BREAKING NEWS: The FDA has authorized Abbott’s Libre Duo 10 Day — the first device in the world to continuously monitor both glucose and ketones with one wearable sensor.
It measures both every minute, shows whether ketones are rising or falling, and sends an alert when ketones reach a concerning level. That could give people with diabetes an earlier warning and more time to take action before rising ketones become life-threatening diabetic ketoacidosis (DKA).
The 10-day sensor is authorized for people with diabetes ages 2 and older. This is a HUGE step forward in diabetes technology! 🙌
#DiabetesNews #Type1Diabetes #T1D #DKA #DiabetesTechnology #ContinuousKetoneMonitoring #AbbottLibre
@AbbottNews
वर्षानुवर्षे थकीत असलेली कोट्यवधी रुपयांची बिलं मिळत नसल्याने राज्यातील मराठी कंत्राटदारांवर या सरकारने आत्महत्येची वेळ आणलीय. आतापर्यंत ६ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून आज नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनीही आपलं आयुष्य संपवलं. गुजरात आणि आंध्र प्रदेशातील ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं तातडीने अदा केली जातात मग मराठी कंत्राटदारांनी सरकारचं काय घोडं मारलंय? कितीही आंदोलनं केली, संविधानिक मार्गाने मागणी केली तरी सरकार कंत्राटदारांची बिलं देत नाही. त्यामुळं आत्महत्या करण्यास भाग पाडलं म्हणून या सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये?
माझी सर्व मराठी कंत्राटदारांना विनंती आहे की, आत्महत्या हा आपला मार्ग नाही. आपल्याला आपल्या हक्कांसाठी, कुटुंबासाठी आणि अस्तित्त्वासाठी एकत्रित येऊन मोठा लढा उभारावा लागेल. संघर्षाच्या मार्गाने या सरकारला आपण वठणीवर आणू, पण कृपया कुणीही आत्महत्या करु नये. गजानन देवकाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
#मराठी_कंत्राटदार #थकीत_बिले #कंत्राटदार_आत्महत्या #कंत्राटदारांचा_संघर्ष
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आंदोलनात रोहित पवार दिसत आहे. रोहित पवार Mass Leader बनण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. सध्या @RRPSpeaks हे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडत आहेत. या सगळ्या गदारोळात आदिवासी खासदार व आमदार अजूनही झोपलेले आहेत.
औरंग्याचे दोन विश्वासू सरदार
औरंगझेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात, विशेषतः शाइस्ता खानवरील हल्ला आणि सुरत लुटल्यानंतर, १६६५ मध्ये त्याच्या या सेनापतीला मोठी फौज घेऊन दख्खनकडे पाठवले. जयसिंगाने पुरंदर किल्ला वेढला आणि इतर मोहिमा चालवल्या, ज्यामुळे महाराजांना पुरंदरची तह (११ जून १६६५) स्वीकारावी लागली. या तहानुसार अनेक किल्ले मुघलांकडे सोपवावे लागले आणि महाराजांनी आग्रा येथे औरंगझेबाच्या दरबारात जाण्याचे मान्य केले.
जयसिंग हा काछवाहा राजपूत होता आणि मुघल साम्राज्यातील विश्वासू सरदार होता. या मोहिमेत दिलेर खानसारखे इतर सरदारही होते, पण मुख्य राजपूत सेनापती म्हणून जयसिंगाला पाठवले गेले होते.
There is no one more fundamentalist and chauvinist, no bigger language warrior than a Hindi fundamentalist. Hindi is their world view, their ideological weapon. A minor inconvenience to them, the smallest question to their prejudice and they just lose it!
Gaslighters!
"I will leave and go back to unemployment, but will not learn few workable sentences" is apparently 'poor, bichara guy'. Meanwhile, "You have been here in our land for years, selling a service, now please sell it in my language 'too' " is language terror! Coloniser's logic!
देवेंद्र हा निर्णय काहीच दिवसात मागे घेईल बघत रहा. हा निर्णय तसा पण फक्त मराठी विरोधात गाजावाजा करण्यासाठी आणि मुख्य गोष्टींवरून दुर्लक्ष करण्यासाठी घेतलाय.
प्रताप सरनाईक आणि शिंदे ला हा संदेश दिला जाईल की बॉस कोण आहे आणि देवेंद्र उत्तरभारता समोर स्वतःची लाल करून घेईल.
मराठी माणूस तोंडावर पडेल मग इथून पुढे मराठीच्या हक्काचे निर्णय कुणीही घेण्याआधी १०० वेळा विचार करेल. हा सगळा सापळा त्यासाठीच रचलाय..
Most doctors don't want informed patients. They want obedient ones. A patient who's read up can catch a lazy diagnosis, and that scares people who built a career on nobody asking questions. @Grok
लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ उपोषणाला बसले आहेत. पुण्यातील ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी वसतिगृहांमधील अमानवीय परिस्थितीचा पाढा वाचला. अनावश्यक ३० वर्षांची वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा तसेच महिला विद्यार्थिनींच्या अनावश्यक प्रसूतीपूर्व तपासण्यांसारख्या गंभीर बाबी त्यांनी मांडल्या.
मा. मुख्यमंत्री महोदय, या विद्यार्थ्यांची आपण स्वतः भेट घ्यावी, त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि त्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मा. राहुलजी गांधी यांनी व्यक्त केली आहे.
आदरणीय शिवेंद्रराजे जी,
आपली काळजी वाटते!
भाजप व संघाच्या महाराष्ट्रद्रोही आणि बहुजनविरोधी विचारांना बळी पडून आपण छत्रपती घराण्याच्या ऐतिहासिक वारशाला गालबोट तर लावत आहातच, पण त्यांच्या पंगतीला बसून खोटे बोलण्याची सवयही आपल्याला लागलेली दिसतेय.
आपल्या माहितीसाठी, काँग्रेस पक्षाच्या परंपरेस अनुसरून श्री. राहुलजी गांधी यांनी स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पसुमने अर्पण करून आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी अभिवादन केले. काँग्रेस पक्ष व आमच्या नेतृत्वाने नेहमीच महाराष्ट्राचा व बहुजन महापुरुषांचा सन्मान राखत त्यांच्या विचारसरणीचा वारसा पुढे चालवला आहे.
आता तुम्ही सांगा,
१. ज्यांनी छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकावेळी विरोध केला त्या विचारसरणीच्या फडणवीसांच्या सोबत सत्तेत जाताना तुम्हाला कसे काहीच वाटत नाही ?
२. महाराज हे जुन्या काळातील आदर्श असे म्हणणाऱ्या भगतसिंग कोश्यारी ला असा जाब कधी विचारलात का ?
३. की मंत्रीपद महाराजांच्या स्वाभिमानापेक्षा मोठे आहे तुमच्यासाठी ?
४. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मधील पुतळा उभा करताना याच फडणवीस सरकारने भ्रष्टाचार केला आणि तो पुतळा कोसळला, याचा जाब तुम्ही फडणवीसांना डोळ्यात डोळे घालून विचारलात का ?
@Shivendraraje11 जी, या भ्रष्टाचारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या पक्षाने आम्हाला शिवप्रेम शिकवण्याची आवश्यकता नाही.
जय जिजाऊ, जय शिवराय…
ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक प्रा. डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. त्यांच्या निधनाने मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
शिक्षण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे; हा वारसा जपणे, समृद्ध करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी आपल्या कार्यातून करून दिली.
त्यांच्या जाण्याने मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्र या क्षेत्रांना आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या एका विद्वान मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आग्रह धरतानाच भाषेचा अभिजातपणा जपणे आणि समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे, हा आदर्श आपल्या कृतीतून मराठीजनांसमोर ठेवणाऱ्या प्रा. डॉ. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आदरणीय @Shivendraraje11 राजे, राज्यातील व देशातील असंख्य नागरिकांसोबत आपणही हा कार्यक्रम इतक्या बारकाईने पाहिला याचा आम्हाला आनंदच आहे.
पण, आपल्या नजरेतून काही गोष्टी सुटल्याची शक्यता आहे, त्याच गोष्टी मी विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
काँग्रेस पक्षाच्या परंपरेस अनुसरण आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पसुमने अर्पण करून आदरणीय राहुलजी गांधी यांनी अभिवादन केले. याबाबतचे काही फोटो मी या ठिकाणी देत आहे.
आपणांस अजूनही काही पुरावे पाहण्याची इच्छा असल्यास काँग्रेस भवन, पुणे येथे आपले सदैव स्वागत आहे. आपण विचारांनी आमच्या विरोधी असलेल्या पक्षाचे मंत्री असलात, तरी आमच्यासाठी आपण सर्वप्रथम छत्रपती घराण्याचे वंशज आहात, याच भावनेने व सर्वोच्च आदराने आपले काँग्रेस भवन येथे स्वागत होईल असे मी आपणांस आश्वस्त करतो.
@INCMaharashtra
Jio एक नंबर थर्डक्लास सर्व्हिस देत आहेत .कुठेच रेंज नाही येत.घरी दारी ऑफिस प्रवासात मंदिर मस्जिद ,चर्च गुरुद्वारा ,रस्त्यावर सुद्धा नाही.
एअर टेल मध्ये पोर्ट करू का रे मित्रांनो
@JioCare@reliancejio