कमवायचं आपण.
कमाईवर Income Tax भरायचा आपण.
त्या उरलेल्या पैशातून गाडी घेतली.... कर.
पेट्रोल-डिझेल भरलं... कर.
मोबाईल घेतला... GST.
हॉटेलमध्ये जेवलो... GST.
कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, विमा, प्रवास, सेवा... बहुतांश ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांचा वाटा.
म्हणजे पैसा कमवतानाही सरकारचा हिस्सा,
आणि तोच पैसा खर्च करतानाही सरकारचा हिस्सा.
आणि मग आपल्या करातून जमा झालेल्या सार्वजनिक पैशाचा वापर जर निवडणुकीच्या तोंडावर freebies, लोकप्रिय घोषणा, जाहिराती आणि राजकीय सोहळ्यांसाठी होत असेल, तर करदात्याने प्रश्न विचारायचा नाही का?
गरजूंसाठी कल्याणकारी योजना असायलाच हव्यात.
पण कल्याण आणि मतांसाठीची खैरात यात फरक असायलाच हवा.
आता ₹2,000 पेक्षा जास्त पात्र UPI merchant व्यवहारांवर 0.4% MDRची नवी व्यवस्था... ग्राहकाकडून थेट शुल्क नसल्याचं सरकार सांगतं; तरी डिजिटल व्यवहारांच्या अर्थकारणात आणखी एक शुल्काची पायरी.
शेवटी मध्यमवर्गीय करदात्याची गोष्ट साधी आहे:
कमवा: Tax द्या.
उरलेलं खर्च करा: पुन्हा Tax द्या.
आणि तुमच्याच पैशातून राजकीय “मोफत” वाटप झालं की त्याला Freebie म्हणा!
पण एक गोष्ट लक्षात ठेवा:
सरकारकडे स्वतःचा पैसा नसतो;
तो जनतेच्या कष्टातून जमा झालेला सार्वजनिक पैसा असतो.
म्हणून प्रश्न freebies चा नाही,
प्रश्न हिशेबाचा, प्राधान्यक्रमांचा आणि उत्तरदायित्वाचा आहे.
कर आमचा. पैसा सार्वजनिक.
मग प्रत्येक रुपयाचा हिशेब विचारण्याचा अधिकारही आमचाच.
#TaxTerrorism
Residents and IT professionals gathered at Hinjewadi IT Park for a protest march on Sunday, raising concerns over poor infrastructure and civic issues in the area. Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray is also set to join the protest.
#PunekarNews#pune#news#Hinjewadi #HinjewadiITPark #AadityaThackeray
VIDEO | Pune: IT employees and residents hold protest over infrastructure issues in Hinjewadi.
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p)
आयुष्याच्या शाळेत प्रत्येक धडा पुस्तकात नसतो,
आणि प्रत्येक शिक्षक वर्गातच भेटतो असंही नाही…
कुणी अक्षरांची ओळख करून देतं,
कुणी विचारांची;
कुणी गणित शिकवतं,
तर कुणी आयुष्याची गणितं सोडवायला शिकवतं.
कुणी हात धरून पहिलं अक्षर गिरवायला शिकवतं,
तर कुणी हात सोडून
स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं.
आई-वडील, शाळेतील गुरुजन, प्राध्यापक, मार्गदर्शक, मित्र, सहकारी…
अगदी आयुष्यात आलेली काही माणसं, अनुभव, चुका आणि अपयशसुद्धा
नकळत आपले शिक्षक होत जातात.
कारण शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणं नाही;
माणूस म्हणून कालच्यापेक्षा आज थोडं अधिक समृद्ध होणं आहे.
ज्यांनी ज्ञान दिलं त्यांचे ऋण आहेच,
पण ज्यांनी प्रश्न विचारायला, पडल्यावर उठायला,
आणि स्वतःची वाट स्वतः शोधायला शिकवलं—
त्या प्रत्येक गुरूला आज मनापासून नमन! 🙏
आपल्या आयुष्याच्या कोऱ्या पानांना
अर्थ देणाऱ्या प्रत्येक ‘शिक्षका’ला
शिक्षकदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐📚
रोहिणी राऊत! नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगावच्या ग्रामसभेत रस्ते, शौचालय, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, cctv इत्यादी मुद्द्यांवरून गावपुढारी व प्रशासनाला जाब विचारणारी धाडसी पोरगी. कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार? पुणे असो की दिंडोरीचा आदिवासी पाडा. लोक बोलू लागलेत.
बापाच्या वाटणाऱ्या काळजीला शब्दात व्यक्त करता येत नसते...
फक्त...आपला बाप आपल्या आधी हे जग सोडून जाणार आहे आणि मग संकटे आल्यावर मदतीला कुणीही येणार नाही ही गोष्ट देवाने खूप वाईट बनवली आहे.
विदयानंद बापटांचे सगळे व्हिडीओ पहा...गडी सगळ्यांना पुरून उरलाय . विचारांचा युक्तिवाद विचारांनी करता येणार नाही त्यामुळे लाऊडस्पीकरवाले आता हाणामारीवर उतरतील. पण बापटांच्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता आहे की पुण्यातील जनता पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. #पुणे
मराठी भाषेचा शब्दसंचय आटला नसून, आपली शब्दग्रहणक्षमता संकुचित झाली आहे, एवढाच काय तो दुर्दैवी विरोधाभास!
दैनंदिन संभाषणाच्या नावाखाली आपण भाषेचे जे सरलीकरण केले, त्याचे पर्यवसान शब्ददारिद्र्यात झाले आणि आता एखाद्याने अस्खलित, व्याकरणशुद्ध, संस्कृतप्रचुर मराठीचा प्रयोग केला की आपण त्यास भाषाप्रभुत्व समजून विस्मयचकित होतो!
वस्तुतः हे असामान्य नसून, विस्मरणात गेलेल्या आपल्या भाषिक वैभवाचे पुनःस्मरण आहे.
मराठी कठीण नाही महोदय…
आपला मराठीशी असलेला संवादच दुर्दैवाने क्षीण झाला आहे!
शिक्षण असो वा नसो,
फारसा फरक पडत नाही.
अंगात गुर्मी, रग, टगेगिरी,
पैशांची ताकद, पिढीजात मस्ती,
अन पराकोटीचा बेशरमपणा हवा.
लोकं मग सगळं सहन करतात,
अगदी गुलामासारखी वागतात!
सध्याच्या काळात परीक्षा आणि पेपरमधील गैरप्रकार करणारी यंत्रणा दिवसेंदिवस अधिक सक्षम होताना दिसत आहे; मात्र हे गैरप्रकार शोधून काढणारी आणि त्यावर तातडीने कारवाई करणारी यंत्रणा तुलनेने अत्यंत अपुरी आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थी जेव्हा परीक्षा केंद्र, संशयास्पद उमेदवार किंवा परीक्षेतील अनियमिततेबाबत ठोस मुद्दे आणि तथ्ये मांडतात, तेव्हा त्यावर स्वतंत्रपणे निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी अनेकदा चौकशी समिती स्थापन करण्याची औपचारिकता केली जाते.
मात्र खरा प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आरोपांची, परीक्षा केंद्रांची आणि संशयित उमेदवारांची प्रत्यक्ष चौकशी का केली जात नाही?
चौकशी समिती केवळ कागदावर न राहता तिच्याकडे विद्यार्थ्यांनी दिलेले पुरावे, CCTV फुटेज, परीक्षा केंद्रातील नोंदी, उमेदवारांचे परीक्षा-पॅटर्न आणि इतर संबंधित तथ्य तपासण्याचे स्पष्ट अधिकार असणे गरजेचे आहे.
चौकशी समिती म्हणजे आरोप झाकण्यासाठी नव्हे, तर सत्य समोर आणण्यासाठी असली पाहिजे.
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही; उलट परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक गंभीर आरोपाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.
@MMRDAOfficial@PMCPune@DrSanMukherjee
#MMRDA_SCAM #PMC #Paper_leak