खंडेराव.. या देशाला फक्त तलवार आणि गोळीचा इतिहास नाही.. इथं लेखणीचा इतिहास आहे.. बोरूचा इतिहास आहे.. चरख्याचा इतिहास आहे.. चरख्याच्या धाग्यांनी गुंफलेले विचार काळाला बांधून ठेवतील.. देशावर जेंव्हा जेंव्हा काळ चालून येईल.. तेंव्हा तेंव्हा ते विचार अधोरेखित होतील..❤️
#नेमाडपंथी
@NMMConline आता नवी मुंबई महानगरपालिका ने कंत्राटी कामगारांच्या विरुद्ध पिटीशन दाखल केली.
विद्यार्थ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे ही,
पण यामुळे परत आणखी १ वर्ष निकाल टांगणीला नाही गेला पाहिजे म्हणजे झालं.
आयुक्त साहेबांचे धन्यवाद विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी.❤️👏
सबंध कृषकांच्या संगतीने राबणारा राहणारा आणि जगणारा देव.. दमलेल्या लेकरांना वाळवंटातही सुखाची सावली देणारा देव म्हणजे विठू माऊली आणि त्या देवाला सावलीसारखी साथ देणारी आमची आई म्हणजे रुक्मिणी माऊली.
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां.. हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं..❤️
#देवशयनी
@mnsadhikrut साहेब नवी मुंबई महानगरपालिका पण हेच करत आहे 1 वर्ष झाले, 84,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, 68,000 विद्यार्थी पेपर ला आले
तरी पण आमचा निकाल टांगणीला लावून दिला. प्रकरण कोर्टात टाकून 21 तारखा झाल्या तरी पण निकाल काही लावत नाही.
मदत करा साहेब👏🚩
सांजवेळच्या आठवणी चहात बुडवलेल्या खारीसारख्या असतात.. काही उथळ तरंगणाऱ्या..तर काही जास्तवेळ भिजून तळ गाठणाऱ्या.. पण सगळ्या हव्याहव्याशा..❤️
#जगण्याची_रीत
ज्यांना विचार करणारी पिढी नको असते तेच शिक्षणाला दुय्यम ठरवतात.कारण पुस्तकं प्रश्न विचारायला शिकवतात आणि आंधळी भक्ती प्रश्न दाबायला शिकवते..समाज घोषणांनी नाही, तर शिक्षणाने उभा राहतो.हे विसरलं की उरतात फक्त जयघोष आणि अंधानुकरण!❤️