आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे.
शासनाच्या या उदासीन धोरणामुळे मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या #civil च्या विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या सहायक #नगररचनाकार साठीच्या १४८ जागांचे मागणीपत्र प्राप्त असूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #मुंबई_मनपा अभियांत्रिकी विभागाची भरती देखील झालेली नाही. शासनाने सर्व विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरु करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी शासनाने आता विद्यार्थ्यांना छळणे बंद करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#भरतीप्रक्रिया | #EngineeringJobs | #StudentDemand |
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२९०८०१.
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
विषय : नगरपरिषद भरती २०२३ मध्ये निवड झालेल्या १७८२ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येत आहे की, नगर परिषद भरती २०२३ सरळसेवा परीक्षा माहे ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली होती. सदर परीक्षेचा निकाल तब्बल ९ महिन्यांनी म्हणजेच १० जुन २०२४ रोजी जाहीर झाला होता. निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी १ जुलै २०२४ पासून १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत म्हणजेच तब्बल १.५ महिना सुरू होती. आज सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत. राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग या विभागांच्या परीक्षा नगरपरिषद परीक्षांच्या नंतर होऊन सुद्धा संबंधित विभागांनी नियुक्तीपत्राचे उमेदवारांना वाटप केले आहे. गेल्या 1 वर्षभरापासून उमेदवार प्रचंड तणावात आहेत.
कृपया आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून या १७८२ उमेदवारांना न्याय द्यावा हि विनंती.
धन्यवाद,
@mieknathshinde@CMOMaharashtra
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ???????
मा. @mieknathshinde साहेब
स्पर्धा परीक्षा उमेदवार "लाडके" नाहीत काय??
1.राज्यसेवा जाहिरात 2024
🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt मिळवले म्हणून ते वाया कसे जातील यावरच 2023 ला भर दिला व 2024 ला देखील पुनरावृत्ती होत आहे.
🔷 उपसंचालक ( आदिवासी विभाग) हा संवर्ग फक्त show piece म्हणून राज्यसेवेत आला आहे काय? गेल्या कित्येक वर्षात एकदाही हे जाहिरातीत दिसले नाही.2024 मध्ये तरी येणार का?
🔶 काँग्रेस सरकारने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :-44 पदे
पोलीस उपाधीक्षक:- 40
तहसीलदार:-34
ना.तहसीलदार:- 227
सहा.गटविकास अधिकारी:-100
असे आकडे दिसायचे
🔶आता तब्बल एक दशकानंतर हे आकडे "शून्य शून्य" /ZERO/भोपळा का झाले????????????
यासोबतच
मुख्याधिकारी गट:- अ व ब
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादीसह सर्व महत्वाचे संवर्ग या जाहिरातीतून का गायब झाले ?????
🔶 @RVikhePatil साहेब लक्षात आहे ना काँग्रेस मध्ये असताना कसे दणक्यात जाहिरात यायच्या.
आपण महसूलमंत्री म्हणून राज्यसेवेत उमेदवारांच्या हाती आपल्या विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या "शून्य शून्य " जागा काढून "भोपळे" देत आहात तरी आमच्याकडून आपणास "महसूल दिनाच्या " तीन अंकी शुभेच्छा.
🔷1,50,000 पदभरतीचा गाजवाजा केला ना मग त्यातील फक्त 1% सामान्य राज्यसेवा ला द्यायला काय अडचण आहे???????????
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
2. संयुक्त अराजपत्रित गट-ब व क जाहिरात 2024
🔶 फेब्रुवारीत नियोजित असणारी जाहिरात 6 महिन्यानंतर देखील प्रसिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
जाहिरात तर दूरच साधी परीक्षेची तारीख जाहीर होत नाहीये.
हेच का आपले अच्छे दिन???
🔷 काँग्रेस सरकार ज्याप्रमाणे
PSI :- 1869 पदे
STI :- 1090 पदे
असे दणक्यात जाहिरात प्रसिद्ध करत होते तसे आकडे या 2024 जाहिरातीत दिसणार आहेत काय??
तसेच इतर सर्व गट- ब व क संवर्गाची जास्तीत जास्त पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी सर्व उमेदवारांतर्फे विनंती करतो.
3. #MPSC कृषी जाहिरात 2024
🔶 दोन वर्षापासून ही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे कृषी पदवीधर अत्यंत तणावात आहेत.
पूर्ण जुलै महिना हे विद्यार्थी सरकारकडे यासाठी विनंती,आर्जव करत आहेत.पण सरकारला बेरोजगारांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही.
258 जागांचे मागणीपत्रक पाठवण्यासाठी इतकी चालढकल व टोलवाटोलवी कशासाठी सुरु आहे???
🔶 पाठपुरावा केला असता अधिकारी वर्ग वेगळीच अडचण सांगतात, मंत्री महोदय उमेदवारांना वेगळंच बोलतात.
हे कमी की काय म्हणून
20 दिवसापूर्वी आपले आमदार Tweet करून सांगतात की,
' मुख्यमंत्री महोदय सकारात्मकआहेत,त्यांनी GAD ला तात्काळ मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत "
एक महिन्यात खेळ मांडून ठेवला आहे कृषी पदवीधरांचा.
काय ठरवलं आहे नेमकं ह्यांचं????
तात्काळ याची स्पष्टता द्यावी.
विनाकारण त्यांना ताटकळत ठेवून
त्यांची दिशाभूल करणे बंद करावे.
24 दिवसावर परीक्षा आली आहे.
4. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी कोणता मुहूर्त शोधला आहे?? सेवाप्रवेश नियम बदलण्याची कार्यवाही इतकी का लांबत आहे?
जाहिरातीची वाट बघणाऱ्या अभियंतांना या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आहेत?
5. @mybmc चे
कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता तसेच इतर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले होते.अद्याप त्याची अंमलबजावणी व कार्यवाही का केली नाही हे एक कोडंच आहे.
#BMC व जलसंपदाच्या या पदभरती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहेत??
की मुद्दाम असा उशीर करून आचारसंहिता सुरु होईपर्यत लांबवण्याचा plan सुरु आहे?
6. 🙏🙏🙏🙏
सरकार येतील् ,जातील
पक्ष फुटतील ,वेगवगेळ्या आघाडी ,युती होतील.
परंतु आपल्या गर्जा महाराष्ट्रातील या युवक - युवतींना न्याय कोण देणार??
त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष
अक्षरशः वाया गेली आहेत व जात आहेत. आपण कसे भरून काढणार आहोत हे ???????
🔶मा.मुख्यमंत्री महोदय आपणास या सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
"जरा यांच्याकडे पण लक्ष द्या "
त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते द्या.
नौकरीची संधी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे याचा सरकारला विसर पडता कामा नये.
हा सर्व इतिहास आपल्याच नावावर लिहिला जाणार आहे.
धन्यवाद
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@ssaunik@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@atullondhe@maha_governor@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाच्या ६७१ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून @mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेब आपण द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
@mieknathshinde@NANA_PATOLE@kanhaiyakumar@varunchoudhary2
@suvishelke शेकडो उमेदवार इतर विभागामध्ये वरिष्ठ पद मिळाल्यामुळे नगरपरिषद कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहणार आहेत.
स्वच्छता निरीक्षक पदासाठी जाहिरातीत श्रेणी क ची पदे नसल्यामुळे DMA ने श्रेणी ब साठी प्रतीक्षा यादी लावली आहे मग इतर पदांच्या श्रेणी अ व ब च्या जागा रिक्त का ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या जाहिरातीत SEBC आरक्षणाचा अंतर्भाव करून ८ मे रोजी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुन्या जाहिरातीसाठी Open व EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना SEBC प्रवर्ग निवडण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. परंतु दरम्यानच्या काळात मराठा समाजातील अनेकांना कुणबी मराठा दाखले मिळाले असल्याने मराठा समाजातील या उमेदवारांना Open/Ews प्रवर्गातून OBC प्रवर्गात जाण्याची देखील मुभा देण्यात यावी यासाठी आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांच्याशी चर्चा केली असता याबाबत शासनाशी विचारविनिमय करावा लागेल असे त्यांनी कळविले. यानंतर श्री नितीनजी गद्रे (ACS GAD) यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत सामाजिक न्याय विभाग व लोकसेवा आयोग यांना बोलतो असे कळविले आहे. तसेच मी स्वतः श्री भांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
याच विषयासंदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती केली असता त्यांनी श्री भांगे व श्री गद्रे यांना तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या असून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. #MPSC
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🙏
नगरपरिषद भरती 2023
तात्पुरती निवड यादी जाहीर करून 'Opting Out' पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज
खूप मोठ्या संख्येने उमेदवार दुसऱ्या पदांवर निवडले गेलेत
उमेदवारांच्या हिताचा विचार झालाच पाहिजे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आदरणीय देवेंद्रजी,
सस्नेह नमस्कार,
महोदय,
राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी Dy.SP रिक्त पदांच्या सर्व जागा #MPSC कडे पाठवाव्यात.
तसेच जलसंपदा विभाग (WRD)भरती 2023 परीक्षेचा तातडीने निकाल जाहीर केला जावा.
सकारात्मक आणि तातडीचा प्रतिसाद मिळुन विषय सुटतील अशी अपेक्षा.
@Dev_Fadnavis
नगरपरिषद भरती 2023
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना 'Opting Out' पर्याय देण्याची काळाची गरज
अनेक उमेदवार राज्यसेवा आणि इतर मोठ्या पदांवर निवडले गेलेत त्यामुळे प्रतीक्षा यादीची प्रतीक्षा करण्यापेक्षा हा पर्याय सर्वांच्या हिताचा राहील
विचार करा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
नगरपरिषद संचालनालय अजून किती रिस्पॉन्स शीट जाहीर करणार आहे?
जागा वाढ करायच्या नावाने ठणठण गोपाळ!
तातडीने गुणवत्ता यादी आणि अंतीम निकाल जाहीर करण्याची बेरोजगारांवर उपकार करा.
तुमच्या चुकीचे प्रश्न आणि बरोबर उत्तराच्या खेळात भरती निवडणुकीच्या प्रचारात बधीर कराल.
@CMOMaharashtra
जिल्हा परिषद भरती २०२३
राहिलेल्या पदांचे निकाल जाहीर करायला मुहूर्त कधी निघणार?
निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत याची काळजी घ्या
@girishdmahajan