मुलुंड पश्चिमेकडील मलबार हिल रोड येथे अतिवृष्टीमुळे झाड कोसळून उभ्या असलेल्या एका रिक्षाचे नुकसान झाले. तसेच एम.एस.ईशान्य.बी. ट्रान्सफॉर्मर असलेल्या वास्तुची भिंत कोसळल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच महानगरपालिका आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नुकसानग्रस्त ठिकाणाची दुरुस्ती, परिसर सुरक्षित करणे आणि आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
@Dev_Fadnavis@MorvekarHetal@mybmc@mybmcWardT
#MumbaiRains #CitizenSafety #Mulund #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
मुसळधार वादळी पावसामुळे मुलुंड पश्चिम येथील गोवर्धन नगर परिसरात झाडाची फांदी मोडून धोकादायक स्थितीत अडकली होती. याची माहिती स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर यांच्याकडून मिळताच घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून संबंधित महापालिका अधिकारी व अग्निशमन दलाच्या मदतीने ती फांदी तात्काळ हटवून घेतली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
_________________
Due to the heavy rain and strong winds, a tree branch had broken off and was left hanging in a dangerous position in Govardhan Nagar, Mulund West, posing a potential risk to public safety.
Upon receiving information from local Corporator Dr. Hetal Gala Morvekar, I immediately visited the site and, in coordination with the concerned BMC officials and the Fire Brigade team, ensured that the hazardous branch was safely removed without delay.
Committed to ensuring the safety and well-being of every citizen.
@Dev_Fadnavis@MorvekarHetal@mybmc@mybmcWardT
#MumbaiRains #Mulund #CitizenSafety #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ||
जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥ 🚩🙏🏻
इतिहास, भक्ती आणि संघर्षाची ही गाथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#waari#waree#वारी#पंढरपूर#dindi#वारकरी_संप्रदाय
ऐका आणि सत्य समजून घ्या!
भाजपा मुंबई अध्यक्ष मा. अमितजी साटम ज़ी हे माध्यमांसमोर बोलत असताना मा. जयंत पाटील यांच्यासोबतच्या अर्धवट संभाषणाचा चुकीचा अर्थ लावून काही माध्यमांनी आणि काही वाचाळवीरांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मा. अमितजी साटम जी यांनी सविस्तर आणि स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे.
पूर्ण सत्य ऐका... तथ्य जाणून घ्या... आणि मगच मत बनवा.
#AmeetSatam #BJPMumbai
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्तीनंतर केलेल्या १०० दिवसांच्या कार्याचा अहवाल भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. @RaviDadaChavan जी यांना सादर करण्याचे सौभाग्य लाभले.
या १०० दिवसांच्या कालावधीत संघटन सुदृढीकरण, युवा सक्षमीकरण आणि जनसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे कार्य करण्याची संधी मिळाली. वरिष्ठ नेतृत्वाचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि प्रेरणा यामुळे पुढेही अधिक ऊर्जा, समर्पण आणि निष्ठेने संघटन व समाजसेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
#BJYM #BJYMMumbai #100DaysOfService #DeepakSinghForGenNext
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उत्तम संघटक, ज्यांच्या नेतृत्वात पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले अशा मा. रविंद्रजी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#RavindraDada_Varshapurti #PradeshAdyakshRaviDada #BJP4Maharashtra
Day 1
My late father, Shri Chandrakant Jamnadas Kotecha, was born in Alleppey, Kerala, and received his education in Kochi.
In his sacred memory, on 30th June 2026, our family devotionally commenced the 94th Paath Utsav Poojan Ceremony of Dariyalal Bappa (Jhulelal Bappa) at Shree Kochi Dariyasthan Temple.
_________________
दिवस पहिला
माझे वडील स्व. चंद्रकांत जमनादास कोटेचा यांचा जन्म केरळमधील अलेप्पी येथे झाला असून, त्यांचे शिक्षण कोची येथे झाले होते. त्यांच्या पवित्र स्मरणार्थ ३० जून २०२६ रोजी श्री कोची दरियास्थान मंदिर येथे दरियालाल बप्पा (झुलेलाल बप्पा) यांचा ९४ वा पाठ उत्सव पूजन सोहळा परिवारासोबत भक्तिभावाने प्रारंभ झाला.
@Dev_Fadnavis
#PaathUtsav #DariyalalBappa #JhulelalBappa #Kochi
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीसांनी आपला शब्द पूर्ण केला! नसरापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवत अवघ्या दोन महिन्यांच्या आत आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली!
@Dev_Fadnavis
दिनांक : 28 जून 2026
मुलुंड पश्चिम येथील श्री कच्छी लोहना महाजन वाडी बँक्वेट हॉल येथे अखिल विश्व गायत्री परिवार, मुलुंड यांच्या वतीने आयोजित “गायत्री मंत्र का ज्ञान-विज्ञान” कार्यक्रमास उपस्थित राहून आध्यात्मिक व ज्ञानवर्धक विचारांचे श्रवण केले.
भारतीय संस्कृतीतील मंत्रशक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक.
@Dev_Fadnavis
#GayatriMantra #Spirituality #IndianCulture #Mihir4Mulund
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर, वॉर्ड क्रमांक १०३ च्या नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, जिल्हा महामंत्री लालबहादूर यादव, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष योगेश मकवाना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांसोबत पाहिले.
देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतो.
@narendramodi@Dev_Fadnavis@MorvekarHetal
#MannKiBaat #ViksitBharat #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
दिनांक : 27 जून 2026
मुलुंड पश्चिम येथील कल्पनगरी सोसायटीच्या गार्डनमध्ये स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांशी संवाद साधला तसेच सोसायटीतील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
@Dev_Fadnavis@MorvekarHetal
#EkPedMaaKeNaam #TreePlantation #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
दिनांक : 26 जून 2026
मुलुंड पश्चिम येथील गुरु बक्ष चाळ, बी.आर.रोड, अभिनव मित्र मंडळ परिसरातील स्थानिक महिलांनी कार्यालयात भेट देऊन ड्रेनेज लाईनमधील सांडपाण्यामुळे होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्याची तात्काळ दखल घेत स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसोबत लगेचच प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी चाळीतील परिसर व नागरिकांच्या घरांमध्ये जमा झाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध.
@Dev_Fadnavis@MorvekarHetal@mybmc@mybmcWardT
#SamasyancheNirakaran
#PublicService #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
दिनांक : 26 जून 2026
मुलुंड कॉलनी येथील रचना गार्डन सोसायटी, राहुलनगर जवळ, पंचशील नगर जवळ, हनुमान पाडा येथील शिवाजी टेकडी जवळ तसेच कांबळे जनरल स्टोअर जवळ अशा विविध ठिकाणी संरक्षण भिंतीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मुलुंड परिसराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा माझा संकल्प आहे.
या प्रसंगी स्थानिक नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@deepikaghag19
#Development #Mulund #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते घडवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा एक भाग म्हणून 'डिजिटल लर्निंग' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात सामील होत डिजिटल लर्निंगचा अनुभव घेतला. या प्रशिक्षणाचा अनुभव पक्षकार्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.
आपणही 'सरल ॲप'च्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी व्हा, हे विनम्र आवाहन!
@narendramodi@Dev_Fadnavis
#SaralApp #DigitalLearning #PanditDeendayalUpadhyay #ViksitBharat #BJP4India
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 'डिजिटल लर्निंग' हे शिक्षणाचे नवे माध्यम म्हणून उदयास आले आहे. याच अनुषंगाने तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते घडवण्यासाठी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' अंतर्गत 'डिजिटल लर्निंग' उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
या उपक्रमाद्वारे डिजिटल माध्यमातून भाजपाची राष्ट्रीय विचारधारा, विकासाभिमुख धोरणे आणि गौरवशाली इतिहास कार्यकर्त्यांमध्ये रुजवला जात आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 'सरल ॲप'च्या माध्यमातून 'डिजिटल प्लॅटफॉर्म' उभारण्यात आला आहे.
तेव्हा आपण सर्वांनी या प्लॅटफॉर्मद्वारे 'डिजिटल लर्निंग' उपक्रमात सामील व्हा, हे विनम्र आवाहन!
जय भाजपा! तय भाजपा!
@narendramodi@Dev_Fadnavis
#SaralApp #DigitalLearning #PanditDeendayalUpadhyay #ViksitBharat #BJP4India
📍विधान भवन, मुंबई.
पावसाळी अधिवेशन | 25 जून 2026
मुलुंड पश्चिमेकडील छत्रपती वीर संभाजी नगर येथे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या SRA प्रकल्पातील ६ मजली अपूर्ण इमारतीत अनधिकृत लेबर कॅम्प उभारण्यात आला असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या.
या कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचा संशय असून, अमली पदार्थांचा वापर, दारूचा साठा आणि परिसरातील महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकारामागे महेश मडीवाल नावाचा इसम अनधिकृतपणे लेबर कॅम्प चालवून भाडे वसूल करत असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, या अनधिकृत कॅम्पला महावितरणकडून वीज मीटर कसे देण्यात आले, याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पात्र झोपडीधारकांनी घरे अनधिकृतपणे भाड्याने दिल्याचे सिद्ध झाल्यास त्यांची SRA पात्रता रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी मी पावसाळी अधिवेशनात केली.
मुलुंडकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही!
@Dev_Fadnavis
#पावसाळी_अधिवेशन #MonsoonSession2026 #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
मुलुंड पश्चिम येथील छत्रपती वीर संभाजी नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला असून, अपूर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत स्थानिक नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, मुलुंड पोलीस स्टेशनचे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि SRA अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान परिसरात अनधिकृत लेबर कॅम्प आढळून आला. तेथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींपैकी ५०% हून अधिक संशयित व्यक्ती बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या ठिकाणी अमली पदार्थ तसेच १००० पेक्षा अधिक दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. तसेच या व्यक्ती स्थानिक महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करत असल्याचेही निदर्शनास आले असून, याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
याबाबत संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्यता तपासून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या अनधिकृत कॅम्पच्या व्यवस्थापन, अनधिकृत वीज जोडणी व इतर सुविधांबाबतही तपास करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.
@Dev_Fadnavis@deepikaghag19@mybmc@mybmcWardT@MumbaiPolice@srabrihanmumbai
#PublicSafety #ZeroTolerance #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
Participated in the Digital Learning initiative under the Pandit Deendayal Upadhyaya Training Maha Abhiyan.
This training provided valuable insights into the effective use of digital tools for organizational work. I encourage everyone to join through the Saral App and enhance their knowledge and skills.
#DigitalLearning #PanditDeendayalUpadhyay #DeepakSinghForGenNext
भारतीय संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प करत, “संविधान हत्या दिवस” निमित्त आयोजित पदयात्रेत सहभागी झालो.
आमदार श्री. मिहीर कोटेचाजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष श्री. दीपकजी दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाचे युवा मोर्चा अध्यक्ष श्री. योगेश मकवाना आणि जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. सुमित खामकर यांच्या वतीने आयोजित या पदयात्रेद्वारे आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील आघाताची आठवण करून देत संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा महामंत्री श्री लालभाई यादव जी आणि युवराज मोरे जी आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@AmeetSatam@mihirkotecha@DeepakDalviBJP@Deepaksingh0240@iyogeshmakwana
#SamvidhanHatyaDiwas #BJYM #BJYMNEMumbai #Emergency1975