पुण्यात श्री. विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.
विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. कुणाचं मत पटत नसेल तर त्याला उत्तर मताने द्यावं हात उचलून नव्हे. हिंसा हा कोणत्याही मतभेदाचा मार्ग असू शकत नाही.
पुण्यासारख्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या शहरात असं घडणं हेच सर्वांत दुर्दैवी आहे.
पवई, मुंबई येथील आयआयटी पवईमध्ये आज ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातील युवा, विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधला.
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशातील युवा शक्तीला प्रोत्साहन, क्रीडा संस्कृतीला बळकटी आणि भारताला क्रीडा क्षेत्रात सक्षम बनविण्याचे कार्य सुरू आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि ऊर्जा निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी आयआयटी पवईचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण ‘विकसित भारत’ आणि ‘खेळातही अव्वल भारत’ घडवूया!
MPSC Paper Leakचा पर्दाफाश करणारा तरुण! 10 लाखाची offer! प्रचंड मानसिक त्रास! पोलिसा कडून कुटुंबाची चौकशी! पत्नी भयभीत, मुलं आजारी! Love angle! Team MPSC Resign करा! संपुर्ण भयंकर Inside story! एक नव्हे शेकडो जणांनी पेपर फोडल्याची शक्यता!
https://t.co/7xWRHvIXrq
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना आज शिर्डी ते मुंबई प्रवासादरम्यान निदर्शनास आली. लॉरीने टेम्पोला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.
घटना पाहताच मी तात्काळ माझा ताफा थांबवून घटनास्थळी पोहोचलो. जखमींची विचारपूस करून पोलिस व रुग्णवाहिकेला तातडीने माहिती देण्याच्या सूचना दिल्या. माझ्या ताफ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना मदतीसाठी घटनास्थळी थांबवून जखमींना आवश्यक मदत मिळवून दिली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा!
यावेळी काकासाहेब खंबाळकर, सिद्धार्थ कासारे आणि श्रीकांत भालेराव उपस्थित होते.
@PratapSarnaik
प्रताप सरनाईक,
RC बुक पत्ता बदल, हरवलेले RC बुक डुप्लिकेट ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन उपलब्ध आहे आणि त्यासाठी RTO मध्ये एकदाही जाण्याची गरज नाही असे RTO वेबसाईट वरच लिहिलेले आहे
प्रत्यक्षात पूर्ण पैसे भरूनही आणि सगळी कागदपत्रे अपलोड करूनही ते पेंडिंग राहते कारण कुठेतरी कुणीतरी मुद्दाम approve बटण दाबत नाही.
का? तर लोकांनी स्वतः येऊन यांचे खिसे गरम करावेत.
काय फालतूपणा आहे हा?
@Dev_Fadnavis@mieknathshinde प्लीज लक्ष घाला यात. लोकांचा प्रचंड रोष आहे या खात्यावर.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालतात, पण जेव्हा तोल सुटतो आणि एका महिलेचा अपमान केला जातो, तेव्हा तो केवळ त्या व्यक्तीचा नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान असतो.
अजितदादांनंतर माझ्या भगिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला 'पहिली महिला उपमुख्यमंत्री' मिळाली.
पण काँग्रेसने त्यांच्याबद्दल जी अपमानास्पद भाषा वापरली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेसने तात्काळ माफी मागावी. महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत!
आरक्षण पर कुछ लोग सोची-समझी साजिश के तहत झूठ फैला रहे हैं। आरक्षण कोई खैरात नहीं, सदियों से शोषित वर्गों के 'प्रतिनिधित्व' का संवैधानिक अधिकार है। 'सुधार' के नाम पर जो नफरत फैलाई जा रही है, वह देश के सामाजिक सौहार्द पर सीधा हमला है। सभी को यह वीडियो जरूर देखना चाहिए।
https://t.co/RQX3zdVrN0
पुणे हे 'विद्येचे माहेरघर', पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) बोगस पदव्यांचे रॅकेट चालणे अत्यंत वेदनादायी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात 'पदवी' बाजारात विकत मिळणे, हे व्यवस्थेचे मोठे दुर्दैव!
आमचे रिपाइंचे पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड यांनी मार्चपासून भक्कम पुरावे गोळा करत प्रशासनाला याप्रकरणी FIR दाखल करण्यास भाग पाडले. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! रिपब्लिकन पक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी खंबीरपणे उभा आहे.
Badlapur - A video showing a rat roaming inside a tray of khari at a reputed bakery in Badlapur has gone massively viral on social media. The footage, recorded by a young woman on her mobile phone, clearly shows the rodent moving around in the tray of freshly prepared khari right in front of customers.
वारीच्या सेवेत दिवस-रात्र झटणाऱ्या एसटीच्या सहकाऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त भोजन आणि चहा-नाश्त्याची मोफत सोय करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची दखल घेत माननीय परिवहन मंत्री @pratap_sarnaik यांनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
#MSRTC#PratapSarnaik#Wari2026
विषय कुठलाही असो त्यात आरक्षण विषय घुसडून आरक्षण व्यवस्थेवर टिका करणाऱ्या लोकांच्या भावनांचा तरी सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेताना विचार करायला हवा होता.
जाऊ द्या... इथेनॉल विरोधी आंदोलनात सरकारने आरक्षण विषयाचा सोक्षमोक्ष लावावा.
❤️✌️
नंदुरबारच्या शहादा येथील शासकीय समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना झालेली अन्नातून विषबाधेची घटना अत्यंत संतापजनक आहे. हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील अत्यंत गंभीर हलगर्जीपणा असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे! अधिकारी असो, ठेकेदार असो किंवा आणखी कोणीही; तळागाळातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या एकाही व्यक्तीला खपवून घेतले जाणार नाही. राज्य शासनाने तातडीने पावले उचलून प्रत्येक दोषीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना गजाआड केलेच पाहिजे.