प्रति,
मा. प्रताप सरनाईक
माननीय मंत्री, परिवहन विभाग
महाराष्ट्र शासन, मुंबई
विषय : सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO–AMVI) पदाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात.
महोदय,
सदर विषयानुसार कळविण्याचे आहे की, राज्यातील परिवहन विभागामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या अत्यंत महत्त्वाच्या पदांच्या ४५० पेक्षा अधिक जागा सध्या रिक्त आहेत. या पदांवर दीर्घकाळ भरती न झाल्यामुळे वाहन तपासणी, परवाना प्रक्रिया, रस्ते सुरक्षा तसेच अपघात नियंत्रण यांसारख्या विभागाच्या मूलभूत जबाबदाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
अलीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर केलेल्या गट-क सेवांच्या जाहिरातीत देखील AMVI पदांचा समावेश न केल्याने हजारो पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक अभियंता पदवीधर गेल्या तीन वर्षांपासून या भरतीची वाट पाहत आहेत.
आपण परिवहन विभागाचे जबाबदार मंत्री म्हणून AMVI पदाच्या सर्व रिक्त जागा तातडीने MPSC मार्फत जाहिर कराव्यात, तसेच या भरतीची प्रक्रिया वेळेवर पूर्ण व्हावी यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, ��ी नम्र विनंती.
राज्यातील युवकांमध्ये रोजगाराविषयी निर्माण झालेला विश्वास आणि पारदर्शक भरती प्रक्रियेवरील श्रद्धा टिकवण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक आहे.
आपले या संदर्भात त्वरित सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@PratapSarnaik @INCHarshsapkal @mieknathshinde @VarshaEGaikwad @Mpsc_Andolan @degree_holders
@RojgarCongress
#RTOAMVI_PostsMustBeReleased
#RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC र���ज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही.
तसंच सारथी, बार्टीचे पेपर २९ व ३० तारखेला होत आहेत. याबाबतही योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
सरकारचा जाहीर निषेध@Dev_Fadnavis
लिपिकटंकलेखक2023 उमेदवार 3 वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत.
लिपिक टंकलेखक जाहिरात 2023 मध्ये आली त्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे september2025मध्ये आयोगाने अंतिमशिफा���स राज्यशासनानाला केली तरीसुद्धा राज्यशासनाने त्यांना नियुक्ती दिली नाही.
प्रति,
मा. रजनीश शेठ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर
नवी मुंबई.
विषय: महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 – निकालातील अस्वीकार्य विलंबाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत निषेध आणि तात्काळ अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी.
महोदय,
दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा आणि 17 डिसेंबर 2023 रोजी लिपिक-टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा पार पडली. परंतु, आज 06 जून 2025 पर्यंत, म्हणजे पूर्व परीक्षेनंतर 25 महिन्यांहून अधिक आणि मुख्य परीक्षेनंतर 18 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अंतिम निवड यादी जाहीर झालेली नाही. यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष, मानसिक ताण आणि निराशा निर्माण झाली आहे.
आज 6 जून 2025 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र क���वळ औपचारिक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यात ना ठोस तारीख आहे, ना जबाबदारी स्वीकारली आहे, ना पारदर्शकता दिसते. हे विद्यार्थ्यांच्या भावनांचा ��वमान करणारे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख व्यथा:
1प्रदीर्घ प्रतीक्षा: अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ अद्याप मिळालेले नाही.
2मानसिक अस्थिरता: निश्चित तारीख नसल्याने विद्यार्थी पुढील परीक्षांच्या तयारीत लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
3वयोमर्यादेचा अन्याय: विलंबामुळे काही विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका आहे.
4विश्वासघात: स��कार आणि आयोगाची ही ढिलाई विद्यार्थ्यांशी विश्वासघातासारखी आहे.
काँग्रेस पक्षाच्या ठाम मागण्या:
1लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल तात्काळ आणि निश्चित तारखेसह जाहीर करावा.
2या विलंबाची स्पष्ट आणि पारदर्शक कारणे जनतेसमोर मांडावीत.
3या विलंबास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
4विद्यार्थ्यांच्या मानसिक आधारासाठी समुपदेशन केंद्रे आणि सहाय्यता यंत्रणा त्वर��त सुरू करावीत.
जर 10 दिवसांत अंतिम निकाल जाहीर न झाल्यास, काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयास��ोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. विद्यार्थ्यांचा संयम आता संपुष्टात येत आहे. सरकारने त्यांच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळणे त्वरित थांबवावे.
“तरुणांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”
“निकाल तात्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे!”
आपला नम्र, धनंजय रामकृष्ण शिंदे
@mpsc_office @INCHarshsapkal
सन्माननीय आयोग,
लिपिकच्या ३९३ जागा Add करून एकूण 7006 जागांची Final List लवकर जाहीर करा🙏
Skill Test होऊन ९ महिने उलटून गेले... अजून अंतिम नि��ाल नाही..🙏
उमेदवारांचा होणारा मानसिक त्रास समजून घ्या साहेब🙏
@mpsc_office @Suvarnakharat4 🙏🏻
आदरणीय देवेंद्रजी,
PSI पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत.
2024 मध्ये यापूर्वी 441 ज���गांची भरती करण्यासाठी लोकसेवा आयोगाला पत्र दिले होते. SEBC आरक्षण दिल्यानंतर सुधारीत बिंदू नामावली काढल्यानंतर 216 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांची PSI जागा वाढवण्याची मागणी रास्त असून गृह विभागाने तातडीने जागा पाठवण्याची कार्यवाही करावी.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
एमपीएससी लिपिक टंकलेखक 2023 भरतीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. हजारो विद्यार्थ्यांनी घरदार सोडून, नोकऱ्यांचे पर्याय टाळून, फक्त या भरतीवर विश्वास ठेवून अभ्यास केला, पण आयोगाच्या संथ, बेफिकीर आणि बेशिस्त कारभारामुळे आज त्याच विद्यार्थ्यांची स्वप्नं चुरगाळली जात आहेत. फक्त उडवा-उडवीची उत्तरं देणं, वेळकाढूपणा करणं आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणं हाच आज आयोगाचा 'नवा कार्यधर्म' झालाय का?
दोन वर्षं होऊन गेली, पण अजूनही यादी नाही, स्पष्टता नाही, जबाबदारी नाही... हे बघून संताप अनावर होतोय! आ��्ही सरकारलाही थेट सांगतो ही फक्त भरती नाही, हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं युद्ध आहे! तात्काळ ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि त्या आंदोलनातून होणाऱ्या पूर्ण परिणामाची जबाबदारी आयोग आणि शासनाची असेल!
@Dev_Fadnavis
@Drsuvarnas
@Mpsc_Andolan
@mpsc_office@Suvarnakharat4
मा.आयोग विनंती गट क क्लर्क 2023 निकाल लावावा. आमच्या 15k मुलांसोबत 15k कुटुंबाचा विचार करावा. आम्ही पास की नापास हे सुद्धा माहीत नाही. रोज घरी समाजात उडवा उडविचे उत्तरे द्यावी लागतात निकाल 8-10 दिवसात लागेल पुढच्या महिन्यात लागेल अस. 🙏 निकाल लावावा
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य @mpsc_office तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉 तसेच तेवढं या आठवड्यात लिपिक टंकलेखक 2023 ची तात्पुरती निवड यादी प्रदर्शित केली तर बर होईल
To,
Suvarna Kharat
Secretary, Maharashtra Public Service Commission
Belapur CBD, Navi Mumbai
Subject: Urgent Request to Release the Provisional Selection List (PSL) for Clerk-Typist 2023 Recruitment
Reference: Advertisement No. 111/2023
Respected Sir/Madam,
It has been 26 months since the advertisement for the Clerk-Typist recruitment was published, 14 months since the main examination was conducted, 7 months were taken up by court proceedings, 40 days have passed since the GML process, and 18 days have elapsed since candidates submitted their preferences. Despite this prolonged duration, the Maharashtra Public Service Commission has yet to publish the Provisional Selection List (PSL) and the Final Selection List.
The delay in completing the recruitment process has caused social, economic, and mental distress to the candidates. The uncertainty regarding the timeline for the selection process and appointment has left all candidates deeply disappointed and anxious.
Therefore, we earnestly request the Commission to expedite the process by immediately publishing the Provisional Selection List, Opting Out List, and Final Recommendation List so that the recruitment process can be completed at the earliest.
Sincerely,
Zeenat Shabrin
Vice President, Mumbai Youth Congress
@Mpsc_Andolan@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks