दुर्गाडी किल्ला #हिंदूंचाच!
गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी जागृत ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळाले. कल्याण येथील कोर्टाने #दुर्गाडीकिल्ला हिंदूंचीच वहिवाट असल्याचा निर्णय दिला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना #मलंगडाचाही निकाल लवकर लागावा हीच आई जगदंबेकडे प्रार्थना
@TMCaTweetAway भिवंडी काल्हेर कशेळी या मार्गे ठाण्याच्या हद्दीत प्रवेशद्वारावर येताच सर्वात जास्त प्रमाणात कचरा पडला आहे व हा कचरा पावसामध्ये मुख्य रस्त्यावर येऊन जाणाऱ्या येणाऱ्या टू व्हीलर चालवणाऱ्यांना तसेच दुर्घटनाग्रस्त झाल्यावर जबाबदार कोण कृपया ठाणे महानगरपालिका ठाणे यांनी सखोल चौकशी करा
R.T.E अंतर्गत येणाऱ्या सर्व इंग्रजी शाळांची यादी गायब आहे.
गरीब वंचित घटकांवर डायरेक्ट अन्याय करतंय राज्य सरकार आहे.
मी ह्या विरोधात आवाज उठवला आहे तुम्ही सर्वांनी आता साथ द्या
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांनी पक्षातील सहकाऱ्यांसह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार सन्मा. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 💐
याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, श्री.अविनाश अभ्यंकर, आमदार श्री. राजू पाटील, श्री. संदीप देशपांडे, श्री. अभिजित पानसे, श्री. अविनाश जाधव व श्री. सरचिटणीस श्री. योगेश परुळेकर, उपाध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील उपस्थित होते.
@Info_Thane1 ही कार्यवाही तात्पुरती च होते नंतर या वर सरकारी कर्मचारी चिरीमिरी घेऊन परत चालू करतात.आज कार्यवाही केली की परत १० दिवसा नंतर हे कार्य पुन्हा नव्याने चालु होते कार्यवाही करणार तर कायम स्वरूपी करा दाखवण्यात पुरती नको
मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक काल 'रातोरात' स्थगित करण्यात आली. त्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. रमेश बैस यांना अमितजी ठाकरे यांचे पत्रातून सवाल ….
मुंबई विद्यापीठ प्रशासन नेमके कोणाला घाबरत आहे ?
#मुंबई_विद्यापीठ#सिनेट_निवडणूक
#MumbaiUniversity #SenateElection
#अलर्ट
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या #तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील #ठाणे व #पालघर जिल्ह्यातील गावांना ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
@ShriShinde009@rajupatilmanase आई एकवीरा आमच्या आगरी कोळी समाजाची अस्मिता च नाही तर आमची कुलदैवता आहे आणि आईच्या मंदिरा वरून जे तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात अत्यंत निदनिय आहे तुम्ही इतिहास पाहून हे वक्तव्य करावं अन्यथा आमचे आगरी कोळी तुम्हाला हिसका दाखवल्या शिवाय राहणार नाही याची जाणीव ठेवून वक्तव्य करा
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. प.पू. नानास्वारींचा वारसा अप्पासाहेब समर्थपणे पुढे चालवत आहेत. निसर्गसंवर्धन, मानवसेवा व अध्यात्म यामध्ये त्यांचे कार्य उत्तुंग आहे. आज 'श्री बैठक' जगभरातील अनेक देशांमध्ये रुजली आहे. अभिनंदनपर नमन.🙏🏻💐
ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर झाला. महाराष्ट्रात आध्यात्मिक परंपरेत प्रबोधन आणि समाजसेवेची मोठी परंपरा आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांचं ह्या परंपरेतील योगदान विशेष आहे. (१/२)
अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात जि. प. सिईओ सोबत चर्चा केली
ठाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या ३८ अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात जिल्हा परिषद ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल @manujjindalIAS ह्यांच्या सोबत भेट घेत निवेदन दिले.@ceozpthane
@rajupatilmanase@mieknathshinde आम्ही जे भिवंडी मध्ये भोगतोय ते अन्य कोणाच्या माथी कशाला गुजरात ची कंपनी चांगली मग आपल्या महावितरण ला दुजाभाव का द्याचा त्या पेक्षा आपल्या महाराष्ट्र च्या महावितरण ला मोठे करा ना
सध्याचे राजकारण पाहून जनता #NOTA वापरायच्या मुड मध्ये आहे.त्यामुळे महागाई कमी करा,शेतकरी बांधवांना दिलासा द्या,रस्ते चांगले करा,चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा,रूपया मजबूत करा.उगीचच कशाला त्या नोटा व फोटोंच्या मागे लागलाय ? सामान्यांना याचा काय फायदा ? #फालतू_राजकारण