संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ज्या 106 हुतात्म्यानी बलिदान दिले, त्यांना कोटी कोटी वंदन. महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचे रक्त सांडले त्यांना आपण कदापी विसरता कामा नये.
जर पुन्हा जन्म झाला तर या महाराष्ट्राच्या मातीतच व्हावा. गर्व आहे मला मराठी असल्याचा जय महाराष्ट्र
#१मेमहाराष्ट्रदीन
मला माणूस म्हणून समाजात जगण्याच्या हक्क व अधिकार देणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या महामानवास आणि तत्त्ववेत्यास विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
Today we are because of you
#BabasahebAmbedkar
विद्येविना मती गेली... हा मूलमंत्र देऊन बहुजन समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे, स्त्री शिक्षणाचे अग्रदूत आणि सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे आजपासून २०० वे जयंती वर्ष सुरू. समता, न्याय, शिक्षण आणि बंधुभाव या मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या 'क्रांतीसूर्या'ला अभिवादन
लाडक्या बहिणीवरून कोर्टाची सरकारला चपराक. टेबल-खुर्च्या विका पण शिक्षक व शिक्षकेतर यांचे निवृत्ती वेतन द्या. अन्यथा योजना बंद करा. फक्त मतांसाठी महायुतीने ही योजना आणली. अन्य खात्यातील पैसा लाडक्या बहिणींना दिला जातोय. @Dev_Fadnavis अजून किती दिवस जनतेची फसवणूक करणार?
#लाडकीबहीण
ज्या सावित्रीबाईंनी आडवे कुंकू लावून अज्ञान आडवे केले. तोच आडवा कुंकू, जिजाबाईची नथ, रमाई व शेतात राबणाऱ्या आईची निळी साडी नेसून @drjyotiwaghmare यांनी खासदारकीची शपथ घेतली. ताई, तुम्ही दलित, बहुजन, शेतकरी, सामान्य यांचा आवाज बनला ही अपेक्षा
खूप शुभेच्छा 💐
#Rajysabha
छ. संभाजी महाराज यांची नकारात्मक प्रतिमा इतिहासकाराने दाखवली. मात्र ती प्रतिमा अत्यंत खोटी आणि चुकीची असल्याचे पुरावे देऊन मराठाशाहीचा इतिहास सर्वसामान्यपर्यंत पोहोचवणारे व सहज, सोप्या भाषेत उलघडून सांगणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
रत्नागिरी पॅसेंजर दादरइथून सोडण्यात यावी यासाठी मनसे आक्रमक. 15 दिवसात गाडी सुरू करा, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर. एरवी मतांसाठी मराठी माणसाची आठवण येणारे आता पक्ष, नेते कुठे गेले? मराठी माणसाने जागरूक राहिले पाहिजे.
@mnsadhikrut@Central_Railway@WesternRly@SandeepDadarMNS
सध्या युद्धाचे परिणाम सगळीकडे बसत आहे. याचा फटका गॅस नसल्यामुळे लाल परी याचा
उपहारगृहामध्ये सुद्धा बसत आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांना काही मोजकेच पदार्थ खायला मिळतात याकडे @msrtcofficial@PratapSarnaik@Devendra_Office लक्ष देतील का?
अखेर दोन हजारी मनसबदारीचा 'किताब मिळाला.
सर्वांचे शतशः आभार
मा. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना ट्विट ची दखल घेतात, म्हणून ट्विटर वर आलो.
अनेक जण भेटले. माझा ट्विटर परिवार झाला. सर्वांचा उल्लेख जागेअभावी करता येणार नाही.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार. अशीच कृपादृष्टी असू द्यावी.🙏
चक दे इंडिया...
What a match!
T20 एका सामन्यात 500 धावा झाल्या. भारत सलग दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल. विजयापासून एक पाऊल दूर...
टीम इंडिया शुभेच्छा
#T20WorldCup2026final#indianewzeland
जर पुन्हा जन्म झाला तर महाराष्ट्राच्या मातीतच व्हावा. महाराष्ट्रातील मराठीपण, संस्कृती, परंपरा, कला, साहित्य, सह्याद्री, खाद्य संस्कृती, गड किल्ले व निसर्गाचे वरदान वैविध्यने नटलेला महाराष्ट्र. जगाच्या पाठीवर कुठेही ही विविधता दिसत नाही. मराठी असल्याचा अभिमान आहे
#मराठीभाषादिवस
विकासाचा महामार्ग, समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प....!
मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होईल आणि मालवाहतुकीला मोठी चालना मिळेल.
डोंगराएवढे दुख उराशी बाळगून अवघ्या चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. घरातील माणूस गेल्यानंतर कुटुंबात शोकाकुल वातावरण असते. पण सुन्नेत्रा पवारांनी पक्षासाठी कर्तव्य म्हणून शपथ घेतली हे त्यांच्या या हिंमतीला दाद द्यावी की, निर्णय चुकीचा म्हणावा