मी तक्रार केल्यानंतर मेट्रो प्रशासनाने @MumbaiMetro01 सर्व १२ मेट्रो स्थानक वर "प्लेटफॉर्म" ऐवजी "फलाट" हा मराठी शब्द लिहून बदल केला आहे. त्या बद्दल आभार. पण महाराष्ट्रात मराठीसाठी विनंती व तक्रारी कराव्या लागतात हेच आमच मोठ दुर्दैव आहे. @ekikaranmarathi
🚨 महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध, निकृष्ट अन्नपदार्थ आणि अस्वच्छ हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू असतानाच आता AI-आधारित तक्रार नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
दूध भेसळ प्रकरणे उघडकीस येत आहेत. अनेक हॉटेलांचे परवाने स्वच्छतेअभावी आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे रद्द करण्यात आले. अशा वेळी नागरिकांना सहज तक्रार करता यावी, हा निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे.
मात्र एक प्रश्न आहे...
महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. आंतरराष्ट्रीय वापर लक्षात घेता इंग्रजी समाविष्ट असणे समजू शकते. पण महाराष्ट्र सरकारच्या या व्यासपीठावर हिंदीला मराठीइतकेच प्राधान्य का? राज्यातील नागरिकांसाठी मराठीला प्रथम आणि प्रमुख स्थान असणे अपेक्षित नाही का?
#Maharashtra #FDA #FoodSafety #TukaramMundhe #मराठी
📸 अन्न व औषध प्रशासन
"खरं तर 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला मी सोडणार नाही/बघून घेईन' या वाक्याऐवजी, 'महाराष्ट्र ज्यांच्यामुळे बदनाम होत आहे, त्यांना मी सोडणार नाही/बघून घेईन' असं वाक्य हवं की नको, सर?" असा सवाल अभिनेते विद्याधर जोशी यांनी उपस्थित केला.
#VidyadharJoshi#Actor#MarathiNews#news
@drmbct@WesternRly रेल्वे प्रवाशांशी हुज्जत घालून मराठीची मागणी केल्याबद्दल त्यांना डांबून ठेवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात काय कारवाई करण्यात आली?
एकतर कर्मचारी नेमताना तो मराठीच असेल आणि मराठी भाषेचा आदर करणारा असेल, तरच त्याची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा मराठी माणूस हे सर्व खाली मान घालून सहन करत राहील असा गैरसमज बाळगू नये.
गोव्याच्या विमानतळाला स्व.मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जाऊ शकते तर लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायला अडचण काय ? लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नक्की कुणाला नको आहे हा प्रश्न प्रशासनाला आहे ?
#लोकनेतेदिबापाटीलविमानतळ#पनवेल#नवीमुंबई#मराठीएकीकरणसमिती
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशाविरोधात 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी ४ वाजता अंधेरी पूर्व येथील RPF कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीने दिली आहे.
#Andheri #MumbaiNews #Marathi #MarathiLanguage #Zee24Taas
महाराष्ट्राच्या राजधानीत राजभाषा मराठीत सेवा देऊ शकत नाहीत. सरकारी यंत्रणांना स्वतःची लाज वाटायला पाहिजे. निर्लज्ज प्रशासन! नागरिकांना नागरिकांच्या भाषेत सेवा द्या, हुज्जत कसली घालता? यासाठीच महाराष्ट्राला स्वायत्तता मिळायला हवी आणि भविष्यात ती मिळणार आहेच.
The concern raised by the Maharashtra FDA isn't that both medicines have different active ingredients—that is acknowledged. The issue is whether using an almost identical brand identity (with only a "Plus" suffix) for a different active ingredient could lead to prescribing or dispensing errors. The legal aspects will ultimately be decided through the regulatory process, but the FDA's action is based on patient safety concerns.
🚨 एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर गुजरातकडे! कारवायांचा उलगडा गुजरातकडे का सरकला?
🔹 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील औषध सुरक्षेबाबत आणखी एक मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एफडीएने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ या औषधांच्या सुमारे ₹२.४५ कोटी किमतीच्या साठ्याच्या विक्री-वितरणावर प्रतिबंध घालण्यात आला असून, कंपनीला ही औषधे बाजारातून तत्काळ Recall (परत मागविण्याचे) निर्देश देण्यात आले आहेत.
📍 कारवाई कुठे झाली?
💊 पुणे – ₹८९.४५ लाखांचा साठा प्रतिबंधित 💊 नागपूर – ₹९८.७१ लाखांचा साठा प्रतिबंधित 💊 भिवंडी (ठाणे) – ₹५७.२० लाखांचा साठा प्रतिबंधित
➡️ ही कारवाई ९ व १० जुलै २०२६ रोजी कंपनीच्या राज्यातील मुख्य पुरवठा गोदामांवर करण्यात आली.
⚠️ नेमकं प्रकरण काय आहे?
🔸 एफडीएच्या तपासात असे आढळले की, पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या Aciloc 150 आणि Aciloc 300 या औषधांमध्ये Ranitidine हा सक्रिय औषधी घटक आहे. मात्र, नव्याने बाजारात आणलेल्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ मध्ये Famotidine हा पूर्णपणे वेगळा सक्रिय औषधी घटक वापरण्यात आला आहे.
🔸 तरीही औषधाच्या नावात केवळ "+" (Plus) हे चिन्ह जोडून लेबलचे स्वरूप जवळपास पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्याने डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्ण यांच्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता एफडीएने व्यक्त केली आहे.
🚨 विशेष म्हणजे, Ranitidine असलेली जुनी औषधे आणि Famotidine असलेली नवीन Plus औषधे बाजारात एकाच वेळी उपलब्ध असल्याचे तपासात समोर आले आहे.
📢 एफडीएने स्पष्ट केले आहे की, एखाद्या ब्रँड नावाखाली विकल्या जाणाऱ्या औषधातील सक्रिय औषधी घटक (Active Ingredient) बदलल्यास त्याच ब्रँड नावाशी साधर्म्य असलेले नवीन औषध बाजारात आणणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकते.
🗣️ एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले :
"औषधाच्या नावामुळे रुग्ण, डॉक्टर किंवा औषध विक्रेता यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो अबाधित ठेवणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे."
📌 कंपनीला Aciloc 150, Aciloc 150 Plus, Aciloc 300 आणि Aciloc 300 Plus या औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तात्काळ परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
💬 तुमच्या मते औषधांच्या नावातील अशा साधर्म्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
#FDA #Maharashtra #TukaramMundhe #Gujarat #Ahmedabad #DrugSafety #PublicHealth
📷 अन्न व औषध प्रशासन
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@Narhari_Zirwal@Tukaram_IndIAS@Cadila_Pharma
मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले..
मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा.
राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे..
बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन.
आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात.
हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही.
आपलीच मोरी आणि मुतायची चोरी?
आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?
#मराठी
#मराठीअस्मिता
#मराठीएकीकरणसमिती
#गोवर्धनदेशमुख
#मराठीमाणूस
जयमहाराष्ट्र
मराठीभाषा
मराठीहक्क
मराठीएकजूट
महाराष्ट्र
भाषिकअधिकार
JusticeForMarathi
StandWithMarathi
MarathiPride
मराठीसाठीलढा
रेल्वेचे मराठी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही.
मुजोर कर्मचाऱ्यानवर कारवाई झालीच पाहिजे.
प्रवासी विरुद्ध टीसी: मराठी भाषेवरून वाद!
मराठीची मागणी केली म्हणून बेकायदेशीर डांबून ठेवले
मराठी एकीकरण समिती मराठी माणसासाठी तत्पर, प्रवाशाची केली सुटका, कारवाईची मागणी.
@CMOMaharashtra@drmbct@AshwiniVaishnaw@WesternRly@Dev_Fadnavis@abpmajhatv@mieknathshinde
रेल्वे प्रशासन नेहमीच मराठीची गळचेपी करत आले आहे, त्यातच कालचे प्रकरण म्हणजे एक मराठी भैय्या (मराठी भाषिक तिकीट तपासणीस) हिंदी भाषिक टीसी सहकाऱ्यांची बाजू घेऊन भलतीच मागणी करून कायद्याची भीती घालून गैरप्रकार केला होता.
#Mumbailocal#मराठीएकीकरणसमिती@ekikaranmarathi
खेडकडे (रत्नागिरी) जाणाऱ्या रेल्वेत काही #परप्रांतीय व्यक्तींनी मराठी मुलींचा व्हिडिओ काढून अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळताच, मराठी एकीकरण समितीने तातडीने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित कारवाई व सहकार्याची मागणी केली.
महिलांच्या सन्मानाशी तडजोड सहन केली जाणार नाही. कोणत्याही महिला किंवा नागरिकावर अन्याय होत असल्यास, मराठी एकीकरण समिती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.
हीच संघटनेची ताकद... अन्यायाविरुद्ध त्वरित प्रतिसाद आणि न्यायासाठी कायम संघर्ष.
याला मुठभर राजकारणी जबाबदार आहेत,
लायसेन्स बुलढाण्याचा दुकान चालवणारा एमपी चा आणि दुकान बदलापूरमधे, ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्ये
फडवणीस साहेबाचा अपमान झाला की मराठी महाराष्ट्राचा?.🤦
#परप्रांतीय_हाकला
राज्यात औषधांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या ‘अॅसिलॉक 150+’ आणि ‘अॅसिलॉक 300+’ या औषधांच्या सुमारे २ कोटी ४५ लाख ३७ हजार ४९० किमतीच्या साठ्यावर मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. औषधाच्या नावात केवळ 'प्लस' चिन्हाची भर घालून मूळ औषधातील सक्रिय घटक पूर्णपणे बदलण्यात आल्याने डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर बातमी https://t.co/Xh9gPEGUFB
#LokmatNews #MarathiNews #FDA #TukaramMundhe #Nagpur