मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच प्रवक्त्यानी दिलेल्या धमकीबाबत सांगि��ले तुम्हाला काही होणार नाही पोलिसी कारवाई मात्र होणार नाही; हे स्पष्टच झालं. इतर जर कोणी अशी दमदाटी केली असती, तर पोलिसांनी घरातून उचलून घेऊन नेले असते.
ठाण्यामध्ये सध्या पोलीस प्रशासन नावाच्या गोष्टीच दिसत नाहीत. दिसते ते फक्त गुंडाराज!
@lokmat
कालिचरण महात्मा गांधींना काय वटेल ते बोलतो …
बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो
महाराष्ट्रातली प्रजा सोशिक आहे त्यांना राग येत नाही
सरकार नपुंसक
..
कोणी ही या काही ही बोला कुणालाही बोला सरकार काही करणार नाही
जाहीर आमंत्र���
बाबासाहेब लंडन मध्ये असतांना अनेक वेळा उपाशी पोटी किंवा निव्वळ पापड खाऊन दिवसभर लायब्ररी मध्ये बसुन अभ्यास करायचे, त्यांचे अनुयायी आहोत. आम्हाला हा आनंदाचा शिधा नकोय आमच्या विद्यार्थ्यांना सरसकट Phd fellowship द्या. त्या साठी हे विद्यार्थी हालअपेष्टा सोसत आझाद मैदानात गेले 42
मुख्यमंत्री साहेब,तुम्ही ४२ दिवसाच्या आंदोलनावर एक शब्द ही काढला नाहीत,हक्क आहे हो भीक नाही मागत आहेत ही लेकरे,अहो देशासाठी च स��शोधन करणार आहेत ती. सरकारने त्या साठी निधी मान्य केला आहे तरी २ वर्ष झाली त्यांना दिलेला नाही.
@CMOMaharashtra
नाशिक मधील काळाराम मंदिराला आज भेट देत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद कायमचा संपला पाहिजे.हा विषय समाजात भेदाभेद निर्माण करणारा आहे.
समाजातील भेदाभेद संपावा,वेदोक्त आणि पुराणोक्त सारखे प्रकार बंद व्हावे,अशीच मनोभावे मागणी आज श्रीरामाकडे केली.
#kalaram_temple
काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही
छत्रपतीं शिवरयान बरोबर सनातनी मनुवादी असेच वागले
छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली
शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी
आजही छत्रपतींना शुद्र समजतात.
बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले
जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात
अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय
बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो
9साल के शासन में @narendramodi सरकार ने भूमि अधिग्रहण कानून को कमजोर किया। पैसा एक्ट को कमजोर किया। आरक्षण व्यवस्था को कमजोर किया। पर्यावरण कानून को कमजोर किया और अब वन संरक्षण अधिनियम,1980 में संशोधन विधेयक लाकर आदवासियों के वनों पर अधिकार को कमजोर कर रही है। शर्मनाक। @byadavbjp
मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शू��्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखिल अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वाम��ंना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबा��दार ठरले.
महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.
पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहीले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमात��न त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. ��ज तो सनातन धर्म परत डोक वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे.
या देशाच्या घटनेत,बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00वाजता यावे.आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात.
ऐसा पुढारी पुन्हा होणे नाही
याला जपलं पाहिजे
यांनी दिलेला 'बुद्धं सरणं गच्छामि' हा मूलमंत्र आपल्याला जगायला अन् Educate Agitate Organize हा उपदेश आपल्याला विषमतेवीरूध्द खंबीरपणे लढायला भक्कम उभा करेल l
जयभीम❣️
#भीमजयंती2023#ComingSoon
सगळं काही फुकट, 50% स्वस्तात , सवलतीत देण्यापेक्षा सरकारने रोजगार उपलब्ध करून देणं जरुरी आहे. नाहीतर ‘घेणाऱ्यांने घेत जावे ‘करता करता कटोरा घ्यावा लागेल हातात. सौदी अरेबिया सारखा तेलाच्या खाणीवर बसलेला देश पण थकला फुकट देऊन.
*हेच आशिर्वाद कामी येतात*
आज पासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात होणार आहे. आज 11.00 वाजता टाटा कॅन्सरच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आदरणीय शरचंद्रजी पवार साहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट होते. त्यांच छोटसं ऑपरेशन झालेलं होते. मी त्यांना बघायला गेलो ह��तो आणि उभा राहून चर्चा करीत होतो. साहेबांच्या बाजूला वहिनी बसलेल्या होत्या आणि खुर्चीवर टाटा. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. श्रीखंडे बसले होते. सहज चर्चा करीत असताना मी डॉ. श्रीखंडे यांना विचारले की, मी काय मदत करु शकतो; कारण, मला एक खंत होती जी माझ्या मुलीने माझ्या मनात टाकली होती, ती म्हणजे कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावरच लोक झोपतात तर त्यांची योग्य ती सोय का नाही आपण करु शकत ? माझ्या मनाला देखील हाच प्रश्न भेडसावत होता आणि त्यांनीही सांगितले ��ी, ह्या लोकांसाठी आपण काय करु शकलात तर बघा. ही चर्चा चालू असतानाच वहिनी म्हणाल्या की, जितेंद्र ह्या काम करणा-या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी देखिल आपल्याला काही करता येईल का ? ह्या दोन गोष्टी त्या दिवशी चर्चेत आल्या. मी लगेच
गृहनिर्माण सचिव श्री. म्हैस्कर, श्री दिग्गिकर आणि मुंबई म्हाडा चे मुख्याधिकारी श्री. म्हसे यांची आणि काही अधिका-यांची एकत्रित बैठक बोलावली. या तिनही अधिका-यांना मी ��ांगितले की, आपल्याला हे करायचं आहे. त्यानुसार कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकासाठी 100 खोल्या अगोदर दुसरीकडे उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या, परंतु त्यामध्ये काही समस्या उपस्थित झाल्या. त्यानंतर त्याच्यापेक्षाही चांगल्या खोल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बॉम्बे डाईंगच्या एका इमारतीमध्ये म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्या. तिनही अधिका-यांसहीत सर्वांनीच एकमताने या निर्णयाचे स्वागत केले की, हे समाजासाठी उपयोगी काम आहे.
त्यानंतर आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख श्री. बडवे यांच्याकडे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खोल्या अधिकृतरीत्या सुपुर्द केल्या. नंतर त्यांनी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी Patient Friendly Room तयार केल्या आणि आता उद्या त्याचे उद्घाटन होणार आहे.
मी जे महिलांसाठीच्या वसतीगृहाबद्दल बोललो होतो त्यासाठीची जागा देखिल मी बघून ठेवली होती. हाजीअलीच्या बाजूलाच एक मोठा भूखंड होता ज्यामध्ये 500 खोल्यांच्या हॉस्टेलची पूर्ण इमारत बस��� शकेल आणि त्याबाबतचे डिझाईन्स देखिल अंतिम करण्यात आले होते. पण, त्यानंतर माझे मंत्रीपद गेल त्यामुळे त्याचं पुढे काय झालं हे मला माहित नाही. पण, त्यादिवशी चर्चा झालेल्या दोन्ही गोष्टी मी अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलो. मला आनंद आहे की, त्याच्यामधील कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या खोल्यांचे उद्घाटन होणार आहे.
जीवनात हिच काम आपल्याला आशीर्वादरुपाने मदत क��ीत असतात. अनेक संकटे येतात काही ठिकाणी माहित नसलेली माणसं देवासारखी येऊन उभी राहतात. ती कशामुळे तर हेच आशीर्वाद आपण घेतो त्याच्यामुळे.
माझी आई 2 महिन्यत कॅन्सरने गेलेली मला आठवते. कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यानंतर घरात काय अवस्था असते हे मी फार जवळून माझ्या घरात बघितलं आहे. कारण, माझ्या तीन मावश्या कॅन्सरने गेल्या. एक माझी मावशी टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमीट असताना माझी आई कशी रस्त्यावर झोपायची ही आठवण देखिल माझ्या मनात आजही कायम आहे. पण, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे मला गृहनिर्माण खाते मिळालं आणि त्यांच्याच संस्कारामुळे माझ्यात ही सगळी समाजोप��ोगी कामे करण्याची मानसिकता तयार झाली.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्या असोत, काम करणा-या महिलांसाठी हॉस्टेल असो तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असो, ही तिनही म्हाडाच्या अखत्यारीत नसतांना म्हाडाचा छत्र देण्यासाठी (समाजोपयोगी उपक्रम) म्हणून उपयोग व्हावा म्हणून ही तिन्ही कामे झाली. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हॉस्टेलच्या कामाबाबत निवि��ा देखिल निघाली होती, त्याचे काम देखिल सुरु झालं असेल. माझी ह्या सरकारला विनंती आहे की, हाजीअलीच्या जवळ जे महिलांसाठी आपण वर्किंग वुमन्स हॉस्टेल तयार करणार आहोत त्या कामाची देखिल आपण सुरुवात करावी. ही तीनही कामे आयुष्यभर मला आशीर्वाद देत राहतील.
*-डॉ. जितेंद्र आव्हाड*
कलेच्या क्षेत्रातील अव्वल दर्जाच लिखाण म्हणजे आंबेडकरी साहित्य l
आंबेडकरी तत्त्वज्ञान अफाट आहे, सर्वसमावेशक आहे, सर्वव्यापक आहे l🙌🏼
#भीमजयंती2023💙
#ComingSoon