कायम असू देखील.
पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील. पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसं झालं तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही. आत्ताच मला अनेकदा एक विचित्र तणावयुक्त शांतता जाणवत असते, आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोकं स्मशान शांततेकडे नेतील.
कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझ्या पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढे राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं.
राज ठाकरे ।
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
Can’t wait to sit down with this absolute icon. The one and only @FrankMillerInk is coming to LA for Frank Miller: Storyteller, presented by @howtoacademy.
I’ll be in conversation with him at the Wilshire Ebell Theater this Saturday, July 18th at 7pm. If you love bold storytelling, you won’t wanna miss it.
Tickets: https://t.co/jjufT3wl3F
See you there!
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
चूक झाली@Dev_Fadnavis माफ करा आम्हा महाराष्ट्राद्रोही लोकांना.हा महाराष्ट्राचा अपमान आहे.सोडू नका यांना. जिथे अजून रस्ते नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही तिथे कशाला रहायचं....आणि वरून प्रेग्नेंट होतायेत. हे काही बरोबर नाही
त्या व्हिडिओतील संपूर्ण लोकांना अटक करा त्या बाळा सकट.
महाराष्ट्राची बदनामी आम्ही नाही, तुमची धोरणं आणि लाचारी करतायत!
मा. मु म्हणतात, "महाराष्ट्राची बदनामी करू नका...
पण साहेब, आरसा दाखवला की त्याला बदनामी म्हणत नाहीत, त्याला 'जळजळीत वास्तव' म्हणतात! आज महाराष्ट्राची खरी परिस्थिती काय आहे, हे एसी गाड्यांमधून फिरणाऱ्यांना नाही, तर रोज मरणयातना भोगणाऱ्या जनतेला चांगलं ठाऊक आहे.
@PrakashGade13 हेच ते भाडे के टट्टे...... ज्याबद्दल एक गरोदर पुरुष खादाड % मुख्यमंत्री बोलत होते.......... परकास ....गांडीत दम असेल तर राम मंदिर चोर वर बोलून दाखव......
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितसाहेब ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
"नेरुळमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोन तरुणींना विजेचा धक्का लागला, एक गर्भवती महिलेचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि एक महिला व्हेंटिलेटरवर आहे अशा घटना घडल्यावर काय बोलावं हेच कळत नाही."
"राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा सुरू आहे. मुंबईत झाडं कोसळून लोक मरत आहेत. सरकार या सगळ्या गोष्टींबाबत गंभीर दिसत नाही. लोकांच्या मृत्यूवर हसणं यापेक्षा घाणेरडी गोष्ट असू शकत नाही. पुढची तीन वर्षे निवडणुका नाहीत म्हणून हा निर्लज्जपणा सुरू आहे."
"संजय दिना पाटील यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला, त्याबद्दल मला आनंद वाटला. हीच हिंमत महाराष्ट्रासाठीही दाखवा. अशा नीच लोकांच्या नादी लागू नका. त्यांचं कव्हरेज करणं बंद करा."
"मी जखमी मुलींच्या कुटुंबीयांना भेटलो असून त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. या प्रकरणातील जबाबदार डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही."
"चार दिवस उलटूनही स्थानिक खासदार किंवा आमदार पीडितांना भेटायला आले नाहीत. लोक मरत आहेत आणि तुम्ही 'ऑपरेशन टायगर'मध्ये आमदार-खासदार फोडत आहात."
"मुख्यमंत्री म्हणतात 'मिसिंग लिंक' हा ट्रायल आहे. पहिल्याच पावसात ट्रायल असतो का? उद्या एखादा पूल कोसळला तर तोही ट्रायल म्हणणार का?"
"राजसाहेबांना नाशिकमध्ये संधी मिळाली तेव्हा भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, रस्त्यांवर खड्डे नव्हते, शहर तुंबलं नाही आणि लोकांचे जीव गेले नाहीत."
"आपण जनतेच्या प्रश्नांवर बोलणार आहोत की फक्त 'ऑपरेशन टायगर' करत बसणार आहोत? राज्यात नीच प्रकारचं राजकारण सुरू आहे."
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
बोला @Dev_Fadnavis बोला ...... आणि चोरी बद्दल पण बोला... काहीही बोला पण त्या 4.3 ट्रिलियन इकॉनॉमी च्या छान छान गोष्टी काय सांगू नका !
@Dev_Fadnavis एक विनंती आहे तुमच्या बेगडी हिंदुत्ववादी चोर आणि आयात केलेले भाजप च्या आमदारांना,आमदार म्हणजे काय याचं प्रशिक्षण सुरू करा !!

अन्न सुरक्षेच्या दिशेने मोठी झेप!
अन्न नमुन्यांच्या तपासणीत तब्बल ४६२% वाढ ही केवळ आकडेवारी नाही, तर नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.
#FoodSafety#GoodGovernance#Leadership#TukaramMundhe