मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam#PMC#StudentJustice#TCSionOnly
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय!
राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा
ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.
भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.
काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी.
#TCSion
@PMCPune@navalMH
जाहीर पाठिंबा ✊📘
पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन हे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या हक्कांसाठी शांत, शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने लढा देणे हीच खरी लोकशाही आहे.
PMC तसेच MJP व MAHATRANSCO संदर्भातील अन्यायकारक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल संविधान, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही कुठल्याही सरकारसाठी गंभीर इशारा असते.
काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, त्यांच्या भविष्याशी खेळ केला जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे.
@INCMaharashtra@INCIndia@PMCPune
#पुस्तकवाचनआंदोलन #विद्यार्थीहक्क #संविधान #लोकशाही #पुणे #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६.
प्रति,
मा. आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
पुणे.
विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत.
महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृत आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक्षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे.
१) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन :
सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वाटप करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे.
२) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास :
अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे की, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल.
आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८)
प्रत,
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@PMCPune@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune@Dev_Fadnavis
PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी.
Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत.
काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे.
आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी.
#PMC#JEExam#TCSiON#StudentIssues
मागच्या वेळी PMC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांना यावेळी देखील परत खूप दूरची आणि Private केंद्रे दिली. हा अन्याय किती वेळा सहन करायचा? लवकरात लवकर अधिकृत व जवळची केंद्रे द्यावीत.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC परीक्षा एकदा पुढे घेऊन पण परीक्षा सेन्टर इतके दूर दिलेत विद्यार्थ्यांनी किती अन्याय सहन करावा, अजून किती परीक्षा व किती अन्याय करणार ?
लवकरात लवकर अधिकृत सेन्टर देऊन न्याय द्यावा.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राज्य सरकारने वारंवार घोषणा करून बेरोजगारांची दिशाभूल केली असून प्रत्यक्षात जलसंधारण विभागातील एकही जाहिरात, आकृतीबंधाचा निर्णय किंवा भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे वाल्मी, छत्रपती संभाजीनगर येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे भव्य ‘रोजगार सत्याग्रह’ आंदोलन प्रदेश सरचिटणीस व रोजगार विभागाचे संयोजक धनंजय शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष युसूफ शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राज्यातील लाखो बेरोजगार अभियंते आणि युवकांची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारला ठोस इशारा देत काँग्रेस पक्षाने आज स्पष्ट केले की, जोपर्यंत जलसंधारण विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही, तोपर्यंत जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही!
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाल्मीच्या आयुक्त डॉ. अंजली रमेश यांना निवेदन सादर केले. आकृतीबंध तातडीने मंजूर करणे आणि सर्व रिक्त पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली. आयुक्त डॉ. रमेश यांनी, “सदर मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून राज्य सरकारशी तातडीने चर्चा करू; निर्णयाबाबत बेरोजगारांना माहिती देण्यात येईल,” असे आश्वासन दिले. युवकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांना आता जिल्ह्यात स्थान राहणार नाही.
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा दीपालीताई मिसाळ, प्रदेश सचिव प्रकाश भगनुरे पाटील, प्रदेश सचिव प्रवीण केदार, प्रमोद सोनवणे तसेच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dhananjay4INC
#rojgar #chatrapatisambhajinagar
@degree_holders@CMOMaharashtra@mieknathshinde नाशिक महानगरपालिकेने तात्काळ अनुभवाची असलेली अट रद्द करून... सर्व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. हि नम्र विनंती.
नाशिक महानगरपालिकेच्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा.
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra@Dev_Fadnavis (1/2)
@mhadaofficial महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बाह्य यंत्रणेद्वारे भरती करून प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे? तात्काळ कंत्राटी भरती रद्द करून सर्व पदांसाठी कायम स्वरुपी भरती म्हाडा ने राबवावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde